शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
2
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
3
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
4
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
5
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
6
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
7
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
8
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
9
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
10
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
11
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
12
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
13
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
14
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
15
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
16
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
17
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
18
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
19
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
20
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
Daily Top 2Weekly Top 5

देखभालीअभावी लिफ्ट, जिने नादुरुस्त; ठाणे स्थानकांतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 23:20 IST

मानवी चुकाही कारणीभूत, रेल्वे प्रशासनावरही आरोप

ठाणे : आधुनिकतेची कास धरून केल्या जाणाऱ्या विकासांतर्गत्ठाणे रेल्वेस्थानकात सरकते जीने असो आणि लिफ्ट यासारखे उपकरणे बसवण्यात आली आहेत. मात्र, ही उपकरणे मध्येच बंद पडत असल्याने रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या जीवाशी खेळत असल्याची टीका होऊ लागली आहे. ही उपकरणे का बंद पडतात याबाबत लोकमतने शोध घेतला असता मानवी चुकांसह देखभाली अभावी ती बंद पडत असल्याची कारणे पुढे आली. सुदैवाने आतापर्यंत ठाणे रेल्वे स्थानकात घडलेल्या अशा घटनांमध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.सद्यस्थिती ठाणे रेल्वे स्थानकात एकूण दहा फलाट आहेत. तसेच येथून मध्य आणि हार्बर (वाशी-पनवेल)तसेच एक्स्प्रेस व मालगाड्या धावतात. यामध्ये दररोज ठाण्यातून मध्य रेल्वेच्या ७८२ अपडाउन लोकलसह ठाणे-वाशी-पनवेल यामार्गावर २८२ अप-डाउन तसेच ८० अप आणि ७० डाउन अशा एक्स्प्रेस धावत आहेत. ठाण्यातून नियमित ३.५० लाख लोकल प्रवासी तिकिटांची विक्री होत आहे.

या प्रवासी संख्येसह पासधारक आणि एक्स्प्रेसने प्रवास क रणारे असे दिवसभरात ठाण्यातून जवळपास सात ते आठ लाख प्रवासी ये जा करतात. त्यामुळे हे स्थानक नेहमीच गजबलेले असते. त्यातच या ऐतिहासीक स्थानकात पहिले-वहिले वातानूकुलित शौचालयासह पहिले सरकते जिन्यांपाठोपाठ आता लिफ्टचीही सेवा प्रवाशांकरीता सुरू झाली आहे. सध्या ठाणे स्थानकात फलाट क्रमांक १,२,३-४,५-६ आणि दहा नंबर ब्रिजवर ये-जा करण्यासाठी सात सरकते जिने आहेत. तर फलाट क्रमांक २,३-४ आणि ५-६ या फलाटांवर लिफ्ट बसवल्या आहेत. एकावेळी १५ प्रवासी वर-खाली येऊ जाऊ शकतात इतकी त्या लिफ्टची क्षमता आहे. ही आधुनिक उपक रणे खाजगी कंपन्यांमार्फत रेल्वे स्थानकांमध्ये बसवण्यात आली आहेत. त्याच कंपन्यांमार्फत शीपमध्ये एक-एक व्यक्तीची नियुक्ती केली गेली आहे. सरकता जिना किंवा लिफ्ट बंद पडल्यावर कंपन्यांमार्फत ठेवलेली व्यक्ती ती उपकरणे सुरू व बंद करण्याची कामे करतात. मात्र, सोमवारी पहाटे घडलेल्या घटनेने कंपन्यांबरोबर रेल्वे प्रशासनाची झोप उडाली आहे. या कंपन्या सदर उपक रणांची देखभाल-दुरुस्ती व्यवस्थित करीत नसल्याने आणि मानवी चुकांमुळेही ते वारंवार ती बंद पडत असल्याची कारणे पुढे आली आहेत.

रेल्वेतील भ्रष्टाचारही कारणीभूतप्रवाशांच्या सेवेसाठी असलेल्या यंत्रांची प्रवाशांनीही काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञ मांडतात. तर काहींनी ती बंद पडण्यामागे भ्रष्टाचाराचा वास येत असल्याचा आरोप केला आहे. हा ठेका दिलेल्या कंपन्यांकडून रेल्वे प्रशासनातील अधिकारी पैसे घेत असल्याने त्यातूनच सरकते जिने असो वा लिफ्ट याकडे कंपन्या व्यवस्थित लक्ष केंद्रीत करत नसल्याचे आरोप आहेत.‘ती’ लिफ्ट ४८ तासांनंतरही बंदचठाणे : ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ३-४ वरील लिफ्ट सोमवारी पहाटे बंद पडलेली ती लिफ्ट दुरुस्तीचे कारण देऊन ४८ तास उलटल्यानंतरही बंद ठेवली आहे. तिचा बेल्ट तुटली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच, ती नेमकी मधेच कशी अडकली, याबाबत संबंधित तज्ज्ञांमार्फत तपासणी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, यामुळे वृद्धांचे हाल होत असून यातून रेल्वेचा गलथान कारभारही चव्हाट्यावर आला आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास लिफ्टने पुलावर येताना कळव्यातील आनंद चाळके (६५) हे त्या लिफ्टमध्ये अडकले होते. तब्बल तीन तासानंतर त्यांची सुटका करण्यात आली होती.मात्र, रक्तदाब वाढल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. त्यानंतर दुरुस्तीचे कारण देऊन ती बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ती बंद पडल्यानंतर रेल्वेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संबंधित विभागाच्या तज्ज्ञांनीही ठाण्यात धाव घेतली. तसेच तिची तज्ज्ञांमार्फत तपासणी सुरू केली आहे. मात्र,अद्यापही काही कारण पुढे आलेले नाही. परंतु, ब्लेट तुटल्याने ती अडकली असावी अशी शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे. याचदरम्यान,फलाट क्रमांक ३-४ वर एकच लिफ्ट असून ती बंद ठेवल्याने या फलाटांवर ये-जा करणाºया वयोवृद्ध प्रवाशांचे हाल होऊ लागले आहे.