शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षात गहाळ झालेले ४० ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र मणिकपूर पोलिसांनी दिले सापडून

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 17:18 IST

ही माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी सोमवारी दिली आहे. 

नालासोपारा (मंगेश कराळे) :- रिक्षामधून प्रवास करताना गहाळ झालेले २ लाख १० हजारांचे ४० ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र मणिकपूर पोलिसांनी परत मिळवून दिल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी सोमवारी दिली आहे. 

एव्हरशाईन सिटीतील साई सुमन सोसायटीमध्ये राहणाऱ्या सपना सडवेलकर (४३) या २७ ऑक्टोबरला संध्याकाळी साडे पाच वाजण्याच्या दरम्यान घराबाहेर निघाल्या. त्यांनी एव्हरशाईन सर्कल ते वसई रेल्वे स्टेशन येथे जाण्यासाठी एव्हरशाईन सर्कल रिक्षा स्टॅण्ड येथून रिक्षा पकडली. या प्रवासा दरम्यान त्यांचे २ लाख १० हजार रुपये किंमतीचे ४० ग्रॅम वजानचे मंगळसुत्र गहाळ झाले. त्यांनी मणिकपूर पोलीस ठाण्यात जाऊन झालेल्या घटनेबाबत माहिती दिली होती. पोलिसांनी गहाळ रजिस्टरमध्ये मिसिंग दाखल केली. या घटनेच्या अनुषंगाने माणिकपूरचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी व अंमलदार यांनी एव्हरशाईन सर्कल परिसरातील १० ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासुन महिलेने प्रवास केलेल्या रिक्षाचा क्रमांक प्राप्त केला. त्यावरून रिक्षा चालकाचा शोध घेवुन त्याचेकडे गहाळ झालेल्या मंगळसुत्राबाबत बारकाईने व कौशल्याने विचारपुस करुन तक्रारदार यांचे गहाळ झालेले मंगळसुत्र हस्तगत करुन त्यांना परत केले. 

सदरची कारवाई पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बडे, मणिकपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मिलिंद साबळे, पोलीस निरीक्षक (प्रशासन) ऋषिकेश पवळ  यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सनिल पाटील, पोलीस हवालदार शैलेश पाटिल, शामेश चंदनशिवे, धनंजय चौधरी, गोविंद लवटे, आनंदा गडदे व प्रविण कांदे यांनी केली आहे. 

 

टॅग्स :Policeपोलिस