शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

व्यवसाय करायचा तर आता परवाना होणार बंधनकारक    

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2020 23:55 IST

Vasai-Virar Municipal Corporation : पालिकेच्या सर्वेक्षणानुसार वसई-विरार शहरात एक लाख २० हजार दुकानदार आहेत. त्यात किरकोळ विक्रेत्यांचाही समावेश आहे.

नालासोपारा : वसई-विरार महानगरपालिकेच्या क्षेत्राअंतर्गत ज्या दुकानदारांना, व्यावसायिकांना व्यवसाय करायचा असेल तर मनपाचा ना हरकत परवाना बंधनकारक करण्यात आला आहे. किमान दीड हजारांपासून हा व्यवसाय कर मनपा आकारणार आहे. चालू आर्थिक वर्षापासून हे परवाने देण्यास सुरुवात केेली जाणार असल्याने पालिकेच्या तिजोरीत दरवर्षाला ७० ते ७५ कोटी रुपयांची वाढ होणार आहे.पालिकेच्या सर्वेक्षणानुसार वसई-विरार शहरात एक लाख २० हजार दुकानदार आहेत. त्यात किरकोळ विक्रेत्यांचाही समावेश आहे. वसई-विरार महापालिकेची स्थापना २००९ साली झाली. मात्र तेव्हापासून शहरातील व्यावसायिक आणि दुकानदार पालिकेला कर न देता व्यवसाय करत होते. महापालिकेचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी पालिकेने विविध स्रोतांचा अभ्यास सुरू केला होता. त्यावेळी दुकानदारांकडून मालमत्ता कर वगळता कुठलाही कर आकारला जात नसल्याचे लक्षात आले. यामुळे पालिकेने सर्व दुकानदारांना व्यवसाय कर लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी व्यवसाय परवाना काढावा लागणार आहे. ज्यांची कायमस्वरूपी दुकाने आहेत, त्यांना व्यवसाय परवाना काढावा लागणार आहेच. शिवाय जे तात्पुरता व्यवसाय करतील त्यांनाही परवाना काढावा लागणार आहे. शहरात चित्रीकरण केले जाते. तसेच सर्कस, मेळावे, व्यापारपेठेचे आयोजन केले जाते. या सर्वांना हा परवाना बंधनकारक होणार आहे. चित्रीकरणाला कर लागू झाल्याने पालिकेला मोठा आर्थिक फायदा होणार आहे. 

कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर ना हरकत परवाना घ्यावा लागतो. पण वसई-विरार महानगरपालिकेत याकडे दुर्लक्ष केले होते. नियमांप्रमाणे ना हरकत दाखल्याला लागणारी फी आकारली जाणार आहे. परवाना नूतनीकरणासाठी फी आकारली जाणार आहे. महानगरपालिकेकडे ना हरकत परवान्यामुळे दरवर्षी ७० ते ७५ कोटींची रेव्हेन्यूमध्ये भर पडणार आहे.- प्रदीप जांभळे-पाटील,     उपायुक्त, वसई-विरार महानगरपालिका

लोकांच्या सुविधेसाठी सोपी पद्धतपरवाना मिळावा म्हणून चालू वर्षाची घरपट्टी, दुकानाचे ॲग्रिमेंट, भाडेकरार, ओळखपत्राच्या साहाय्याने फॉर्म स्वतः कार्यालयात जाऊन भरु शकतात किंवा ऑनलाइन व महानगरपालिकेच्या वेबसाइटवरसुद्धा परवान्यासाठी अर्ज करू शकता. छोट्या दुकानदारांना, उद्योगधंद्यांना महानगरपालिकेचा परवाना मिळावा यासाठी सोपी पद्धत ठेवण्यात आली असल्याचे मनपा उपायुक्तांनी ‘लोकमत’ला सांगितले. 

अंमलबजावणीला सुरुवातnमहानगरपालिका क्षेत्रातील दुकानदार आणि व्यावसायिकांकडून लगेचच परवाना शुल्क आकारले जाणार आहे. त्यानुसार महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ३७६, ३७६ (अ) अंतर्गत नोटीस बजावण्याच्या कामाला नऊ प्रभागात सुरुवात केली आहे. nजागोजागी बॅनर, वर्तमानपत्रात जाहिराती, वेबसाइटवर ना हरकत दाखल्यासंबंधी महानगरपालिकेकडून आव्हान केले जात आहे. १५ दिवसांत ना हरकत दाखल्यासाठी अर्ज करावा लागेल. जे याकडे कानाडोळा करून व्यवसाय सुरू ठेवतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून दुकानांना सील केले जाईल.

 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार