शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

कुपोषणाचा विळखा पुन्हा घट्ट, आॅगस्ट २०१७ ची धक्कादायक आकडेवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 00:28 IST

पुर्वी च्या ठाणे जिल्ह्यातील मोखाडा, जव्हार, विक्र मगड, वाडा, डहाणू, तलासरी आदी आदिवासी गाव-पाड्यातील बालकांना लागलेली कुपोषणाची वाळवी पालघर जिल्ह्याच्या नवनिर्मिती नंतरही कायम आहे.

रवींद्र साळवेमोखाडा : पुर्वी च्या ठाणे जिल्ह्यातील मोखाडा, जव्हार, विक्र मगड, वाडा, डहाणू, तलासरी आदी आदिवासी गाव-पाड्यातील बालकांना लागलेली कुपोषणाची वाळवी पालघर जिल्ह्याच्या नवनिर्मिती नंतरही कायम आहे.सद्यस्थितीत पालघर जिल्हात तालुकानिहाय तलासरी २४८, जव्हार १ - १५१, जव्हार २- १९१, विक्र मगड ३०८, मोखाडा २२९, डहाणू ४०८, कासा २३१, वाडा १ - १३९, वाडा २ - २७१, पालघर ३५४, मनो २६२, वसई १ - २०५, वसई २ - १८४ अशा एकुण ३,१८१ इतक्या अंगणवाड्या आहेत. या केंद्रातील जुलै २०१७ च्या अखेरीस ग्राम बाल विकास केंद्राच्या ङ्कअहवाला नुसार प्राप्त झालेल्या कुपोषित बालकांच्या यादी नुसार सॅम म्हणजेच (तिव्र कुपोषित बालके) तालुका निहाय डहाणू १५६, तलासरी १८, मोखाडा ४१, जव्हार १४१, विक्रमगड १२८, वाडा १०१, पालघर ३८, वसई ३२ या प्रमाणे जिल्हा भरात एकुण ६५५ तिव्र कुपोषित बालके आहेत. तसेच मॅम या मध्यम कुपोषित बालकांच्या श्रेणीमध्ये डहाणू ३८४, तलासरी ३२८, मोखाडा २६४, जव्हार ८४७, विक्र मगड ७३८, वाडा ५२५, पालघर ३८१, वसई १५४ या प्रमाणे जिल्हा भरात एकुण ३,६२१ मध्यम कुपोषित बालके आहेत. तर तिव्र कुपोषित व मध्यम कुपोषित बालकांची जिल्हातील एकूण आकडेवारी बघता ४,२७६ एवढी आहे.त्याचप्रमाणे आॅगस्ट महिन्यामध्ये २,६०३ एवढी कुपोषित बालके असून यातील ५११ बालके आज ही तिव्र कुपोषित म्हणजेच सॅम श्रेणीत आहेत तर २०९२ बालके मध्यम कुपोषित म्हणजेच मॅम श्रेणीत आहेत. विशेष म्हणजे जिल्हातील ० ते ६ वयोगटातील बालकांचा कुपोषित, भुकबळी आदी विविध कारणामुळे झालेल्या बालमृत्यूचे प्रमाण देखील अधिक असून एप्रिल २०१७ ते आॅगस्ट २०१७ अखेर पर्यत डहाणू तालुक्यात ५४, जव्हार ४४, विक्रमगड १९, मोखाडा ११, पालघर ३२, तलासरी १६, वाडा १३, वसई १५ या प्रमाणे जिल्हा भरात एकुण २०४ कुपोषीत बालके भुकबळी आदी विविध कारणामुळे दगावली आहेत.महत्वाचे म्हणजे ११ सप्टेंबर २०१७ रोजी अंगणवाडी सेविकांनी मानधन वाढीसाठी पुकारलेल्या राज्यव्यापी बेमुदत संपा दरम्यान अंगणवाडी केंद्र वा बालकांचा सकस आहार बंद असल्याने तसेच शासनाच्या तोकड्या सकस आहार देण्याच्या कार्यकाळात पालघर जिल्हात ११ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर या १४ दिवसाच्या कालावधीत ० ते १ वयोगटातील १० कुपोषितांचा तर १ ते ६ वयोगटातील ५ कुपोषित बालकांचा मृत्यू म्हणजे एकंदर १५ बालकांचा मृत्यू झालेला आहे. यामुळे जिल्हा भरातील आदिवासी बालकांचे कुपोषण रोखण्यासाठी राबविण्यात येणाºया योजना अथवा यंत्रणा किती सक्षम आहेत हे यावरु ण कळते.