शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
2
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
3
प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार!
4
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
5
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
6
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांनी टीका
7
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
8
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
9
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
10
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
11
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
12
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
13
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
14
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
15
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
16
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
17
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
18
India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup : तोच पॅटर्न! अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा
19
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
20
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
Daily Top 2Weekly Top 5

विमा कंपनीनेही फिरविली पाठ , बळीराजा मेटाकुटीला : पावसाने केली अवकृपा, पंचनामे करणारी महसूल यंत्रणा संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 01:31 IST

या तालुक्याला भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते. चवीला रु चकर असलेला वाडा कोलम खवैय्यांच्या आवडीचा तांदूळ आहे. मात्र या भाताच्या कोठारावर ह्या वर्षी निसर्गाने घाला घातला असून यंदा ५० ते ६० टक्के पीक रोगांनी आणि परतीच्या पावसाने नष्ट झाले असून शेतकरी हवालदील झाला

वसंत भोईरवाडा : या तालुक्याला भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते. चवीला रु चकर असलेला वाडा कोलम खवैय्यांच्या आवडीचा तांदूळ आहे. मात्र या भाताच्या कोठारावर ह्या वर्षी निसर्गाने घाला घातला असून यंदा ५० ते ६० टक्के पीक रोगांनी आणि परतीच्या पावसाने नष्ट झाले असून शेतकरी हवालदील झाला आहे तसेच सध्या सतत पडत असणाºया पावसाने राहिलेले भातपीकसुद्धा वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.खरीप हंगाम २०१७ साठी तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेनुसार हेक्टरी ७८० रुपये दराने भात पिकाचा विमा उतरविण्यात आला आहे त्यासाठी विमा संरक्षण रक्कम ३९ हजार रुपये प्रति हेक्टर एवढी निश्चित करण्यात आली आहे. तसेच पालघर जिल्ह्याच्या या विम्याची जबाबदारी नॅशनल इन्शुअरन्स वर सोपवली आहे. नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे नुकसान झाल्यास शेतकºयांना ही रक्कम भरपाई म्हणून कंपनी देणार होती. हजारो शेतकºयांनी हा पीकविमा काढला आहे ज्यांनी पीककर्ज घेतले त्यांच्या कर्जातूनच वजा करण्यात आला होता. मात्र असे असूनसुद्धा आता मात्र ह्या विमा कंपन्यांने नैसर्गिक आपत्तीने आणि रोगाने पिकाचे नुकसान झालेल्या शेतकºयांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे कर्जाच्या रकमेची फेड करायची कशी? असा प्रश्न शेतकºयांसमोर उभा आहे. सरकारने घोषित केलेल्या कर्जमाफी योजनेचे अर्ज भरून महिना झाला त्याचा दमडा अजून मिळालेला नाही. हातातले पीक गेलेले आणि हप्ता घेऊनही विमा कंपनी भरपाईबद्दल शब्द उच्चारत नाही. अशा त्रांगड्यात बळीराजा सापडला आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारFarmerशेतकरी