वसई : पालघर आदिवासी जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला असून, त्यासाठी पेसा कायदा लागू करण्यात आला आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांना शासकीय नोकऱ्यात प्राधान्याने दिले जाणार आहेत. त्यामुळे आपला लढा अधिक तीव्र करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शिवसेना शिरीष चव्हाण यांनी मराठा मूक मोर्चा निमित्ताने नालासोपारा येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत केले.पालघर येथे २३ आॅक्टोबरला आयोजित करण्यात आलेल्या मराठा क्रांती मूक मोर्चाच्या पूर्व तयारीसाठी नालासोपारातील तुळींज येथे एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत शिरीष चव्हाण, राजाराम मुळीक, रत्नदिप बने, विश्वास सावंत, प्रभा सुर्वे, नंदकुमार पवार, श्रद्धा मोरे, वर्षा सावंत, जुही चव्हाण यांनी आपापले विचार मांडले. यावेळी अनेक नगरसेवकांसह महापालिकेचे अधिकारीही उपस्थित होते. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांपैकी ९५ टक्के शेतकरी हे मराठा होते. तुमच्या मागण्यांच्यावेळी आम्ही पाठींबा दिला आता तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या, असे आवाहन राजाराम मुळीक यांनी यावेळी केले. पेटून उठायची वेळ कधीच निघून गेली आहे.आता शस्त्र हाती घेण्याची वेळ आली आहे. स्त्री ही चैनीची वस्तू नाही हे दाखवून द्या, असे आवाहन यावेळी प्रभा सुर्वे यांनी केले. दरम्यान, मराठा क्रांती मूक मोर्चासाठी महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष जावेद लुलानिया यांनी पाठिंंबा देत १६ हजार रुपयांची देणगी दिली आहे. (प्रतिनिधी)
आपल्या हक्कांसाठी मराठ्यांना लढावे लागेल
By admin | Updated: October 21, 2016 04:26 IST