शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

निबंधक कार्यालयातील ऑनलाइन दस्तनोंदणी ठप्प; खोदकामामुळे बीएसएनएलची केबल नादुरुस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 00:40 IST

आठ दिवसांपासून कामे रखडली

वसई : वसई तालुक्यातील सुयोग नगर येथील दुय्यम निबंधक वसई - १ या कार्यालयामधील इंटरनेट कनेक्टिव्हिटी वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. आठवड्याभरापासून बीएसएनएलच्या इंटरनेटअभावी येथील शेकडो खरेदी-विक्री व्यवहारांची दस्तनोंदणी होऊ शकत नसल्याची माहिती वसई - १ च्या दुय्यम निबंधक वर्ग २ च्या अधिकारी मंगला पवार यांनी ‘लोकमत’ला दिली.

नोंदणी आणि मुद्रांक विभागाने जमीन खरेदी-विक्री दस्तांची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने सुरु केली आहे. परंतु, ३१ जानेवारीपासून पापडी भाबोळा परिसरात पालिकेच्या खोदकामामुळे दुय्यम निबंधक कार्यालयाला सेवा देणारी बीएसएनएलची मुख्य केबलच नादुरूस्त झाली असून पूर्ण सेवाच खोळंबली आणि याचा फटका दस्तनोंदणीला बसला आहे.

बीएसएनएलची कनेक्टिव्हीटी नसल्याने दस्त नोंदणी आणि त्याच्या स्कॅनिंगसाठी मोठी अडचण येत असते. गेल्या आठवड्यात पापडी भागात पालिकेने खोदकाम करून मोठाले खड्डे केले होते. त्यात ही बीएसएनएलची नेट केबलच नादुरुस्त झाली. त्यामुळे आठवडाभरापासून येथे कोणतीही दस्त नोंदणी झालेली नाही. आठ दिवसांपासून दस्त मिळावे यासाठी सकाळ -संध्याकाळ कार्यालयात हेलपाटे मारणारे नागरिकही यामुळे त्रस्त आहेत.

आठवडाभर दस्त नोंदणी झालीच नाही, अशी ही पहिलीच वेळ असल्याची प्रतिक्रिया येथील एका त्रस्त जेष्ठ नागरिकाने ‘लोकमत’ला दिली. पर्याय म्हणून बीएसएनएल तसेच नोंदणी आणि मुद्रांक विभागाने तातडीने लक्ष देऊन सर्व्हरशी कनेक्टिव्हिटी खंडित होणार नाही, याची दक्षता घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर सुयोग नगरस्थित दुय्यम निबंधकांनी बीएसएनएलकडे यासंदर्भात तक्रार केली. त्यानंतर आठवड्याभराने म्हणजेच गुरुवारी हे केबल दुरुस्तीचे काम बीएसएनएलने हाती घेतले आहे.

अजूनही दोन दिवस हे काम सुरू राहील, अशी माहिती मिळते आहे. त्यानंतरच हे दस्त नोंदणी आणि स्कॅनिंगचे काम सुरळीत होईल, अशी चिन्हे आहेत.याबाबत नवघरस्थित महापालिकेच्या पाणी विभागाचे नियंत्रक केतन राऊत यांनी सांगितले की, आम्ही तीन दिवस खड्डे रिकामे ठेवले होते. मात्र, बीएसएनएलने काम केलेच नाही, त्यामुळे आपण त्यांच्याकडे विचारणा करावी.

नेट कनेक्टिव्हिटी आणि नादुरूस्त केबलमुळे आठवडाभरापासून आॅनलाइन दस्त ठप्प आहेत. दररोज साधारण ३० दस्त होतात. आता खोदकामामुळे नेट ठप्प आहे आणि महसूलही बुडतो आहे. आम्ही बीएसएनएलकडे तक्रार केली असून त्यांचे काम सुरू आहे. हे नेट सुरळीत होण्यास अजूनही एखादा दिवस जाईल. यामुळे नागरिकांना त्रास आणि कार्यालयाचेही काम वाढते आहे.- मंगला पवार, वसई -१ दुय्यम निबंधक वर्ग -२, सुयोग नगर कार्यालय

टॅग्स :Vasai Virarवसई विरारMaharashtraमहाराष्ट्र