शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

वसईत 'एक कॅमेरा शहरासाठी' योजनेचा शुभारंभ, नागरिकांच्या सुरक्षेसाठी 24 तास वॉच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2020 20:16 IST

कौल हेरिटेज सिटी मेन गेट,पंचवटी नाका, दोस्ती,पं.दीनदयाळ नगर व सनसिटी अशा 5 ठिकाणचे डीसीपी संजय पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

आशिष राणे

वसई - नव्याने वसई विरार पोलीस आयुक्तांलय कार्यान्वित झाल्यावर प्रथमच वसई विरार भागातील जनतेची सुरक्षा अबाधित राहावी व शहरात घडणाऱ्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी  मीरा भाईंदर- वसई विरार पोलीस आयुक्तांलयाच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या टप्प्यातील वसई विभागातील पाच ठिकाणी  ‘एक कॅमेरा शहरासाठी’ हा उपक्रम राबविण्यात येत असून त्याचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा 4 नोव्हेंबर रोजी बुधवारी दुपारी 4 वाजता पंचवटी नाका येथून होत असल्याची माहिती वसई विरार पोलीस आयुक्तांलय परिमंडळ- 2 चे डीसीपी संजय पाटील यांनी लोकमत शी बोलताना दिली.

दरम्यान सुरुवातीला पालघर जिल्हा पोलीस दलाने या मोहिमेला 2018 मध्ये सुरुवात केली व  त्यास आजवर देखील वसईकर नागरिकांचा चांगला व उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.मात्र अजूनही शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यास घडणारे गुन्हे उदा.चोरी,दरोडा, खून,वाहन चोरी,खास करून चेन स्नेचिंग आणि बाल, वृध्द व महिलावर होणारे अत्याचार असे विविध गुन्हे घडू नयेत अथवा त्यास वेळीच प्रतिबंध घालता यावा व पोलीसांना तपास करताना सीसीटीव्ही कॅमेरामुळे आरोपी पकडण्यासाठी मदत व्हावी व गुन्हेगारीला आळा बसावा या उदात्त उद्देशाने शहरात महत्त्वाच्या ठिकाणी "एक कॅमेरा शहरासाठी"हा उपक्रम राबविला जात असल्याचे डीसीपी संजय पाटील यांनी सांगितले.

एकूणच पुन्हा एकदा आयुक्तांलय झाल्यावर प्रथमच वसई विभागात माणिकपूर पोलिस ठाणे हद्दीतील पाच ठिकाणी हे सीसीटीव्ही कॅमेरे चे लोकार्पण होत असून यामध्ये प्रथम वसई अंबाडी रोड पंचवटी नाका,स्टेला येथील दोस्ती कॉम्प्लेक्स विभाग,कौल हेरिटेज सिटी मेन गेट, पंडित दीन दयाळ नगर आणि सनसिटी येथील टेंपो स्टॅण्ड अशा पाच ठिकाणी हे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून त्याचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा संपन्न होत असल्याने नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केलं आहे.

"आपले शहर व त्यातील नागरीक अधिक सुरक्षित राहावे,व या सर्वांच्या सुरक्षितेसाठी शहरातील विकासक, रस्त्यावरील दुकानदार, सोसायटय़ा, मॉल, बँका, वसाहती, कार्यालये, शैक्षणिक संस्था आदी यांना सीसीटीव्ही लावण्याचे आवाहन या निमित्ताने आपले पोलीस दल करीत आहे,नक्कीच या उपक्रमामुळे गुन्हेगारीच्या प्रमाणात घट होईल व नागरिकांमध्ये सुरक्षिततेचि भावना ही वाढेल.  

डीसीपी संजय पाटील, वसई विरार पोलीस आयुक्तांलय,झोन-2

टॅग्स :Vasai Virarवसई विरारcctvसीसीटीव्ही