शहरं
Join us  
Trending Stories
1
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
2
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
3
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
4
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
5
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
6
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
7
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
8
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
9
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
10
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
11
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
12
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
13
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
14
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
15
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
16
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
17
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
18
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
19
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
20
रक्षाबंधन सणासाठी जाताना अपघात; आई-वडीलांच्या डोळ्यांदेखत चिमुकल्याचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना

पालघरमधील शुक्ला कंपाउंडमध्ये असलेल्या अडड्यावर धाड, ६ जुगारी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 03:45 IST

पालघरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयापासून फर्लांगभर अंतरावर असलेल्या शुक्ला कंपाउंडमध्ये पोलिसांनी धाड टाकून सुमारे १ लाख ६४ हजार रुपयांच्या मुद्देमालासह ६ जुगाºयांना अटक केली आहे. तर ९ जुगारी फरारी झाले.

पालघर : पालघरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयापासून फर्लांगभर अंतरावर असलेल्या शुक्ला कंपाउंडमध्ये पोलिसांनी धाड टाकून सुमारे १ लाख ६४ हजार रुपयांच्या मुद्देमालासह ६ जुगाºयांना अटक केली आहे. तर ९ जुगारी फरारी झाले.पालघर रेल्वे स्टेशनच्या समोरील शुक्ला कंपाउंडमध्ये पोलिसांच्या आशीर्वादाने अनेक वर्षांपासून राकेश दीक्षित हा मोठा जुगाराचा अड्डा चालवित असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी निमिल गोहेल यांना मिळाली होती. येथून मोठा हप्ता बाहेर पाठविला जात असल्याने व काही पोलीस ही या जुगारात सहभागी होत असल्याने त्यावर कारवाई होत नव्हती . गणपती उत्सवाच्या पूर्वसंध्येला काही जण शुक्ला कंपाऊंडमध्ये जुगार खेळत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारीई गोहेल यांना मिळाली. त्यांनी पालघरमधील पोलीसाना धाडीबाबत कुठलीही कल्पना न देता नवीन नियुक्त झालेल्या पोलिसांची साथ घेऊन बुधवारी रात्री ९ वाजता ही धाड घातली गेली. त्यात जुगार खेळत असलेले विशाल किशोर भानुशाली (कमलापार्क), विनोद कांतीलाल भानुशाली(धडा हॉस्पिटल मागे), राजेंद्र बाबूराव पाटील (गोठणपुर), सुरेश अमरनाथ सरोज(डुंगी पाडा), सईद सपूर शेख (गांधी नगर),नरेश रजपूत(गणेश कुंडा जवळ), अशा ६ जुगाºयांना अटक करण्यात आली. अन्य ९ जुगारी पळून गेले. या घटनास्थळी एक पोलीस ही जुगार खेळत असल्याची चर्चा असून पालघरमध्ये अनेक वर्षे नोकरी करून वसई तालुक्यात बदली वर गेलेले काही पोलीस या जुगाराच्या हप्त्यातील वाट्याची मागणी आजही करीत असल्याचे एकाने नाव न छापण्याच्या अटीवर लोकमतला सांगितले. या कारवाई दरम्यान काही महिलांनी पोलिसांना विरोध करण्याचा प्रयत्न केल्याचे कळते.रेल्वे स्टेशन समोरच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या समोरच बिनिदक्कतपणे एवढं मोठा जुगाराचा अड्डा सुरु असतांना आजपर्यंत त्यावर कारवाई करण्याचे धाडस कोणाही अधिकाºयाने केलेले नव्हते. मात्र कडक शिस्तीचे आणि नेहमी कायद्याचा वचक राहिला पाहिजे या भावनेतून काम करणारे उपविभागीय अधिकारी गोहेल ह्यांनी मात्र पूर्ण तयारीनिशी या अड्ड्यावर धाड घालून व जुगार प्रतिबंधक अधिनियमा द्वारे कारवाई करून ९ जुगाºयाना अटक केली आहे.घटनास्थळावरुन १५ मोबाईल जप्त करण्यात आले असून त्यातील संभाषणाद्वारे फरारी ९ जुगाºयांचा छडा लागणार आहे. त्यामध्ये चांगल्या कुटुंबातील व्यक्ती आहेत. न्यायालयाने ६ आरोपीची जामिनावर सुटका केली असून पुढील तपास एस. एन. भोईर हे करीत आहेत.