‘आयुषमान भारत’चा शुभारंभ, पाच लाभार्थ्यांना ई-कार्डचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 03:43 AM2018-09-26T03:43:24+5:302018-09-26T03:43:38+5:30

आयुषमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.

 Launch of 'Ayushman Bharat', e-card allotment to five beneficiaries | ‘आयुषमान भारत’चा शुभारंभ, पाच लाभार्थ्यांना ई-कार्डचे वाटप

‘आयुषमान भारत’चा शुभारंभ, पाच लाभार्थ्यांना ई-कार्डचे वाटप

Next

पालघर  - आयुषमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी झालेल्या या कार्यक्रमात प्रातिनिधीक स्वरुपात लता चंदरकर, सुनंदा फर्नांडीस, सुरेखा पामाळे, अशोक जाधव, जीवन गायकवाड या पाच लाभार्थ्यांना ई कार्डांचे वाटप करण्यात आले.
यावेळी खासदार राजेंद्र गावित, आमदार पास्कल धनारे, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, नगराध्यक्ष उत्तम पिंपळे, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती अशोक वडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. कांचन वानेरे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. राजेंद्र केळकर, डॉ.दिनकर गावित आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
देशभरात आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा आज एकाच वेळी शुभारंभ करण्यात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झारखंड मधील रांची येथे मुख्य कार्यक्र म आयोजित करण्यात आला. या कार्यक्र माचे थेट प्रक्षेपण पालघर येथील कार्यक्र मात दाखिवण्यात आले.
निशुल्क असणाऱ्या या योजनेनुसार लाभार्थी कुटुंबाना प्रति वर्षी प्रति कुटुंब आरोग्यासाठी ५ लाख रुपये विमा संरक्षण राहणार आहे. या योजनेअंतर्गत त्या कुटुंबांना ठराविक आजारासाठी संपूर्ण देशभरातील कोणत्याही मान्यता प्राप्त रुग्णालयात उपचार घेता येतील.
यासाठी लाभार्थी कुटुंबाना ई-कार्ड देण्यात येणार आहेत. यासाठी जी रु ग्णालये संलग्न करण्यात येतील त्या रु ग्णालयातील आरोग्य मित्र हे ई-कार्ड देतील. सद्यस्थितीत पालघर जिल्ह्यातील उपजिल्हा रु ग्णालय जव्हार आणि डहाणू या योजनेमध्ये समाविष्ट असतील.

डहाणू व जव्हारमधून होणार सुरूवात

या योजनेच्या पालघर जिल्ह्यातील उद्घाटन प्रसंगी बोलताना पालकमंत्री सवरा म्हणाले, आयुषमान भारत ही एक महत्त्वाकांक्षी योजना असून याचा आरोग्यदायी लाभ ग्रामीण भागातील २ लाख ७६ हजार तर शहरी भागातील ४३ हजार ३८ कुटुंबांना होणार आहे. एकूण १ हजार १२२ आजारांचा समावेश आहे.

या योजनेचा लाभ सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचिवण्यासाठी संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी.ही योजना प्राथमिक स्तरावर सध्या डहाणू आणि जव्हार मध्ये राबविण्यात येणार असली तरी त्याचा लाभ संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यासाठी प्रयत्न व्हावेत असे सांगितले. आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त अशी ही योजना सर्वांपर्यंत पोहोचिवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत.

Web Title:  Launch of 'Ayushman Bharat', e-card allotment to five beneficiaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.