शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

उर्दू शाळांमध्ये नेमले मराठीचे शिक्षक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 03:08 IST

शिक्षकांच्या ठाणे जिल्ह्यात बदल्या झाल्या, त्यांच्याजागी उर्दू माध्यमाचे शिक्षक येण्याआधीच त्यांना कार्यमुक्त केल्याने तालुक्याच्या शिक्षण विभागाने इतर शाळांतील मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियमबाह्य नेमणूक या शाळांवर केली आहे.

वाडा  - तालुक्यात कुडूस, उसरकॅम्प, खानिवली या गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या तीन उर्दू प्राथमिक शाळा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत. त्यातील शिक्षकांच्या ठाणे जिल्ह्यात बदल्या झाल्या, त्यांच्याजागी उर्दू माध्यमाचे शिक्षक येण्याआधीच त्यांना कार्यमुक्त केल्याने तालुक्याच्या शिक्षण विभागाने इतर शाळांतील मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियमबाह्य नेमणूक या शाळांवर केली आहे. हा निर्णय घेतांना मराठीचे शिक्षक उर्दू शाळेतील मुलांना काय शिकविणार? हा साधा विचारही न केला गेल्याबद्दल मुस्लिम पालकवर्गातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. ही माहिती घेत असतानाच शिक्षण विभागाच्या व्यवस्थापनाचा एकूणच उडालेला बोजवारा समोर आला. तालुक्यात उंबरपाडा, गाळे, पाहुणीपाडा, कोळकेवाडी, तीळमाळ या शाळांत विद्यार्थी पटसंख्या ५ ते ६ एवढीच असताना त्यांच्यासाठी दोन शिक्षक कार्यरत आहेत. या शाळांमधील एकेका शिक्षकाची उर्दू शाळेवर तात्पुरती नेमणूक योग्य ठरली असती पंरतु तसे न करता कुडूस, वडवली, आब्जे या मोठा पट असलेल्या शाळांतील एकेक शिक्षक उर्दू शाळेत नियुक्त केले आहेत. विशेषत: वडवली शाळेची १ ली ते ५ वीची पटसंख्या ४० असतांना एकच शिक्षक सर्व वर्ग सांभाळतो त्यांच्या कार्यक्षमतेचा विद्यार्थी संख्येचा विचार केलेला नाही तर गातेस खुर्द या २९ पटसंख्या असलेल्या शाळेच्या शिक्षिका रजेवर जाताच तिथे पर्यायी शिक्षक लगेच दिला गेला, म्हणजे मजीनुसार सोय आणि गैरसोय असा व्यवस्थापनाचा मनमानी कारभार दिसून येतो.उर्दू शाळांतील मोठा पट असलेल्या शाळांतील मुलांची गैरसोय दूर करण्यासाठी ५ ते ६ एवढी कमी पट असलेल्या शाळांमध्ये दोन शिक्षक कार्यरत ठेवण्याच्या धोरणाचा पुर्नंविचार होण्याची गरज आहे.आधी ही विसंगती दूर करामराठी माध्यमाच्या शाळांमध्ये अनेक भौतिक सुविधा देण्याच्या तसेच गुणवत्ता वाढीसाठी अनेक उपक्रम सुरू होत आहेत.परंतु त्याआधी एकेकाळी जीवन शिक्षण विद्यामंदिर असे नाव असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांतील पट आणि शिक्षक यातील विसंगती दूर व्हावी.

टॅग्स :Teacherशिक्षकnewsबातम्या