शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

कासाला ५ जानेवारीला महाआरोग्य शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 00:27 IST

या मेळाव्यात सर्व वयोगटातील नागरीकांची आरोग्य तपासणी व समुपदेशन करण्यात येणार असून अधिकाधिक नागरीकांना तपासणी करून घेण्याचे आवाहन खासदार राजेंद्र गावित यांनी केले आहे.

पालघर : सार्वजनिक आरोग्य विभाग तसेच केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या संयुक्तविद्यमाने येत्या ५ आणि ६ जानेवारी रोजी सकाळी ९ तेसायंकाळी ५ या वेळेत डहाणू तालुक्यातील पूज्य आचार्य भिसे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कासा येथ ेमहाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात सर्व वयोगटातील नागरीकांची आरोग्य तपासणी व समुपदेशन करण्यात येणार असून अधिकाधिक नागरीकांना तपासणी करून घेण्याचे आवाहन खासदार राजेंद्र गावित यांनी केले आहे.यासंबंधी माहिती देण्यासाठी शनिवारी येथेआयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.कांचन वानेरे, जिल्हाआरोग्य अधिकारी डॉ.दयानंद सूर्यवंशी, अतिरिक्त जिल्हाशल्य चिकीत्सक डॉ.केळकर, अधीक्षक डॉ.गावित आदीयावेळी उपस्थित होते.मोफत दिल्या जाणाऱ्या सेवा सोनोग्राफी, ईसीजी, रक्त तपासणीसोनोग्राफी, ईसीजी, रक्त लघवी तपासणी, चष्म्याचा नंबर काढणे मिळणे, बीएमडी तपासणी, दिव्यांगांचे युडीआयडी कार्ड, पोषक आहाराविषयी सल्ला,क्षयरोगाच्या निदानाकरीता थुंकीचा नमुना गोळा करणे, एचआयव्ही तपासणी,कुष्ठरोग तपासणी, मलेरिया विषयीप्रदर्शन व तपासणी, कुटुंब कल्याण व गुप्तरोग विषयक समुपदेशन आदी सेवा या महाआरोग्य मेळाव्यात मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या मेळाव्यात ज्या रूग्णांना शस्त्रक्रियेचीआवश्यकता आहे अशा रूग्णांवर ७ जानेवारी २०१९ रोजीग्रामीण रूग्णालय, पालघर येथे शस्त्रक्रि येची सोय उपलब्ध करण्यात येणार आहे. तसेच दि. २८ जानेवारी २०१९ रोजी उपजिल्हा रूग्णालय, डहाणू येथेही तसीच सोय करण्यात येईल. ज्या रूग्णांवर क्ष-किरण तपासणी करणेआवश्यक आहे ती उपजिल्हा रूग्णालय कासा येथे करण्यातयेईल. ज्या मुलांना गोवर-रूबेलाची लस दिलेली नाही त्यांना या मेळाव्यात ती दिली जाईल. तर, याच ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन देखील करण्यात येणार आहे. त्यात सगळ्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन आहे.कोणत्या आजारांवर शस्त्रक्रि या होऊ शकतील : महाआरोग्य मेळाव्यात लहान मुलांमधील हर्निया, अंडवृद्धी, लघवीची निमुळती जागा, पुरूष बिजकोष जन्मत: पोटात असणे व ते बिजकोष शस्त्रक्रि येद्वारे अंडाशयातस्थलांतरीत करणे इत्यादी. तर, प्रौढ माणसांमधील मूळव्याध, हर्निया, अंडवृद्धी, लहान मोठ्या गाठी आदींवर शस्त्रक्रिया होऊ शकणार आहेत. स्त्रियांच्या आजारांमधील शस्त्रक्रि यांमध्ये गर्भाशयाची शस्त्रक्रि या, अंग बाहेर पडणे तसेच स्तनांतील गाठी यांचा समावेश असेल.उपलब्ध असणारे तज्ज्ञ डॉक्टर्स : या महाआरोग्य मेळाव्यासाठी जिल्ह्यातील तज्ज्ञडॉक्टर्ससह मुंबईतील जे.जे. , ग्रँट वैद्यकीय , वाडिया , हिंदुजा , तेरणा वैद्यकीय या रुग्णालयातील तसेच इंडियन डेंटल असोसिएशन, टाटा ट्रस्ट, येथूनही तज्ज्ञ डॉक्टर्स उपलब्ध होणार आहेत. यामध्ये स्त्री रोग, बालरोग, शल्यचिकीत्सा, अस्थीरोग, संसर्गजन्यरोग चिकीत्सा, नेत्रचिकीत्सा, कान-नाक-घसा, मानसोपचार, त्वचारोग, दंतचिकित्सा, भौतिक उपचार, सिकलसेल, भारतीयवैद्यक शास्त्रातील आयुर्वेदीक, युनानी, होमिओपॅथी आदी विषयांतील तज्ज्ञांचा समावेश असणार आहे. या शिवाय किशोरवयीन मुला-मुलींच्या समस्यांविषयी समुपदेशन देखील करण्यात येणार आहे.

 

 

टॅग्स :Healthआरोग्य