शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

FASTagमधून स्थानिक वाहनधारकांना सवलत द्या; आमदार राजेश पाटील यांच्यासह स्थानिकांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 13:40 IST

खानिवडे टोल नाक्यावर ठिय्या आंदोलन; स्थानिकांसह आमदार राजेश पाटील यांचा सहभाग

वसई: आजपासून महाराष्ट्रात अनेक टोल नाक्यांवर FASTag प्रणाली सुरू झाली आहे मात्र टोल कंपनी चालक त्या- त्या विभागातील स्थानिक  वाहनधारकांना या टोल वसुलीतून कोणत्या प्रकारे सुट देणार  आहेत, याचा कोणताही खुलासा न करता सरसकट FASTag प्रणाली मधून टोल घेतला जाणार असल्याच्या पार्श्वभूमीवर त्याचा खानिवडेस्थित टोल कंपनीला जाब विचारण्यासाठी बोईसर विधानसभेचे बविआचे आमदार राजेश पाटील यांनी कार्यकर्ते व ग्रामस्थांना सोबत घेत आज सकाळी ९ वाजता खानिवडे टोल नाक्यावर ठिय्या आंदोलन करत टोल कंपनीने स्थानिक वाहन चालकाना fastag प्रणालीतून सूट देण्याची मागणी केली.

दरम्यान राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) यांनी FASTag ह्या प्रणालीचा वापर करून वाहनधारकांच्या खात्यातून थेट टोल रक्कम वसूल करण्याचे निश्चित केले आहे. मात्र वसई तालुक्यातील  स्थानीक वाहनधारकांना याचा  मोठा आर्थिक भुर्दड सहन करावा लागणार आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाचा करार हा राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) यांनी IRB या कंपनी सोबत केला असून टोल वसुलीचे अधिकार IRB या कंपनीला दिलेले आहेत. 

खानिवडे टोल कंपनीने करार पाळावा; सोयी सुविधांची वानवाटोल वसुली कराराची मुदत संपण्यासाठी अवघे काही महिने शिल्लक आहेत. मात्र अजूनही राजमार्गाचे काम पूर्ण झालेले नाही. जवळ जवळ सर्वच सर्व्हिस रोड अपूर्ण अवस्थेत आहेत, उड्डाणपूलांवर व खाली लाईटची व्यवस्था नाही, माहितीचे फलक लावलेले नाहीत, ट्रॉमाकेअर सेंटर नाही, अद्ययावत रुग्णवाहिका नाही, क्रेन मशीन नाही, शौचालयांची सुविधा नाही सर्वात महत्वाचे म्हणजे करारानुसार सुसज्ज वाहनतळ तयार करणे बंधनकारक असताना वाहनतळ बनवले नाही, हायवे लगतच्या हाॅटेल्सना बेकायदेशीरपणे साईड सुरक्षा कठडे तोडून रस्ते करून दिले आहेत, ज्यामुळे मोठे अपघात होत आहेत. अशा अनेक समस्या असताना केली जाणारी टोल वसुली ही अन्यायकारक असल्याचे आमदार राजेश पाटील यांनी लोकमतला सांगितले. तर करारानुसार स्थानिक वाहनधारकांना टोल रक्कमेमध्ये सवलत आहे. मात्र FASTag प्रणालीमध्ये सर्वाची टोल रक्कम एक-सारखी समान वसूल केली जाणार आहे त्यामुळे स्थानिक वाहनधारकांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. 

टॅग्स :Fastagफास्टॅगNHAIभारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण