शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

दुप्पट फायदा देण्याचे आमिष : सॅलव्हेशन ग्रुप आॅफ कंपनीकडून ५ ते ८ कोटींचा चुना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 12:07 AM

सॅलव्हेशन ग्रुप आॅफ कंपनी या गुंतवणूक करणाऱ्या कंपनीच्या नावावर दुप्पट फायदा देण्याचे आमिष दाखवीत ग्रामीण भागातील अशिक्षित गुंतवणूकदारांना सुमारे ५ ते ८ कोटी रु पयांचा गंडा घातला.

पालघर : सॅलव्हेशन ग्रुप आॅफ कंपनी या गुंतवणूक करणाऱ्या कंपनीच्या नावावर दुप्पट फायदा देण्याचे आमिष दाखवीत ग्रामीण भागातील अशिक्षित गुंतवणूकदारांना सुमारे ५ ते ८ कोटी रु पयांना फसविणा-या तीन कंपनी संचालकाना पालघर पोलिसांनी अटक केले आहे.न्यायालयाने त्यांना शुक्र वार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया आणि तत्सम शासनाच्या कुठल्याही परवानग्या न घेता साल्व्हेशन ग्रुप आॅफ कंपनीज या नावाची कंपनी भार्इंदर आणि मुंबईतील काही लोकांनी उघडली. ‘दुनिया झुकती है झुकाने वाला चाहीये’ या म्हणी प्रमाणे दुप्पट, तिप्पट रक्कमेचे आमिष दाखवीत या कंपनीच्या संचालकांनी जिल्ह्यातील नंदन म्हात्रे या तरु णाला हाताशी धरले. त्यांनी जिल्ह्यातील वाडा, काटाळे, निहे, वंदिवली आदी ग्रामीण भागातील काही महिलांचा विश्वास संपादन केला. मी स्वत: व माझी पत्नी या कंपनीचे डायरेक्टर असल्याचे सांगून चेअरमन संजय नून (रा. उत्तन, भार्इंदर) सतीश धारावी (बोर्डी), देवराज राठोड (सातारा), प्रा.चंद्रकांत पवार (वसई) हे अन्य पदाधिकारी असल्याचे सांगून सर्व पैशाची हमी माझी राहील असा विश्वास दिला.वर्षभरात बँके पेक्षा आकर्षक व्याज, पाच-सहा वर्षात दुप्पट रक्कम अशी आमिषे गुंतवणूकदारांना दाखिवण्यात आल्या होत्या. तर या कंपनीचे सभासद बनलेल्याना ही मोठे कमिशन, परदेशी वाºया करण्यात आल्या होत्या. त्यामुळे शेकडो सभासद ह्या कंपनी कडे आकर्षित झाले होते.१९९९ पासून या कंपनीने पहिल्या काही वर्षात गुंतवणूक दारांना मॅच्युरिटी रक्कम ही दिल्याने सेवानिवृत्त झालेल्या, मुलाच्या शिक्षणाची, मुलींच्या लग्नासाठी गुंतवणूक म्हणून लोकांनी रक्कम गुंतवली. पोलिसांकडून प्राथमिक ही रक्कम ६० लाखात सांगितली जाते असली तरी दोन महिलांनी सुमारे १ कोटी ५५ लाखाची रक्कम गुंतविल्याचे लोकमत ला सांगितले. अशा फसवणूक करणाऱ्यांची ४०० च्यावर सभासद असून ही रक्कम ५ ते ८ कोटी पर्यंत जाण्याची शक्यता वर्तिवली जातआहे.मॅच्युरिटीची रक्कम न मिळाल्याने बोंबाबोंबसुरु वातीला मिळणारी मॅच्युरिटी ची रक्कम २०१५ पासून येणे बंद झाल्यावर सर्व सभासदांनी पैश्याचा तगादा लावला,मात्र पैसे देण्याबाबत उडवाउडवीची उत्तरे येऊ लागली.पैसे वेळेवर मिळत नसल्याने गुंतवणूकदारांनी कंपनीच्या सभासदाकडे तगादा लावला.शेवटी कंपनी कडून पैसे येत नसल्याने ही कंपनी आणि त्यांच्या सर्व संचालका विरोधात बोगस दस्तावेज बनविणे,फसवणूक आणि एमपीआयडी (३,४)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.पालघर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी दशरथ पाटील यांनी स्वत: या प्रकरणात विशेष लक्ष पुरवीत या कंपनीचे चेअरमन संजय नून,नंदन म्हात्रे,जागृती म्हात्रे यांना अटक केली. तर अन्य संचालकांचा पोलीस शोध घेत आहेत.अपूर्व आरोपींना मंगळवारी पालघर न्यायालयात नेले असता न्यायालयाने त्यांना शुक्र वार(१० मे)पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :palgharपालघरfraudधोकेबाजी