शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

ठेका हातून जाण्याच्या भितीने अपहरण; पालघरच्या अपहरणामागचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 23:47 IST

कारखान्यात सुरू असलेले कामाचा ठेका आपल्या हातून जाण्याच्या भितीने दहशतीचा वापर करून कंपनीतील देखरेख करणाऱ्या व्यक्तीलाचा उचलून नेल्याची माहिती अपहरण झालेल्या आरिफ याचे भाऊ मोहम्मद आसिफ अली यांनी लोकमतला दिली

पालघर : कारखान्यात सुरू असलेले कामाचा ठेका आपल्या हातून जाण्याच्या भितीने दहशतीचा वापर करून कंपनीतील देखरेख करणाऱ्या व्यक्तीलाचा उचलून नेल्याची माहिती अपहरण झालेल्या आरिफ याचे भाऊ मोहम्मद आसिफ अली यांनी लोकमतला दिली. ही अपहरण करण्याची घटना पालघरच्या औद्योगिक परिसरात गुरूवारी दुपारी घडली आहे.सातपाटी-पालघर जुन्या रस्त्यावरून आपल्या कंपनीत जाणाºया आरिफ मोहम्मद अली या कंपनी मालकांच्या अपहरणाबाबत पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अपहरण करण्यात आलेले आरिफ यांचा स्वत:चा एक कारखाना पालघर पश्चिमेला आहे. त्याच पुढे असलेलेल्या कॉनवरा इंडस्ट्रीज या कंपनीचे लायजनिंगचे कामही याच्याच कडे होते. त्यामुळे त्यांच्या देखरेखीत सर्व काम सुरू होते. त्याच कंपनीत प्रशांत संखे या तरूणाचेही स्पेअर पार्ट पुरविण्याचा ठेका होता. ठेक्या बाबत गेले अनेक दिवस हमरीतुमरी सुरू होती.हातातील काम आरिफ अली यांच्यामुळे निसटत की काय ही भावना बळावल्याने प्रशांत संखे आणि इतर तीन यांनी कट रचून आरिफ अली हे अजय म्हस्के या कामगारासोबत रिक्षाने कंपनीकडे जात असतांना एका पिकअप गाडीने त्यांची रिक्षा अडवली. त्याचवेळी मागून आलेल्या स्कॉओेर्पिओ गाडीत त्यांना बळजबरीने कोंबून त्यांचे अपहरण करण्यात आले. या प्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर अपहरणकर्त्याचा तपास करण्याचे पोलीस अधिकक्ष गौरव सिंह यांनी आदेश दिले आहेत. या अपहरणाच्या थराराने पालघरसह जिल्हयातील कारखानदारांवर दहशतीचे सावट पसरले आहे. तपास पथकाने बोईसर येथून अपहरण ज्या स्कॉर्पिओने केले होते. ती गाडी ताब्यात घेतली आहे. गुरूवारपासून अपहरणकर्ते आणि अपहरत आरीफ अली यांचा शोध पोलीस घेत आहेत. तपास पथकाने डहाणू बोर्डी पर्यंत त्यांचा माग काढला आहे. संशयीत गाडीचा चारोटी येथील टोल प्लाझा वरून सी.सी. टीव्ही फुटेज तपासण्यात आली आहेत.प्रशांत संखे, चिंनू संखे व प्रशांत महाजन रडारवरया अपहरणप्रकरणी संशयी म्हणून पालघरमधील प्रशांत संखे, चिंनू संखे व प्रशांत महाजन अशा तीन व्यक्तीची नावे समोर आली असून त्यांचे शेवटचे लोकेशन डहाणू भागात असल्याने पोलिसांनी तपासाची चक्र चोहोबाजूंनी फिरवल्याचे सांगितले. संध्याकाळपर्यंत अपहरणकर्ते आरिफ यांचा कुठेही थांगपत्ता लागत नसल्याने त्याच्या घरात चिंताग्रस्त वातावरण बनले आहे. लवकरच या प्रकरणातील आरोपींचा शोध पोलीस घेतील, असा विश्वास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी व्यक्त केला आहे.दहशतीचा वापर करून कपंनी मालकाचे अपहरण होत असेल तर संरक्षणा अभावी कंपनी बंद करावी लागेल. पोलिसांनी आरिफ यांचा शोध घेऊन गुंडाना ताब्यात घ्यावे.- रायचंद शहा, अध्यक्ष,पालघर मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन लि. पालघरअपहरण कर्त्यांच्या हातुन माझ्या पतीची सुखरुप सुटका करण्याची सर्वस्वी जबाबदारी पालघर पोलीसांची असून पोलीस अधिक्षकांनी यात जातीने लक्ष घातले पाहिजे.-शाहिस्ता अली, (आरिफ यांची पत्नी)

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी