शहरं
Join us  
Trending Stories
1
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
2
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
3
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
4
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
5
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
6
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
7
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
8
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
9
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
10
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
11
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
12
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
13
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
14
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
15
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
16
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
17
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
18
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
19
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
20
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?

महावितरणचा सबस्टेशन घोटाळा, बेकायदा भराव, वसई महापालिकेची महावितरणला एमआरटीपीची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 03:11 IST

वसई : विरारमधील ८० गृह प्रकल्पासाठी २२/२२ केव्हीए सब स्टेशनला मंजूरी मिळाली असताना त्याठिकाणी महावितरणने ते साकारण्याऐवजी तिथे अनधिकृत इमारत बांधून प्रत्यक्षात दुस-या गृह प्रकल्पाच्या सबस्टेशनमधून वीज पुरवठा करून कोट्यवधी रुपयांचा सबस्टेशन घोटाळा केल्याचा प्रकार उजेडात आला

शशी करपे वसई : विरारमधील ८० गृह प्रकल्पासाठी २२/२२ केव्हीए सब स्टेशनला मंजुरी मिळाली असताना त्याठिकाणी महावितरणने ते साकारण्याऐवजी तिथे अनधिकृत इमारत बांधून प्रत्यक्षात दुस-या गृह प्रकल्पाच्या सबस्टेशनमधून वीज पुरवठा करून कोट्यवधी रुपयांचा सबस्टेशन घोटाळा केल्याचा प्रकार उजेडात आला आहे.सबस्टेशनच्या नावाखाली अनधिकृत बांधल्याप्रकरणी महापालिकेने महावितरणला एमआरटीपीची नोटीस बजावली आहे. तर बेकायदा माती भराव केल्याचा अहवाल मंडळ अधिका-यांनी तहसिलदारांना सादर केला आहे. वसई तालुक्यातील मौजे डोंगरे/चिखलडोंगरे व बोळींज येथे सुरु असलेल्या ५२५ एकर जागेवरील गृह प्रकल्पातील ८० बांधकाम व्यावसासियाकांना १६ हजार ४६५ घरगुती मीटर, १ हजार ५०० व्यावसायिक मीटर, २ डिपार्टमेंटल स्टोअर्स, ३ कमर्शिअल युनिटस व २ मल्टिप्लेक्स मीटर जोडणीसाठी आवश्यक असलेल्या विविध क्षमतेच्या ८० रोहित्रांसाठी २२/२२ केव्हीए सब स्टेशन (स्विचिंग स्टेशन) मंजूर केले होते. त्यासाठी १२ कोटी ४१ लाख १० हजार ७८५ रुपयांच्या अंदाजित रकमेला प्रशासकीय मंजुरी मुख्य अभियंता (कल्याण) यांनी १२ मार्च २०१५ रोजी दिली होती. स्विचिंग स्टेशनसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीला एका विकासकाने मौजे डोंगरे येथील सर्व्हे क्रमांक ४९/१/१ ही दोन हजार चौरस मीटरची जागा ९९ वर्षाच्या करारावर १० सप्टेंबर २०१५ रोजी हस्तांतरित केली होती.प्रत्यक्षात मात्र या जागेवर सबस्टेशन बांधण्यात आले नसल्याची बाब शिवसेना नगरसेवक धनंजय गावडे यांनी माहितीच्या अधिकारात मागवलेल्या माहितीवरून उजेडात आली आहे.या जागी फक्त तळमजला अधिक दोन मजली इमारत बांधली गेली असताना वसईच्या अधिक्षक अभियंत्यांनी सबस्टेशनचे ७० टक्के बांधकाम पूर्ण झाल्याचा अहवाल २१ सप्टेंबर २०१७ रोजी दिले आहे. या सबस्टेशनमधून विविध क्षमतेचे ८० ट्रान्सफॉर्मर मंजूर करण्यात आले असून त्यातील ४ ट्रान्सफॉर्मरना अंशिक कार्यान्वित करण्याची परवानगी दिल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. तर पूनम मेगा डेव्हलपर्स व भूमी आर्केड इमारतीला लिफ्ट व वॉटर पंप कनेक्शनकरता वीज जोडणीची मंजुरी दिल्याचेही त्यांनी सांगितले आहे. मात्र, विरार येथील अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांनी १६ सप्टेंबर २०१७ रोजी दिलेल्या पत्रात धक्कादायक माहिती दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार आतापर्यंत १ हजार २८ घरगुती व व्यावसायिक सिंगल फेज मीटर इमारतींना जागेवर लावण्यात आले आहेत. त्यासाठी ४ इन डोअर ट्रान्सफॉर्मर लावण्यात आले असून या ट्रान्सफॉर्मरना २२/२२ केव्हीए ग्लोबल सिटी स्विचिंग स्टेशनमधून वीजपुरवठा देण्यात आल्याची धक्कादायक बाब त्यातून उजेडात आली आहे.दरम्यान, महावितरणने बेकायदा माती भराव केला असून बांधकामाला कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांच्यावर कार्यवाही व्हावी, असा अहवाल विरार मंडळ अधिकारी संजय सोनावणे आणि तलाठी अक्षता गायकर यांनी वसईच्या तहसिलदारांना ७ सप्टेंबर २०१७ ला पाठवला आहे.>आता खरे कोण? अधीक्षक अभियंता की महापालिकाएकीकडे अधिक्षक अभियंता सब स्टेशनचे ७० टक्के बांधकाम पूर्ण झाले असल्याचा दावा करीत असताना महापालिकेच्या नगररचना विभागाने सब स्टेशनसाठी महावितरणकडून कोणत्याही प्रस्ताव सादर करण्यात आला नसल्याची माहिती २२ सप्टेंबर २०१७ च्या पत्रातून दिली आहे. नगरचना विभागाने आयुक्त आणि सहाय्यक आयुक्तांना महावितरणने बेकायदा बांधकाम केल्याने त्यांच्यावर एमआरटीपी अंतर्गत कारवाई करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार सहाय्यक आयुक्त मोहन संख्ये यांनी २ हजार ८६४ चौरस मीटर अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी महावितरणचे विरार विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांना १७ आॅक्टोबर २०१७ रोजी नोटीस बजावली आहे.>मंजूर सबस्टेशन न बांधता महावितरणची दिशाभूल करून कोट्यवधी रुपये लाटण्यात आले आहेत. बेकायदेशीर वीज पुरवठा करण्यासाठी ओव्हरहेड एच. टी. लाईन व ८० आऊटडोअर ट्रान्सफॉर्मर मंजूर केल्याने भविष्यात येथील जनतेच्या जीवास धोका निर्माण होणाºया सब स्टेशनची मान्यता रद्द करण्यात यावी. बेकायदेशीरपणे देण्यात आलेल्या १ हजार २८ वीज जोडण्या आणि ४ ट्रान्सफॉर्मरचा वीज पुरवठा खंडीत करण्यात यावा. तसेच संगनमताने आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी बिल्डर आणि महावितरणच्या अधिकाºयांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.- धनंजय गावडे, नगरसेवक

टॅग्स :Vasai Virarवसई विरार