शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या तापमानाने सरपटणाऱ्या प्राण्यांची ‘काहिली’; पालघरमध्ये पकडला सहा फुटी कोब्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 06:51 IST

शोधताहेत मानवी वस्तीत आसरा घेण्याची जागा

पालघर : वाढत्या तापमानाच्या काहिलीने सरपटणारे प्राणीही हैराण झाले असून थंडाव्यासाठी मानवी वस्तीतील घरांचे आसरे शोधायला सुरुवात केल्याच्या घटना घडत आहेत. पालघरमध्ये एका बंगल्यात शिरण्याचा प्रयत्न करणाºया सहा फुटाच्या कोब्रा जातीच्या सापाला पाळीव बोक्याने रोखून धरले. सर्पमित्रांनी वेळेवर येत त्या कोब्राला पकडून सुरक्षित स्थळी सोडून दिले.

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखता यावा यासाठी नगरपरिषदेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी घरातच बसून शहरातील आपला वावर बंद ठेवला आहे. शहरातील पारा ३६ अंश सेल्सियसच्यावर चढल्याने हवेतला वाढता उकाडा पशुपक्ष्यांच्या जीवावर बेतला आहे. त्यामुळे थंड हवेचा आसरा शोधत साप, कोब्रा आदी सरपटणारे प्राणी मानवी वस्तीत शिरू लागले आहेत.

रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास पालघरमधील माहीम रोडवरील समीर मणियार यांच्या ‘सानिया’ बंगल्याच्या गार्डनमध्ये सुमारे सहा फूट लांबीचा कोब्रा शिरून त्याने बंगल्यात शिरण्याचा प्रयत्न सुरू केला. मणियार यांच्या घरातील पाळीव प्राणी छोटू बोक्याचा गुरगुरण्याचा आवाज आल्याने सर्वांचे लक्ष तिकडे गेले. तेव्हा हा अनाहूत पाहुणा कोब्रा फणा काढून त्या बोक्यावर फुत्कारत होता, तर बोकाही त्याच्या अंगावर गुरगरत त्याला बंगल्यात शिरण्यापासून रोखत होता. लगेचच मणियार यांनी तातडीने माहीम रोडवर राहणारे सर्पमित्र सागर बारोट यांना फोन करून बोलावले. त्यांनी शिताफीने हा कोब्रा नागराज पकडला. सर्पमित्र सागर बारोट यांनी गेल्या काही दिवसात पालघर शहरात अनेक साप पकडले असून ते सुखरूपपणे जंगलात सोडल्याचे सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व मंडळी घरात असताना सरपटणारी अनेक जनावरे लोकांच्या घरात शिरण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामुळे नागरिकांनी सजग राहण्याची आवश्यकता असल्याचे मणियार यांनी ‘लोकमत’ला सांगितले.शहरातील अनेक मानवी वस्तींत साप शिरल्याचा कॉल आल्यावर जीवावर उदार होऊन जावे लागते. मात्र, बाहेर पडल्यावर पोलीस तपासणीचा अडथळा येत असल्याने प्रशासनाने अत्यावश्यक सेवा म्हणून आम्हा सर्पमित्रांना शहरात फिरण्यास पास द्यावा.- सागर बारोट, सर्पमित्र

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या