शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

मुख्यमंत्र्यांनी केले जव्हारकरांना खूश; ३७ कोटींच्या मंजुरीची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 23:35 IST

संस्थानकाळाचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या जव्हार नगरपरिषदेला १ सप्टेंबर २०१८ रोजी १०० वर्ष पूर्ण झाली असून, १ ते ६ सप्टेंबरपर्यत भरभरून कार्यक्रम करण्यात आले.

- हुसेन मेमनजव्हार : संस्थानकाळाचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या जव्हार नगरपरिषदेला १ सप्टेंबर २०१८ रोजी १०० वर्ष पूर्ण झाली असून, १ ते ६ सप्टेंबरपर्यत भरभरून कार्यक्रम करण्यात आले, तसेच ६ सप्टेंबर रोजी शतकपूर्ती निमित्त पर्यटन महोत्सवाचे आयोजन के. व्ही. हायस्कूलच्या क्रीडांगणात करण्यात आले होत, या कार्याक्रमाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी विशेष उपस्थिती राजे महेंद्रसिंग मुकणे, जि. प. अध्यक्ष विजय खरपडे, खासदार राजेंद्र गावित, कपील पाटील, आमदार अमित घोडा, आ. पास्कल धनारे, रविंद्र फाटक, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, नगराध्यक्ष चंद्रकांत पटेल, उपनगराध्यक्ष पद्मा रजपूत, गटनेते दिपक कांगणे, नगरसेवक कृणाल उदावंत, रहिम लुलानिया, वैभव अभ्यंकर तसेच सर्व नगरसेवक, सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते, मुख्याधिकारी प्रसाद बोरकर तथा सर्व अधिकारी व कर्मचारी वृंद, हजारो नागरीक व महिला आदि उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांचा सत्कार नगराध्यक्ष चंद्रकांत पटेल यांनी केला, तसेच विशेष सत्कार जव्हारचे अंतिम राजे यशवंतराम मुकणे यांचे नातू महेंद्रसिग मुकणे यांचा यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शाल व मानचिन्ह देऊन करण्यात आला.निलेश सांबरे यांचा सत्कार विरोधी पक्षाचे गटनेते दीपक कांगणे यांनी तर इतर मान्यवरांचे सत्कार सर्व नगरसेवकांनी केले, तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भोईर व योगिता चौधरी यांनी केले तर तसेच कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता सर्वपक्षीय व जव्हारकर व नगर परिषद कर्मचारी अखलाक कोतवल, शेवाळे यांनी खूप मेहनत घेतली. हा सोहळा दृष्ट लागावी इतक्या देखणेपणाने पार पडला.उद्धवांनी का फिरविली पाठ?, पथदिव्यांचे उदघाटनमुख्यमंत्री फडणवीस यांनी लोकमतच्या गुरुवारच्या बातमी मधीलच सर्व समस्या निधीच्या मंजूरीसह सोडविल्याने त्याचीच चर्चा सर्वत्र होती. जव्हार नगरपरिषदेत शिवसेनेची एकहाती सत्ता असूनही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमाकडे का पाठ फिरवली या विषयाची चर्चा या कार्यक्रमानंतर जोरात होती. तर शहरवासिय नाराजी व्यक्त करीत होते.तसेच जव्हार शहरासाठी एकुण ८५० एल.ई.डी. पथदिवे, टुरीझम वेबसाईट आणि कुपोषण मुक्तीसाठी पोषण अभियानसाठीची भित्तीपत्रके यांचे उद्घाटन व अनावरण यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. जव्हार हे एक सर्वोत्कृष्ट होण्यासाठी जव्हार वासीयांनी प्रयत्न करावेत त्यासाठी राज्य सरकारचे पुर्ण सहकार्य असेल अशी ग्वाही मुख्यंमत्र्यांनी दिली.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार