शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
2
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
3
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
4
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
5
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
6
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
7
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडी वि. भाजप पालघरमध्ये रंगणार सामना; जि.प.च्या रिक्त जागांचे आरक्षण जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 02:53 IST

घडामोडींकडे साऱ्यांचे लक्ष, सध्या राज्य पातळीवर महाविकास आघाडीला कोंडीत पकडण्यासाठी भाजपकडून एकही संधी सोडला जात नसल्याने या निवडणुकीत भाजपच्या चारही जागा जिंकून जिल्ह्यात भाजपला मोठे खिंडार पाडण्यासाठी महाविकास आघाडीकडून मोर्चेबांधणीला सुरुवात करण्यात आली आहे. 

पालघर : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने पालघर जिल्हा परिषदेच्या रिक्त झालेल्या १५ जागांचे आरक्षण नव्याने घोषित झाले आहे. या सर्व जागांसाठी भाजप स्वबळावर लढणार असून, ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी थेट लढली जाण्याची चिन्हे दिसत आहेत. दरम्यान, राज्यपातळीवर भाजप आणि महाविकास आघाडीमधील ताणल्या गेलेल्या संबंधांमुळे जिल्ह्यातील या निवडणुका अटीतटीने लढल्या जाणार हे जवळपास नक्की झाले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने पालघर जिल्हा परिषदेच्या रिक्त झालेल्या १५ जागांसाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यात सर्वसाधारण ७ गटांसाठी तलासरी तालुक्यातील उधवा, डहाणू तालुक्यातील सरावली वनई, विक्रमगड तालुक्यातील आलोंडे, मोखाडा तालुक्यातील आसे, वाडा तालुक्यातील मोज, मांडा असे आरक्षण जाहीर झाले. तर अन्य ८ जागांसाठी सर्वसाधारण स्त्री असे आरक्षण डहाणू तालुक्यातील कासा, बोर्डी, मोखाडा तालुक्यातील पोशेरा, वाडा तालुक्यातील गारगाव, पालसई, आबिटघर तर पालघर तालुक्यातील सावरे-एम्बूर आणि नंडोरे-देवखोप जाहीर करण्यात आले आहे.जिल्हा परिषदेच्या एकूण ५७ सदस्यांपैकी शिवसेनेकडे १८, राष्ट्रवादी १४, भाजप १२, माकप ५, बविआ ४, अपक्ष ३ तर काँग्रेस १ असे बलाबल असून महाआघाडीची सत्ता जिल्हा परिषदेवर आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने १५ रिक्त झालेल्या जागांपैकी राष्ट्रवादी ७, भाजप ४, शिवसेना ३ व १ सीपीएमच्या सदस्यांना फटका बसला होता. या १५ जागांसाठी होणारी निवडणूक शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, बविआ अशा महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी रंगण्याची चिन्हे असून भाजपने पंधराही जागांवर आपले उमेदवार उभे करणार असल्याचे संकेत दिले आहेत. सध्या राज्य पातळीवर महाविकास आघाडीला कोंडीत पकडण्यासाठी भाजपकडून एकही संधी सोडला जात नसल्याने या निवडणुकीत भाजपच्या चारही जागा जिंकून जिल्ह्यात भाजपला मोठे खिंडार पाडण्यासाठी महाविकास आघाडीकडून मोर्चेबांधणीला सुरुवात करण्यात आली आहे. 

सांबरे, ठाकरे, चुरी यांना मिळाला दिलासाजिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती नीलेश सांबरे, समाजकल्याण सभापती अनुष्का ठाकरे, कृषी सभापती सुशील चुरी या तीनही सदस्यांच्या मतदारसंघात सर्वसाधारण गटाचे आरक्षण जाहीर झाल्याने त्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. या १५ जागांमधील आरक्षण जाहीर झाल्याचा फटका फक्त वाडा तालुक्यातील आबिटघर गटातून निवडून आलेले राष्ट्रवादीचे गटनेते नरेश आकरे आणि पालसई गटातून निवडून आलेले शशिकांत पाटील या दोघांना बसत असून त्यांच्या गटात सर्वसाधारण स्त्री आरक्षण जाहीर झाले आहे.जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती नीलेश सांबरे, समाजकल्याण सभापती अनुष्का ठाकरे, कृषी सभापती सुशील चुरी या तीनही सदस्यांच्या मतदारसंघात सर्वसाधारण गटाचे आरक्षण जाहीर झाल्याने त्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. या १५ जागांमधील आरक्षण जाहीर झाल्याचा फटका फक्त वाडा तालुक्यातील आबिटघर गटातून निवडून आलेले राष्ट्रवादीचे गटनेते नरेश आकरे आणि पालसई गटातून निवडून आलेले शशिकांत पाटील या दोघांना बसत असून त्यांच्या गटात सर्वसाधारण स्त्री आरक्षण जाहीर झाले आहे.

 

 

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस