शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : जव्हार बाजारपेठ पाच दिवसानंतर पुन्हा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 00:38 IST

रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी झाली आहे. दरम्यान, प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केलेले असतानाही नियम मोडणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत.

जव्हार : जव्हार शहरात मागील आठवड्यापासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आणि एकच खळबळ उडाली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात ‘एकता’ कर्फ्यू लागू करून १५ ते १९ जूनदरम्यान सलग पाच दिवस शहर बंद करण्यात आले होते. त्यामुळे रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी झाली आहे. दरम्यान, प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केलेले असतानाही नियम मोडणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत.शहरात वाढलेला आलेख बघता पुन्हा शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती व व्यापारी मंडळींनी एकत्र बैठक आयोजित करून शहरात आस्थापना उघडतील, मात्र काळजीपूर्वक ग्राहकांना माल देणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, अशा विविध बाबींवर खूप वेळ चर्चा करण्यात आली आणि शनिवारपासून आस्थापना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, दुकाने सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंतच सुरू राहतील, असा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, शहरात शुक्रवारी व शनिवारी दुपारपर्यंत संशयित रुग्णांचे अहवाल अप्राप्त असल्यामुळे मागील दोन दिवसांपासून नवीन एकही पॉझिटिव्ह रुग्णाची वाढ नसल्याची बातमी असल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.दरम्यान, शहरातील रुग्णांची वाढती संख्या बघता नगर परिषद तथा आपत्ती व्यवस्थापन विभाग अधिक सतर्क झाले असून विविध उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, नागरिक नियम मोडत असल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. नगर परिषद हद्दीतील घाग चाळ येथे एक रुग्ण सापडल्यामुळे ते प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. मात्र, तेथे राहणारे रूपेश घाग हे वारंवार नियम मोडीत दुकान उघडून बसत होते, बाहेर येत होते. म्हणून जव्हार पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, जो कोणी नियम मोडेल, त्याच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्याधिकारी प्रसाद बोरकर यांनी दिला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस