शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2024 21:25 IST

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: नालासोपारा विरार भागात झालेल्या घटनेनंतर हितेंद्र ठाकूर हे नाव चर्चेत आले आहे. वसई-विरार भागात 'आप्पा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हितेंद्र ठाकूर यांची कारकीर्द फारच 'वाद'ळी आणि वादग्रस्त राहिली आहे. 

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024:नालासोपारा विरार भागात आज मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भाजपा नेते विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटप करत असल्याचा आरोप केला. त्यानंतर स्थानिक आमदार क्षितिज ठाकूर आणि हितेंद्र ठाकूर येथे आले. त्यांनीही सुरुवातीला तावडे आणि भाजपावर तोंडसुख घेतलं, पण थोड्याच वेळात हे पिता - पुत्र तावडेंसोबत पत्रकार परिषद घेताना दिसले. इतकेच कशाला, विनोद तावडे यांना नंतर ते आपल्याच कारमधून घेऊन जातानाही दिसले. त्याने सगळेच अवाक् झाले.

या घटनेनंतर हितेंद्र ठाकूर हे नाव चर्चेत आले आहे. वसई-विरार भागात 'आप्पा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हितेंद्र ठाकूर यांची कारकीर्द फारच 'वाद'ळी आणि वादग्रस्त राहिली आहे. 

वसई - विरारचे 'भाई' ठाकूर 

मुंबईत ज्या काळात गँगवॉर होत होती, तेव्हा वसई-विरार भागात भाई ठाकूर या नावाची दहशत होती. त्यांच्या विरोधात एक शब्द काढायची कुणाचीच हिंमत नव्हती. पुढे एका हत्या प्रकरणात भाई ठाकूर यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर टाडा अंतर्गत खटला चालवण्यात आला. खटला पुढे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टापर्यंत गेला. दरम्यानच्या काळात, मुंबईतील टोळ्यांचा खात्मा झाला, वसई विरार मधील वातावरणही बदललं.

भाई ठाकूर यांचे बंधू हितेंद्र ठाकूर यांनी वेगळी वाट धरत ते राजकारणात सक्रीय झाले. आणि पुढे राजकारणाच्या माध्यमातून आपला प्रभाव वसई-विरार भागावर कायम ठेवला. 

हितेंद्र ठाकूर यांचे राजकारण

हितेंद्र ठाकूर महाराष्ट्रातील बहुजन विकास आघाडी या राजकीय पक्षाचे अध्यक्ष असून ते १९८८ सालापासून राजकारणात आहेत. हितेंद्र ठाकूर १९८८ मध्ये वसई तालुका युवा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. दोन वर्षांनंतर १९९० च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वयाच्या २९ व्या वर्षी काँग्रेसमधून वसई-विरारसाठी आमदार म्हणून निवडून आले. यानंतर हितेंद्र ठाकूर यांनी वसई विकास मंडळ नावाचा स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन केला, जो बहुजन विकासात आघाडीत परिवर्तित झाला. यानंतर हितेंद्र ठाकूर यांनी सलग तीन निवडणुका जिंकल्या. बहुजन विकास आघाडीकडे वसई विरार महानगरपालिका, वसई तालुका पंचायत समिती आणि या भागातील विविध ग्रामपंचायतींमध्ये बहुमत आहे. एकेकाळी, शरद पवार यांचे निकटवर्तीय अशी हितेंद्र ठाकूर यांची ओळख होती.

वाद...घोटाळा... खटला...

२०१४ च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात हितेंद्र ठाकूर यांनी त्यांच्यावर ८ फौजदारी खटले असल्याचे म्हटले आहे. तसेच पीएमसी बँक घोटाळ्यातही हितेंद्र ठाकूर यांचे नाव पुढे आले  होते. त्यांच्या व्हिवा ग्रुप ऑफ कंपनीजवर ईडीने मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली छापेमारी केली होती. 

क्षितिज ठाकूर यांचे मारहाण प्रकरण

हितेंद्र ठाकूर यांचे पुत्र क्षितीज ठाकूर हे सध्या आमदार आहेत. आज विरारमध्ये जे घडलं, त्यात तेही प्रकाशझोतात होते. काही वर्षांपूर्वी एका मारहाण प्रकरणात तेही अडचणीत आले होते. 

विधानभवन परिसरात पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना त्यांनी मारहाण केली होती. वांद्रे-वरळी सी- लिंक येथे क्षितिज ठाकूर यांची कार अडवली होती. कारची वेगमर्यादा अधिक असल्याबद्दल त्यांना ७०० रुपये दंड ठोठावण्यात आला होता. यानंतर हे प्रकरण पुढे बरेच वाढले. या प्रकरणी हक्कभंगाचा प्रस्ताव मांडतानाही प्रेक्षक गॅलरीतून सूर्यवंशी यांनी आक्षेपार्ह हातवारे करत आपल्याला धमकी दिल्याच आरोप क्षितिज ठाकूर यांनी केला होता.

दरम्यान, या विधानसभा निवडणुकीत क्षितिज ठाकूर नालासोपारा मतदारसंघातून पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. क्षितिज ठाकूर यांच्याविरोधात भाजपाने राजन नाईक यांना उमेदवारी दिली आहे. मध्यंतरीच्या काळात भाजपा महायुतीसोबत हितेंद्र ठाकूर यांचे संबंध ताणले गेले होते. त्यानंतर हितेंद्र ठाकूर यांनी निवडणुकीत महाविकास आघाडीची मदत मागितली होती.

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४thane kokan regionThane Kokan Assembly Election 2024nalasopara-acनालासोपाराHitendra Thakurहितेंद्र ठाकूरKshitij thakurक्षितिज ठाकूरVasai Virarवसई विरार