शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

पालघर लोकसभेतील विधानसभेची गणिते बदलली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 23:11 IST

भाजप -शिवसेना युती झाल्याने विधानसभेसाठी इच्छुकांची होणार गोची : विरोधकांची एकमेकांच्या बालेकिल्ल्यांत आघाडी

राहुल वाडेकरविक्रमगड : पालघर लोकसभा मतदारसंघातील निवडणूकीत महायुतीचे राजेंद्र गावीत यांनी बाजी मारली येथील सहा मतदार संघापैकी पालघर बोईसर आणि नालासोपारा या विधानसभेत सेना तर विक्र मगड डहाणू आणि वसई मध्ये महाआघाडीने आघाडी घेतली मात्र गावीत यांनी घेतलेली आघाडी जाधव यांना तोडता आली नाही यातूनच पालघरात महायुतीचा झेंडा फडकला मात्र युतीचा गड समजल्या जाणाऱ्या विक्र मगड विधानसभेत आघाडीने मिळविलेली मते लक्षणीय असून या ठिकाणी युतीला ७३ हजार १७६ तर आघाडीला ७८ हजार ८८१ मते मिळाली यानुसार ५ हजार ७०५ मतांची आघाडी मिळाली त्यामुळे बविआच्या बाल्लेकील्यांत युतीने तर युतीच्या बालेकिल्ल्यांत बविआने आघाडी घेतल्याचे विधानसभेची गतवर्र्षीप्रमाणे चालत असलेली राजकीय परिस्थिती या लोकसभा निवडणुकीत बदलेली दिसली. तर भाजपा-सेना यापुर्वी आमने सामने असतांना विधानसभेसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या इच्छुकांची गोची होणार आहे. यामुळे मात्र येणारी विधानसभेची लढाई अधिक रंगतदार होईल हे नक्की. पालघर लोकसभा मतदार संघातील विक्रमगड विधानसभा हा पूर्वापार पासून भाजपाचा बालेकिल्ला आहे. आजच्या घडीला राज्याचे आदीवासी विकासमंत्री तथा जिल्हाचे पालकमंत्री विष्णू सवरा याचा मतदारसंघ आहे तसेच विक्रमगड आणि जव्हार पंचायत समिती भाजपकडे असून मोखाडा पंचायत समितीही शिवसेनेकडे आहे तर मोखाडा नगरपंचायत आणि जव्हार नगरपरिषदेवर सेनेचीच सत्ता आहे असा सगळा भाजप शिवसेनेचा बोलबाला याठीकाणी आहे शिवाय पोटनिवडणुकीत सेना आणि भाजपाची मिळून लाखाहून अधिक मतांची बेरीज गेली होती यामुळे या लोकसभेतही याठिकाणी युतीच पुढे राहील असा राजकीय अंदाज होता मात्र बविआ सीपीएम कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांची झालेली महाआघाडी आणि त्यांनी केलेले काम यामुळे विक्रमगड मध्ये युतीला धोबीपछाड देण्यात आघाडी यशस्वी ठरली. यामुळे आघाडीच्या आशा पल्लवीत झाल्या असून याठिकाणी विधानसभेत आघाडी विरूध्द युती यांच्यात चुरस पहावयास मिळणार आहे या मतांची कारणमीमांसा अशी की, सुरवातीपासूनच याठीकाणी सेना भाजप मध्ये बेबनाव होता विक्रमगड मधील काही पदाधिकाºयानी सेनेला उमेदवारी देण्यावरून राजीनामे दिले होते.

तर गावीत यांना सेनेने उमेदवारी दिल्याने जव्हार मोखाड्यातही पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज होते यामुळे याठिकाणी सुरवातीला जो बेबनाव युतीमध्ये पहावयास मिळाला त्याला नाहीसा करण्यात थोडेफार यश मिळाले असले तरी ते यश पदाधिकाऱ्यांपर्यंतच सिमित राहीले तर दुसरीकडे महाआघाडीच्या सर्व पक्षांची दिलजमाई व्यवस्थित झाली. याशिवाय दिवसरात्र एक करून प्रचार यंत्रणा सक्षमपणे राबवली यासर्वात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा यांचा अग्रक्रम राहीला. तर सीपीएमनेही आपली पूर्ण ताकद बविआच्या पाठीशी उभी केली होती. त्यातूनच याठिकाणी आघाडीची सरशी झाली यामुळे जिथे बविआचे पारंपारिक बालेकिल्ले ढासळले, त्या बविआची सेनेच्या गडात गाडी सुसाट निघाली तिथे युतीच्या गडाला सुरुंग लावण्याचे काम आघाडीने केले.

सन-२०१५ च्या विधानसभेत शिवसेना-भाजपात झाली होती काँटे की टक्करविक्रमगड विधानसभा मतदार संघात २०१५ मध्ये एकूण १२ उमेदवार उभे होते त्यापेकी शिवसेनेचे प्रकाश निकम,भाजपचे विष्णू सवरा, राष्ट्रवादीचे सुनील भुसारा या तीन उमेदवारांमध्ये अक्षरश: कांटे कि टक्कर होती परंतु जनमताचा कौल भाजपाच्या दिशने झुकला आणि शिवसेना व राष्ट्रवादीला पराभव पत्करावा लागला. भाजपाचे विष्णू सवरा यांना ४०२०१ मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या प्रकाश निकम यांना ३६३५३.मते मिळाली व राष्ट्रवादीचे सुनील भूसारा तिसºया क्र मांकावर गेले त्यांना ३२०५३ मते मिळाली होती. मोदी व भाजपाच्या लाटेचा प्रभाव विक्रमगड विधानसभा मतदारसंघात त्यावेळेस पाहावयास मिळाला.युती तुटल्याने प्रथमच भाजपाने स्वबळावर निवडणूक लढली होती. व विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचा बालेकिल्ला पुन्हा राखण्यात भाजपाला यश आले होते. मात्र या लोकसभा निवडणूकीत महायुती असतांनाही विक्र मगड विधानसभेत ५ हजार ७०५ मतांची बविआला आघाडी मिळाली याची कारणे तपासली तर ती या विधानसभेतील जव्हार, विक्रमगड, मोखाडा या तिनही तालुक्याला मंत्री मिळूनही पाणी, वीज, शिक्षण, रोजगार, दळणवळणचा मोठा अभाव त्याकडे मंत्रीमहोदयाचे झालेले दुर्लक्ष विकासकामाचा अभाव व नाराजी अशी आहेत.

युतीमुळे विधानसभेच्या इच्छुकांची होणार गोचीविधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपा राज्यात सत्तेसाठी पुन्हा एकत्र आले.मात्र त्यानंतर राज्यांत झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही सेना-भाजपा स्वतंत्रपणे लढली होती. युतीसाठी कटोरा घेऊन फिरणार नाही.यापुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढणार, अशा घोषणा करण्यांत आल्या होत्या. त्यामुळे शिवसेना-भाजपाच्या अनेक इच्छुकांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी साडेचार वर्षापासून सुरु केली होती. मात्र लोकसभा निवडणुकी पूर्वी अचानक सेना-भाजपाची युती झाली. या युतीने मागील निवडणुकीप्रमाणे चांगले यश मिळवले.त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही भाजपा-सेनेला एकत्र यावे लागणार असल्याने इच्छुकांची गोची होईल.

या ठिकाणी बविआ कॉग्रेस सीपीएम राष्ट्रवादी शेकाप मनसे अशा महाआघाडीतील सर्वच घटक पक्षांनी तना मनाने काम केले आजवर आमची खिल्ली उडवणाºया सेना भाजपाला आमच्या कार्यकर्त्यांनी आपली ताकद दाखवून दिली. आता खरी लढाई अजून बाकी असून आपण असेच मिळून लोकांची कामे करु यात. प्रभावी विरोधी पक्षाची भूमिका मनापासून पार पाडू या. -सुनिल भुसारा, जिल्हाध्यक्ष,राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी

विक्रमगड व डाहाणू विधानसभा मतदारसंघ हे भाजपाचे बालेकिल्ले असतांनाही आम्ही तेथे कमी पडलो याला अनेक कारणे आहेत व याबाबतच्या तक्रारीची मुख्यमंत्री, पक्षश्रेष्ठी, प्रदेशाध्यक्ष, तसेच पालघर लोकसभा प्रभारी रविद्र चव्हाण यांनी दखल घेतली असल्याने यापुढे सर्व एकत्र काम करू व विक्र मगड, डहाणूमध्ये भाजपाचेच आमदार असतील. -विजय औसरकर, जिल्हाध्यक्ष

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा