शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

Vidhan Sabha 2019: प्रदीप शर्मा हा पोलीसवाला गुंडा; हितेंद्र ठाकूर यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 12:50 AM

'एन्काउंटर केले तरी साधे खरचटलेही कसे नाही?'

नालासोपारा : नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून सेनेने प्रदीप शर्मा यांना उमेदवारी दिल्यानंतर शर्मा यांनी केलेल्या आरोपांना बविआचे सर्वेसर्वा, अध्यक्ष आणि वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी शुक्रवारी प्रत्युत्तर देताना शर्मा हा पोलिसवाला गुंडा असून बनावट एन्काऊंटर करणारा हा पोलीस अधिकारी होता, अशी टीका पत्रकार परिषदेत केली. आता वर्दी उतरली असल्याने शर्मा सामान्य माणूस आहे, याचे भान त्यांनी ठेवावे, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.आ. ठाकूर म्हणाले की, काही बनावट आणि फेक एन्काउंटर करून १३ पोलिसांना फसवले होते. अशा फसवणूक करणाऱ्याला शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. पी.एस. फाउंडेशनकडे गणपती, दहीहंडी अशा सणांमध्ये बॅनरबाजी, टी शर्ट छापण्यासाठी आणि छत्र्या वाटण्यासाठी पैसे कुठून आले याची माहिती काढा. पैशाच्या जीवावर वसईत निवडणूक जिंकता येत नाही. वर्तमानपत्रात, मीडियात हवा निर्माण केला जात आहे. इतके एन्काउंटर केले तरी साधे खरचटलेही कसे नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पोलीस खात्यात सर्व्हिसला कधी लागले, तारीख किती, जे कोणी गँगस्टर असतील त्यांनी देश सोडल्याची तारीख बघा. सर्व पत्ते उघड होतील आणि जे गँगस्टर पळाले की पळवले हे पण तपासा, असे बोलून शर्मा यांच्या पोलीस खात्यामधील सेवेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.माझ्या पक्षात जात, धर्म पाहिला जात नाही. जो खरोखरच काम करणारा खंदा कार्यकर्ताला मोठ्यातले मोठे पद दिले आहे. पण सेनेने आयात करून उमेदवारी देत निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलले असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.मुंबईत, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, भिवंडी येथे पुराचे किती पाणी जमा झाले होते. या तुलनेत दीडपट पाऊस वसईत पडल्याने काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. पुढच्या वर्षी वसई-विरार महापालिकेच्या हद्दीत पावसाचे पाणी भरणार नाही. ३० ते ४० वर्षे जुन्या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी जिल्हा बँकेतून कमी व्याजामध्ये कर्ज देऊन या इमारती उभ्या करण्यासाठी लागणाºया परवानग्या लवकरात लवकर मिळेल, यासाठी पालिकेला सांगण्यात येईल, असे ठाकूर म्हणाले. विविध पक्षांतील उमेदवाराने आमनेसामने यावे, असे आव्हान नालासोपाºयाचे आ. क्षीतिज ठाकूर यांनी केले आहे. बविआ ही निवडणूक शिट्टी या निशाणीवर लढणार असल्याचेही यावेळी सांगितले.बोगस मतदारनोंदणी करणाऱ्यांना न्यायालयात खेचण्याचा इशाराबोगस मतदारांची रीतसर तक्र ार जिल्हाधिकारी यांना तक्र ार केलेली आहे. पत्रकारांनीही बोगस मतदानाबाबत आवाज उठवा, असे आवाहन त्यांनी केले. पी.एस.फाउंडेशनने बोगस मतदार तयार करण्याचे काम केले आहे. त्यामुळे चूक झाली तर भारी पडेल. निवडणूक जिंकणारच, पण बोगस नावे नोंदवणाºयांना कोर्टात खेचणार असल्याचे ठाकूर म्हणाले.शर्मा याने हातकडी बांधून एन्काऊंटर केले आहेत. लखनभैेया याचेही बनावट एन्काउंटर केल्याचा आरोप ठाकूर यांनी केला. बविआतर्फेकोण उमेदवार कुठे उभे राहणार, याबाबत त्यांनी बोलणे टाळले. तीन आमदार पालघर जिल्ह्यात उभे राहणार असून कोणाशी युती झाल्यास सहा उमेदवार उभे करणार असल्याची तयारी आहे.सर्वच पक्षांचे कार्यकर्ते निवडणुकीत मला मदत करणार आहेत. १२ महिने राहणारा उमेदवार पाहिजे की शिमग्याला येणारा हे मतदार ठरवतील, यांच्याकडे उमेदवार नसल्याने आयात करून उमेदवार उभे केले आहेत. काँग्रेसमधून एक, रिटायर्ड पोलीस अधिकारी आणि आमचा आमदार घेतला, अशी टीकाही ठाकूर यांनी शिवसेनेवर केली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Hitendra Thakurहितेंद्र ठाकूरShiv Senaशिवसेना