शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

जनता काँग्रेसलाच निवडून देणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 3:54 AM

सेना-भाजपावर टीका : प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे प्रतिपादन

डहाणू : भाजपचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवेंनी जिवंतपणी कधी वनगांकडे पाहीले सुद्धा नाही. ते आता वनगांसाठी मते मागत आहेत. दानवेंना सवरा आणी वनगा यांच्यामध्ये फरक ओळखता येत नाही .जिवंत असताना कोणाला आठवण झाली नाही. पण त्यांच्या निधनानंतर मात्र सर्वच दावेदार बनत असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी गुरूवारी येथे केली .काँग्रेसचे उमेदवार दामू शिंगडा आदिवासींचे नेतृत्व करणारे आहेत. शिंगडा हे प्रशासनात राजकारणात शांतपणे काम करणारे अनुभवी नेते आहेत. शिंगडांना निवडुन देण्यासाठी साथ देण्याचे अवाहन अशोक चव्हाण यांनी केले. काÞँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण वाणगाव येथे काँग्रेसचे उमेदवार दामु शिंगडा यांच्या प्रचारसभेत बोलत होते.पालघर जिल्हा निर्मीतीसाठी काँग्रेस -राष्ट्रवादी सरकारचे योगदान आहे. तर या सरकारला ४ वर्षाच्या काळात अद्याप ३२ खात्याची कार्यालये उभारता आले नाहीत. ते विकास काय करणार?विनाशकारी प्रकल्प राबवुन जमीनी काढून घेण्याचे काम भाजप शिवसेना सरकारने सुरु केले आहे. हे प्रकल्प आणत असताना कोणी तुम्हाला तुमचे मत विचारले आहे का? असा सवाल त्यांनी केला. या भागात चालणाऱ्या आदिवासी आश्रमशाळेच्या निधीची तरतूद कमी केली, शिष्यवृत्ती कमी केली स्कॉलरशिप मिळत नाही अशी परिस्थिती असतांना बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्ग कशासाठी पाहीजेत. अशी उपरोधीक टीका अशोक चव्हाण यांनी केली. या देशाला भाजपमुक्त करण्यासाठी देशातील प्रमुख पक्ष एकत्र आणण्याची गरज आहे .सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता असे या सरकारचे काम सुरु आहे. भाजप सत्तेत असताना सर्व खात्यांचा वापर भाजपला ताकद देण्यासाठी करीत असल्याची टीका त्यांनी केली .तर काँग्रेस पक्ष सर्वसामान्यांच प्रश्न सोडवणारा आहे.असेही ते म्हणाले. या सरकारने अघोषित आणीबाणी घोषित केली आहे. भाजप सरकार उखडून फेकून टाका, असे आवाहन त्यांनी मतदारांना केलं.ठाकूर यांचे टीकास्त्रभाजप सरकारला आदिवासींसाठी वेळ नाही आणि आता राज्याचे मुख्यमंत्री मते मागण्यासाठी चारचार वेळा तालुक्यात येतात. अशी टीका आमदार आनंद ठाकूर यांनी केली.पालकमंत्री मूग गिळून बसतात .निर्णय घेत नाही.त्यामुळे आदिवासींचा विकास रखडला आहे असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाण