शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

१२० फूटांवरुन धबधब्यात मारली उडी; जव्हारमधील घटनेत एक बेपत्ता, तर दुसरा गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 06:48 IST

दाभोसा धबधबा परिसरात मीरा-भाईंदर येथील २४ वर्षीय तीन तरुण मित्र पर्यटनासाठी आले होते. त्यांना येथील पाण्याच्या व डोहाच्या खोलीचा कुठलाच अंदाज नव्हता.

लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : मुंबईतील दोन पर्यटकांनी जव्हार तालुक्यातील दाभोसा धबधब्यात थेट १२० फूट उंचीवरून खोल डोहात उडी मारली. यातील एक पर्यटक बेपत्ता झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. रविवारी सकाळी ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

दाभोसा धबधबा परिसरात मीरा-भाईंदर येथील २४ वर्षीय तीन तरुण मित्र पर्यटनासाठी आले होते. त्यांना येथील पाण्याच्या व डोहाच्या खोलीचा कुठलाच अंदाज नव्हता. यातील दोन पर्यटक मित्र थेट धबधबा सुरू होतो त्या उंचीवर पोहोचले, तर तिसरा पर्यटक खाली डोहाजवळून त्यांचा व्हिडीओ काढत होता. सध्या धबधब्याला पाणी कमी आहे, धबधब्यावरून पाण्याची धारही कमी आहे. त्यातच माज शेख, जोएफ शेख यांनी अंदाजे १२० फूट उंचीवरून डोहात उडी मारली. यातील माज शेख हा पाण्यातून आलाच नाही. तो बेपत्ता आहे, तर त्याचा मित्र जोएफ शेख कसाबसा पाण्यातून बाहेर आला. मात्र, तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या कमरेला, पायाला, मानेवर जबर मार लागला आहे. 

त्याला कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत, तर माज शेखचा शोध सुरू असल्याची माहिती जव्हार पोलिसांनी दिली.

मुंबई आणि बाहेरगावाहून येणाऱ्या पर्यटकांना येथील धबधब्याच्या खोलीचा अंदाज नसतो. मात्र, हे पर्यटक विनाकारण पाण्यात उडी मारतात किंवा पोहायला उतरतात. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ते कुठे जातात, काय करतात, याबाबत त्यांनी चौकशी करणे गरजेचे आहे. जेणेकरून अशा दुर्घटना टाळण्यास मदत होईल.- संजकुमार ब्राह्मणे, पोलिस निरीक्षक, जव्हार पोलिस ठाणे

टॅग्स :Waterपाणी