शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Lockdown : विरारला रेशनसाठी लांबच लांब रांग!, लॉकडाऊनची नागरिकांमध्ये पुन्हा धास्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2021 23:58 IST

Maharashtra Lockdown : कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि त्या तुलनेत वैद्यकीय सुविधांचा असलेला अभाव यामुळे चिंता व्यक्त केली जात असून येत्या दोन दिवसांत पुन्हा एकदा कडक लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत.

विरार : वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता राज्य सरकारने पुन्हा एकदा कडक ‘लॉकडाऊन’चे संकेत दिले असल्याने नागरिकांची धास्ती वाढली आहे. याचा परिणाम म्हणून विरारमधील रेशन दुकानांवर सोमवारी सकाळपासून टोकन घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि त्या तुलनेत वैद्यकीय सुविधांचा असलेला अभाव यामुळे चिंता व्यक्त केली जात असून येत्या दोन दिवसांत पुन्हा एकदा कडक लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. येत्या दोन दिवसांत असा निर्णय झाल्यास अन्नधान्याची गरज लक्षात घेऊन वसई-विरारमधील कार्डधारकांनी सकाळपासूनच रेशनिंग दुकानांवर टोकनसाठी रांग लावली होती. विरार-मनवेलपाडा येथील रेशन दुकानावर शेकडो लोकांनी रांग लावल्याने ही रांग एक किलोमीटरपर्यंत गेली होती. अचानक कार्डधारकांनी गर्दी केल्याने रेशन दुकानदारांचीही तारांबळ उडाली. त्यामुळे या दुकानदारांकडूनही तत्काळ टोकन वाटप करण्यात आले. टोकन वाटप झालेल्या कार्डधारकांना उद्यापासून धान्यवाटप करण्यात येणार असून; ३०० टोकनधारकांना एका दिवसात धान्यवाटप करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती रेशन दुकानदारांकडून देण्यात आली. एका रेशन दुकानावर अंदाजे २५०० कार्डधारक आहेत. या कार्डधारकांना तांदूळ व गहू वाटप करण्यात येणार आहे. लॉकडाऊन निर्णयाअगोदर पुढील दोन दिवसांत कार्डधारकांना धान्यवाटप करताना दुकानदारांचीही कसोटी लागणार आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर नागरिकांना सर्वाधिक पोटापाण्याचा प्रश्न भेडसावला होता. हातावर पोट असलेल्या अनेकांची गुजराण या दिवसांत रेशनच्या धान्यावरच झाली होती, मात्र रेशनवरील धान्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागली होती; वसई-विरारमध्ये तर पहाटेपासून लोक रेशनच्या रांगेत दिसत होते. 

आम्ही योग्य नियोजन करीत आहोत. लोकांना समजावूनही लोक उगाच गर्दी करत आहेत. एका वेळी ३०० कार्डधारकांना टोकन दिले जात आहेत. उद्या सकाळपासून त्यांना धान्य वाटप केले जाईल. - रेशन दुकानदार, मनवेलपाडा 

वीकेंड लॉकडाऊनमुळे दोन दिवस दुकान बंद होते. त्यामुळे लोकांनी अचानक गर्दी केली. टोकन देण्यास संबंधित दुकानदारांना सांगितले आहे. ३० एप्रिलपर्यंत रेशन दुकाने सुरूच राहणार आहेत.      - रोशन कापसे, पुरवठा अधिकारी 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस