शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

...तर तारापूरला माणसांची अवस्था एक दिवस ‘अशी’ होईल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 00:50 IST

सांडपाण्यातून बाहेर पडलेल्या विषारी वायूमुळे २१ चिमण्यांचा एकाच दिवशी झालेला दुर्दैवी मृत्यू तर शनिवारी रात्री पुन्हा विषारी वायुमुळे श्वसन व डोळे चुरचुरणे त्रास जाणवू लागल्याने भीतीमुळे कामगारांची झालेली पळापळ झाली.

- पंकज राऊतबोईसर : तारापूर एमआयडीसी मध्ये प्रदूषित रासायनिक सांडपाण्यामुळे खाडी किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात मासे मरण्याच्या घडणा-या घटना व अनधिकृतपणे नाल्यामध्ये सोडण्यात येणा-या सांडपाण्यातून बाहेर पडलेल्या विषारी वायूमुळे २१ चिमण्यांचा एकाच दिवशी झालेला दुर्दैवी मृत्यू तर शनिवारी रात्री पुन्हा विषारी वायुमुळे श्वसन व डोळे चुरचुरणे त्रास जाणवू लागल्याने भीतीमुळे कामगारांची झालेली पळापळ झाली. ही धोक्याची घंटा असून मासे, चिमण्या यांच्यानंतर माणसांचीही अवस्था अशी होऊ शकेल, असा इशारा त्यातून मिळतो आहे.या घटनेमुळे निष्पाप मासे व चिमण्या मेल्या तर हरित पट्टे व झाडांची झालेली कत्तल व अवस्था याची गंभीर दखल न घेतल्यास मासे व चिमण्यांसारखी अवस्था तारापूर औद्योगिक क्षेत्रातील व क्षेत्र परिसरातील माणसांची होईल अशी भीती शनिवार च्या घटनेवरून व्यक्त करण्यात येत आहे.तारापूरमधील रासायनिक प्रदूषणामुळे मुरबे, नवापूर व दांडी या समुद्रकिनाºयावर आतापर्यंत अनेक वेळा हजारो मासे मृत पावल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यानंतर तेथील मच्छीमारांच्या तीव्र प्रतिक्रि या व संतापाचे रूपांतर मृत मासे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या व सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रा मधील कार्यालयात टाकून संताप अनेक वेळा व्यक्त झाला होता.तर पावसाळी पाणी वाहून जाणाºया नाल्यामध्ये व काही वर्षा पासून बंद असलेल्या पाइप लाईनच्या चेंबरमधे अनधिकृतपणे रासायनिक सांडपाणी उद्योगांतून किवा टँकरमधून सोडण्यात येते ते पुढे परिसरातील शेत जमिनीत व खाडी किनारी जाऊन पर्यवारणाला धोका निर्माण होत असल्याने त्याचा पर्यायाने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे तर काही वेळा त्या घातक रासायनांतून विषारी वायू जीव घेणा ठरत आहे त्याच प्रमाणे काही महीने दुर्गंधियुक्त वायूच्या वासाने नागरिक प्रचंड त्रस्त होऊन त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होत होतो या सर्व घटनांकडे पाहता ही धोक्याची घंटा वेळीच ओळखण्याची गरज आहे.तारापूर औद्योगिक क्षेत्रामधील भीषण प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेने राष्ट्रीय हरित लवादामध्ये दावा दाखल केल्यानंतर मागील दोन वर्षांमध्ये लवादाकडे अनेक वेळा सुनावणी होऊन त्यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ठाणे व कल्याण येथील क्षेत्रीय अधिकाºयांचे विशेष पथक तयार करून प्रादेशिक अधिकाºयांच्या नेतृत्वाखाली या पथकाने तारपूरच्या शेकडो उद्योगांचे सर्वेक्षण करून त्या उद्योगांतील सांडपाण्याचे नमुने घेऊन प्रयोशाळेमध्ये तपासणी करून अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषी आढळलेल्या तारापूरच्या सुमारे ५० उद्योगावर बंदची कारवाई करण्यात आली होती. परंतु नंतर त्या पैकी बहुसंख्य उद्योगाकडून काही दिवसांनी बँक हमी (गॅरंटी) घेऊन ते उद्योग पुन्हा पूर्ववत सुरू केले त्या मुळे ती करवाई म्हणजे एक फार्स व कागदी घोडे नाचविले अशी भावना सर्वत्र व्यक्त होत असून कारवाई म्हणजे एक फार्स न राहता कठोर असावी अशी मागणी होत आहे. ती पूर्ण न झाल्यास कोणत्याही क्षणी तारापूरमधील कामगार आणि रहिवासी यांची अवस्था मरण पावलेल्या मासे व चिमण्यांसारखी होईल.>जुनी पाईपलाईन पूर्णत: नष्ट करा!एमआयडीसी ने करोडो रुपये खर्च करून नविन ड्रेनेज पाईपलाईन टाकल्याने जुनी पाईपलाईन पूर्णत: नष्ट झाली पाहिजे.परंतु ती सुरु च आहे. त्या लाईनचा गैरवापर आजही केला जातो तर जगभरामध्ये बॅन असलेल्या बाबींचे उत्पादन भारतात व तारापुरला वेगळे नाव देऊन घेतले जाते त्याचा शोध घेतला पाहिजे. कारखान्यांमधून बाहेर पडणारे वायू, विविध रासायनिक कारखान्यांचा धूर, कोळसा जाळणे व रासायनिक सांडपाण्यामध्ये असणारे अन्य घातक अवशेष यामुळे पाण्यातील जैवविविधता मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत आहे.