शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

अफगाणिस्तानच्या फायटर्सवर भारतातले फायटर्स ठरले भारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 23:58 IST

पालघर फायटिंग लीग उत्साहात; नियोजनबद्ध आयोजनाचे सर्वांनी केले कौतुक

पालघर : पालघर जिल्ह्यात अलीकडेच आयोजिण्यात आलेली ‘पालघर फायटिंग लीग’ उत्साहात पार पडली. वेगवेगळ्या राज्यातील व देश-विदेशातील फायटर्सनी आधीच या लीगला पसंती दाखवली होती. अफगाणिस्तान आणि भारत यांच्यातील सामने या लीगचे विशेष आकर्षण होते. पालघर फायटिंग लीगचे व फिटनेस फॅक्टरीचे संस्थापक विवेक उपाध्याय यांच्या तालमीत तयार झालेले भारताचे फायटर अफगाणिस्तानच्या व्यावसायिक फायटर्सवर भारी पडल्याचे पाहायला मिळाले. फिटनेसबद्दल जागरूकता, दोन नवीन खेळांमध्ये करियरची संधी, व्यसनमुक्त पालघर व महिलांसाठी सेल्फ डिफेन्स हे सर्व मुद्दे घेऊन सुरुवात केलेल्या पालघर फायटिंग कार्यक्रमाला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद जनतेने दिला, असे पालघर फायटिंग लीगच्या ट्रेझरर सिम्मी सिंग यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले आहे.भारत व अफगाणिस्तानच्या लढतीत अविनाश पांडे, वैभव देवरे, मुकुल कश्यप व मणियार मजहर खान यांनी आपल्या लढती जिद्दीने जिंकून उपस्थितांमध्ये देशप्रेमाची भावना जागृत केली. तसेच अ‍ॅलेक्स हरिजन व एंजल पाटील यांनी चिकाटी दाखवून चांगली लढत दिली. लढती गमावून सुद्धा त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. स्टेडियममधील उपस्थितांमध्ये एक वेगळाच जोश पाहायला मिळाला.वेगवेगळ्या देशातून व राज्यातील आलेल्या कोचेस व फायटर्सनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, अशा प्रकारचे नियोजनबद्ध व भव्य आयोजन भारतातच प्रथम पाहायला मिळाले आहे. असेच आयोजन जर होत राहिले तर ग्रापलिंग व एमएमए या खेळाची लोकप्रियता भारतात लवकर वाढून देश-विदेशात खेळण्याच्या संधी लवकरच सर्वांना उपलब्ध होतील.सेल्फ डिफेन्ससाठी टीम सज्जया लीगच्या पहिल्याच दिवशी ‘लोकमत’ समूहाचे सहायक उपाध्यक्ष विजय शुक्ला यांनी उपस्थिती दाखवली होती. त्यांचे स्वागत करून पीएफएलचे व्यवस्थापकीय संचालक यतीन पाटील यांनी अशा प्रकारचे कार्यक्रम व लिग्स मुंबई व महाराष्ट्रातील इतर ठिकाणी ‘लोकमत’सोबत आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली.पीएफएलच्या टीमने पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात पूर्ण झाले असून त्याचे उद्दिष्टही साध्य होताना दिसत आहे. अशा प्रकारच्या अकॅडमीज काढून जास्तीत जास्त फायटर्स भारतासाठी तयार करण्यासाठी व मोठ्या प्रमाणात मोफत सेल्फ डिफेन्सचे प्रशिक्षण देण्यासाठी टीम पीएफएल सज्ज आहे, असे यतीन पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.