शहरं
Join us  
Trending Stories
1
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
2
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
3
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
4
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
5
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
6
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
7
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
8
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
9
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
10
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
11
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
12
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
13
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
14
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
15
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
16
फ्रीचं वायफाय पडेल महागात! सार्वजनिक वाय-फाय वापरणाऱ्यांना गुगलने दिला मोठा इशारा; कनेक्ट कराल तर.. 
17
बदल्याची आग! 'तो' वाद टोकाला गेला, पुतण्याने आईच्या मदतीने काढला काकीचा काटा अन्...
18
पंजाबमध्ये दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश, १० ISI एजंटना अटक; मोठ्या हल्ल्याचा कट रचला होता
19
8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगात या कर्मचाऱ्यांचा समावेश होणार, नवीन नियम जाणून घ्या
20
३२ वर्षांची मुलगी एआयच्या प्रेमात पडली, 'आय लव्ह यु' म्हणाली अन् लग्नगाठ बांधली! VIRAL झाला लग्नाचा व्हिडीओ
Daily Top 2Weekly Top 5

३९ वेळा आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करणारा प्रेरणादायी भारतीय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 17:01 IST

जागतिक आयर्नमॅन समुदायातही अभिमानाने नोंदवली जाते.

लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) :- शरीर थकू शकतं, पण मन थकायला नको असे म्हणणारे आणि हे अक्षरशः जगणारे भारतीय अ‍ॅथलीट हार्दिक पाटील यांनी पुन्हा एकदा इतिहास घडवला आहे. त्यांनी नुकतीच फ्रान्समध्ये झालेली व जगभरात सर्वात आव्हानात्मक आणि प्रतिष्ठित मानल्या जाणारी आयर्नमॅन वर्ल्ड चॅम्पियनशिप अवघ्या १६ तास ५ मिनिटांमध्ये पार केली. त्यामध्ये ३.८ किलोमीटर पोहणे १ तास १९ मिनिटांत, १८० किलोमीटर सायकलिंग ८ तास ८ मिनिटांत , ४२.२ किलोमीटर धावणे ६ तास ४ मिनिटांत याप्रमाणे विक्रमी वेळेत यशस्वीरीत्या पूर्ण करत आपल्या कारकिर्दीतील ३९ वी आयर्नमॅन स्पर्धा पार केली. हार्दिक पाटील यांनी ही कसोटी ३९ वेळा उत्तम रीतीने पार केली आहे. ही बाब केवळ भारतीय क्रीडाजगतात नव्हे, तर जागतिक आयर्नमॅन समुदायातही अभिमानाने नोंदवली जाते.

भारतासारख्या देशात ट्रायथलॉन क्रीडा अजूनही प्रसिद्धीपासून दूर आहे. अशा पार्श्वभूमीवर हार्दिक पाटील यांसारख्या खेळाडूंनी केवळ सहभागी होणंच नव्हे, तर ३९ वेळा आयर्नमॅन पूर्ण करणं हे आश्चर्यकारक आहे. त्यांच्या कामगिरीमुळे देशातील अनेक तरुणांना या क्षेत्रात करिअर घडवण्याची प्रेरणा मिळते आहे. या पराक्रमामुळे 'शरीर कितीही दमलं तरी मनातली आग विझता कामा नये' हा संदेश समाजात पोहचतो आहे. त्यांचं म्हणणं आहे, प्रत्येक माणसात एक आयर्नमॅन लपलेला आहे. गरज आहे ती फक्त त्याला जागवण्याची. आज जेव्हा अनेक तरुण वेगवान यशाच्या शोधात असतात, तेव्हा हार्दिक यांचा सातत्यपूर्ण, कष्टाळू आणि लढवय्या प्रवास एक आदर्श उभा करतो.

३९ स्पर्धा पूर्ण करूनही हार्दिक थांबण्याच्या मूडमध्ये नाहीत. त्यांच्या पुढच्या उद्दिष्टांमध्ये काही विशिष्ट अ‍ॅल्ट्रा ट्रायथलॉन स्पर्धा, आयर्नमॅन कोचिंग व कार्यशाळा, आणि भारतात ट्रायथलॉन संस्कृती रुजवणं यांचा समावेश आहे. महत्वाचे म्हणजे, आयर्नमॅन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये इव्हेंटच्या आयोजनावर पर्यावरणाचा देखील मुख्य विचार केला गेला. आयोजकांनी सस्टेनेबल पद्धती वापरल्या, ज्यामुळे या स्पर्धेने सर्क्युलर इकोनॉमीची अंमलबजावणी केली होती. 

आयर्नमॅन वर्ल्ड चॅम्पियनशिप फ्रान्सची स्पर्धा फक्त क्रीडापटूंच्या ताकदीची आणि सहनशक्तीची परीक्षा नव्हती, तर हा एक अद्वितीय अनुभव होता. जो प्रत्येक खेळाडू, प्रशिक्षक आणि प्रेक्षकांसाठी संस्मरणीय ठरला. या स्पर्धेने, विविध देशांच्या क्रीडापटूंना एकत्र आणून, चांगल्या क्रीडा मूल्यांमध्ये एकता आणि समर्पण यांना प्रोत्साहन दिले. आयर्नमॅन वर्ल्ड चॅम्पियनशिपने हे सिद्ध केले की, सीमा ओलांडून, कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाने आपल्याला कोणतीही अडचण पार करता येऊ शकते.

English
हिंदी सारांश
Web Title : Inspiring Indian Completes Ironman 39 Times, Sets Global Example

Web Summary : Hardik Patil completed his 39th Ironman in France in 16 hours, inspiring Indian youth in the triathlon. He promotes perseverance and believes everyone has inner strength. He aims to cultivate triathlon culture in India.
टॅग्स :Vasai Virarवसई विरार