शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
4
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
6
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
7
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
8
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
9
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
10
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
11
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
12
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
13
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
14
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
15
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
16
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
17
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
18
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
19
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात
20
वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी

बोर्डीतील विद्यार्थिनींना सुरक्षिततेचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 22:38 IST

स्पर्श, सवांदाच्या अर्थाची दिली माहिती; जाणीव ट्रस्टच्या माध्यातून अभियानाचे आयोजन

- अनिरुद्ध पाटीलडहाणू : जाणीव चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सुपेह विद्यालयातील आणि व. का. लाखणी माध्यमिक विद्यालयातील अशा एकूण ९१० विद्यार्थिनींना आत्मभान जागृत करून स्व-संरक्षण करणारे मार्गदर्शनपर व्याख्यान मिलिंद पोंक्षे आणि शिर्वरी कलगुटकर यांनी दिले. या कार्यक्र माचे आयोजन महिला दक्षता समिती घोलवड, स्फूर्ती महिला क्लब बोर्डी आणि मराठी विज्ञान परिषद बोर्डीच्यावतीने करण्यात आले होते.विरार येथे घडलेल्या एका दुर्दैवी घटनेतून जाणीव ही ट्रस्ट साकारण्यात आली. सार्वजनिक तसेच घरगुती पातळीवर मुलींना लैंगिक अत्याचार आणि वाईट नजरेचा सामना करावा लागतो. त्यामुळे असुरक्षिततेची भावना निर्माण होते. या करिता १२ ते १८ वयोगटातील विद्यार्थिंनिना चांगले व वाईट ओळखणे. स्पर्श तसेच प्रलोभन, व्यसन, आकर्षण याबद्दलचे आत्मभान जागृत करून स्व:त्वाची ओळख पटविण्याबाबतचे मार्गदर्शन या ट्रस्टच्यावतीने येथील ४६४ व्या व्याख्यानातून देण्यात आले. यावेळी आचार्य भिसे विद्यानगरीतील सुपेह विद्यालयाच्या ५५० आणि बोरिगाव येथील लाखणी शाळेतील ३६० विद्यार्थिनींनी त्याचा लाभ घेतला. दरम्यान, ग्रामीण भाग असल्याने पालक अज्ञानी आहेत, या विषयावर ते पाल्याशी बोलतातच असं नाही, त्यामुळे येथील विद्यार्थींनीना अशा मार्गदर्शनाची नितांत आवश्यकता असल्याचे लाखाणी शाळेच्या मुख्याध्यापिका दीपा पाटील म्हणाल्या. तर समाजातील वाईट प्रवृत्तीवर मात करण्याचे भान शालेय वयापासून मुलींना आल्यास, भविष्यात असुरिक्षततेचे भयचक्र भेदण्याचे बळ त्यांच्यात निर्माण व्हावे या उद्देशाने व्याख्यान आयोजित केल्याचे मराठी विज्ञान मंडळाच्या अध्यक्षा उर्मिला करमरकर यांनी सांगितले.

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळाVasai Virarवसई विरार