शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

जागेअभावी मनोरचे बसस्थानक २५ वर्षांपासून रस्त्यावरच

By admin | Updated: December 15, 2015 00:43 IST

महामंडळ एसटीच्या अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे मनोरच्या बसस्थानक रस्त्यावर कोणत्याही प्रकारच्या सुविधा नसल्याने शाळकरी विद्यार्थी, महिला व इतर प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.

मनोर : महामंडळ एसटीच्या अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे मनोरच्या बसस्थानक रस्त्यावर कोणत्याही प्रकारच्या सुविधा नसल्याने शाळकरी विद्यार्थी, महिला व इतर प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. दर दिवशी जिल्ह्यातील आठ बस डेपोतून २४० ते २५० एसटी बस मनोरवरून ये-जा करतात. मात्र गेल्या २५ वर्षांपासून महामंडळ अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष आहे. संभाव्य तालुक्याच्या यादीत मनोरचे नाव असून नागरिकरण झपाट्याने वाढत आहे. मात्र, सर्वसामान्य गोरगरीब प्रवाशांसाठी मनोर बस स्थानकावर वाडा बाजूकडे जाणाऱ्या रस्त्यालगत ७ बाय १२ चे रॉड नादुरूस्त अवस्थेत आहेत. त्यामागे स्वच्छालय फक्त नावाला आहे. सर्वत्र दुर्गंधी पसरलेली. तसेच पालघरच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना रस्त्यावरच उभे राहून बस धरावी लागते. उत्पन्न भरपूर, पण सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्षमनोरच्या परिसरातील ५० ते ६० गावातील नागरिक मनोर येथे येऊन नाशिक जव्हार नंदुरबार कल्याण, भिवंडी, ठाणे, शहापूर, वाडा, कोल्हापूर, पालघर, बोईसर, मोखाडा जाण्यासाठी एसटी बस पकडतात. पालघर जिल्ह्यातील आठ बस डेपोतील दर दिवस २४० ते२५० बस मनोरवरुन ये-जा करतात. गेल्या पंचवीस वर्षापासून आजपर्यंत कोट्यवधी रुपये मनोर बसस्थानक येथून एसटी महामंडळाला फायदा झाला असून मात्र आजपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांनी बसस्थानक व्हावे तेथे प्रवाशांसाठी स्वच्छालय, पाणी पिण्याची सुविधा, वयोवृद्धांसाठी, महिलांसाठी, शाळकरी मुलांसाठी बसण्यासाठी आसने अशा कोणत्याही प्रकारच्या सुविधा केलेल्या नाहीत. लोकप्रतिनिधींनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे.जागा उपलब्ध करून दिली तर एसटी महामंडळकडून मोठा बसस्थानक बनवू शकते. आमच्यामार्फत तसे शासनाला प्रस्तावही पाठविण्यात आले आहे. मात्र जागेअभावी प्र्रकरण प्रलंबित आहे.- डी.ए. मोरे, विभाग यंत्रणा, पालघर बसस्थानक नसल्याने पावसाळ्यात प्रवाशांना छत्र्या उघडून रस्त्यावर बसची वाट बघत उभे राहावे लागते.- इक्बाल चिखलेकर, अध्यक्ष अल्पसंख्याक, जि. पालघरहा संभाव्य तालुका आहे. लोकसंख्या भरपूर वाढली. परंतु मनोरचे महत्वाचे बसस्थानक स्थानक नसून थांब्यासारखे आहे. येथे मोठे बसस्थानक होणे गरजेचे आहे. - दिलीप देसाई, माजी उपतालुका प्रमुख शिवसेना, मनोर