शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

जमिनीची भरपाई २० वर्षे नाही, शेतकरी आले मेटाकुटीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 02:46 IST

विक्रमगड : तालुक्यातील मौजे कवडास, तलवाडा व खडकी आदी गावातील २२ शेतक-यांच्या उपजिवीकेचे एकमेव साधन असलेल्या मालकी शेतजमिनीतून सन-१९९४ सालापासून पॉवर ग्रीड कार्पोरेशन आॅफ इंडिया या कंपनीची जवळ जवळ ४०० के़ व्ही.ची गांधार-पडघे ट्रान्समिशन टॉवर लाईन गेलेली आहे़

राहुल वाडेकर विक्रमगड : तालुक्यातील मौजे कवडास, तलवाडा व खडकी आदी गावातील २२ शेतक-यांच्या उपजिवीकेचे एकमेव साधन असलेल्या मालकी शेतजमिनीतून सन-१९९४ सालापासून पॉवर ग्रीड कार्पोरेशन आॅफ इंडिया या कंपनीची जवळ जवळ ४०० के़ व्ही.ची गांधार-पडघे ट्रान्समिशन टॉवर लाईन गेलेली आहे़ व त्यावेळेस या टॉवरखाली जात असेल्या जमीन मालकांच्या जमीनीचे सपाटीकरण करुन ती संपादित करुन त्यावरील झाडे व इतर पिके जमीनदोस्त केली गेली व नोटीस बजावून नुकसान भरपाई देण्याचे कबूल केले होते त्याला २० वर्षाहून अधिक काळ लोटला तरी जमिनीची भरपाई मिळालेली नाही.याकरीता शेतक-यांनी अनेकवेळा कंपनीच्या कार्यालयात भरपाई मिळविण्यासाठी खेट्या घातल्या .मात्र त्यांना अदयापही एक छदामाचीही भरपाई मिळालेली नाही़ यामुळे शेतकरी मेटामुटीला आलेला आहे. अखेर सर्व शेतकरी एकत्र मिळुन आता त्यांनी दाद मागण्याकरीता जिल्हाधिकारी पालघर यांचेकडे निवेदन दिलेले आहे़ आता तरी ही भरपाई मिळेल अशा आशेवर हे शेतकरी आहेत.दरम्यान याबात येथील शेतकºयांची संपर्क साधला असता त्यांनी सांगीतले की, त्यावेळेस टॉवर लाईन टाकण्याकरीता आमच्या जमीनीत असलेली झाडे, झाडोरा, कलमे, पिके, जमीनदोस्त करुन जमीन संपादीत करण्यात आली व त्याप्रमाणे कंपनीकडून पंचनामा देखील केलेला आहे़आम्ही आमच्या जमिनीची भरपाई मिळावी यासाठी १९९४ पासून आमचे झालेले जमीनीचे नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी कंपनीच्या कार्यालयात बोईसर , महागाव, कल्याण, वापी अशा ठिकाणच्या शेतक-यांच्या वतीने चंद्रकांत गोविंद घाटाळ, ़सिताराम सखाराम चव्हाण,अनंता देवु भोईर, काश्या कमळया घाटाळ यांनी दाद मागितली आहे. परंतु अद्याप काहीही कारवाई झालेली नाही. ती तातडीने न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेतकºयांनी दिला आहे.>अनेक मान्यवरांना दिले निवेदनसंपादित केलेली जमीन ही आमची रोजीरोटी असल्याने व तिची भरपाई न देऊन आमची या कंपनीने फसवणूक केली आहे ़ आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा करुन देखील कंपनी आमची दखल घेत नाही व थातूरमातूर उत्तरे देऊन आमची बोळावण केली जाते. आम्हांस आता तरी न्याय दयावा व आम्हांस भरपाई मिळावी याकरीता आम्ही एकत्रितरित्या जिल्हाधिका-यांना विनंती अर्ज सादर केला आहे़ व त्याच्या प्रति कारवाईसाठी पॉवर ग्रीड कार्पोरेशन आॅफ इंडियाचे व्यवस्थापक व उप विभागीय अधिकारी वाडा, ़तहसिलदार विक्रमगड, तालुका पत्रकार संघ, यांना सादर केला आहे़

टॅग्स :Vasai Virarवसई विरार