शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

ऐन दिवाळीत महावितरणचा लपंडाव, नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 02:25 IST

तालुक्याच्या परिसरातील विविध गावांमध्ये होणा-या भारनियमना व्यतिरीक्त विजेच्या लंपडावामुळे अगोदरने नागरिक त्रस्त झाले आहे.

विक्रमगड : तालुक्याच्या परिसरातील विविध गावांमध्ये होणा-या भारनियमना व्यतिरीक्त विजेच्या लंपडावामुळे अगोदरने नागरिक त्रस्त झाले आहे. त्यातच गेल्या आठवडाभरा पासुन दिवसभर लाईट गुल होत असल्यामुळे गावकºयांचे तसेच विजेवर अवलंबुन असणाºया व्यवसायिकांचे प्रचंड हाल होत आहेत. गेले काही दिवस रोज दिवसभर वीज गुल होत असल्याने दिवाळीचा फराळ करतांना महिलांना सुद्धा मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.दिवसा कामाच्या वेळी वीज नसणे तसेच रात्री अपरात्री ती गुल होणे या प्रकारामुळे अनेकांना सध्या झोपमोडीचा त्रास होत आहे. दिवाळीच्याकाळात खरेदीसाठी बाजार गर्दी असते मात्र विजे आभावी व्यावसायिकांना खरेदी विक्रीचे व्यवहार सुरळीत ठेवण्यात अनेक अडचणी येत आहेत.गेल्या काही दिवसांपासून या भागामध्ये वादळी वाºयासह पाऊस सुरु असतो. त्यातच वीज पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. परिणामी अनेक विजेचे पोल वाकले असून वाहिन्याही तुटल्या आहेत. हा परिसर दुर्गम व जंगलपट्टीचा असल्याने महावितरणलाही तो सुरळीत करतांना मोठी मशक्कत करावी लागत आहे.विक्रमगड पंचायत समितीने पावसाळ्या आगोदर चांगली साफ सफाई न केल्याने डासांचा प्रश्न गंभीर आहे. त्यातच वीज नसल्याने सायंकाळी व रात्री त्यांचा मोठा त्रास होत आहे. यामुळे अनेकांना हिवतापाची बांधा झाल्याचे ही दिसून येत आहे. दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या असल्या तरी परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना अभ्यासात खूप व्यत्यय आल्याचे पालकांनी लोकमत केडे बोलून दाखविले.विक्र मगड तालुक्यावर महावितरण इतर तालुक्याच्या मानाने अन्याय करीत असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहे. तालुक्याला सध्या विजेच्या प्रश्नाने पुर्ते ग्रासले आहे. चोवीस तासापैकी काही तास वीज उपलब्ध होत असते. त्यातही सातत्य नसल्याने त्याचा दिवसा फारसा उपयोग नाही. त्यामुळे महावितणाच्या विजे संबंधीत असलेल्या या गाफिल कामाविषयी नागरिकांमधुन नाराजीचा सुर उमटत आहे.अनेक मीटर धारकांना अधिकचे बील आकारणी हा प्रश्न जुनाच असून विजेचा लंपडाव आधिची डोकेदुखी वाढवणारी आहे. विजेवर चालणारी उपकरणे बंदच असतात. किंवा कमी दाबाच्या प्रवाहामुळे ती चालत नाहीत. विजेचा वापर होत नसतांनाही महावितरणाकन ग्राहकांकडून वीजबील वसुली करीत आहे. विज बीले वेळेवर भरली नाहीत तर पुरवठा खंडीत केला जात आहे.कामाच्या वेळेत वीज नसते महावितरणचे बिल मात्र मोठे असतेआज विक्र मगडमध्ये वीज पहाणेच दुर्लभ झाले आहे. कारण ज्यावेळेस विजेची आवश्यकता असेते तेव्हा ती नसते त्यामुळे येणारे बील कशाचे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. वीज वापरापेक्षा येणाºया प्रचंड बिलामुळे नागरिक संतप्त झाले आहे. अनेकवेळा पुरवठा खंडीत होतो. याचा फटका विजेवर आधारीत व्यवसायीकांना होत असून विक्र मगड तालुक्यातील झेरॉक्स, कम्प्युटर, दुकानदार संताप व्यक्त करीत आहेत.छोटे मोठे व्यवसाय करणारे व्यवसायिक आहेत. या विजेच्या समस्येमुळे या व्यवसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला असल्याने काही बाहेरील व्यवसायिक दुसरे शहरांकडे स्थलातरीत झाले आहेत. त्यामुळे महावितरणाने इतर तालुक्याप्रमाणे विक्र मगड तालुक्याकडे गांभीर्याने पाहुन विजेची समस्या सोडवावी व विज ग्राहकांना दिलासा दयावा अशी एकमुखी मागणी होत आहे.

टॅग्स :Power Shutdownभारनियमन