शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशमन केंद्रात मनुष्यबळ वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 01:56 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या उत्तन येथील अग्निशमन केंद्रात पुरेसे मनुष्यबळ तसेच वाहनांची संख्या अपुरी असल्याने येथील वाढत्या लोकवस्तीच्या प्रमाणात ते तोकडे पडत आहे. त्यामुळे प्रशासनाने त्वरित येथील केंद्रात पुरेशा मनुष्यबळासह वाहने उपलब्ध करुन द्यावीत

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या उत्तन येथील अग्निशमन केंद्रात पुरेसे मनुष्यबळ तसेच वाहनांची संख्या अपुरी असल्याने येथील वाढत्या लोकवस्तीच्या प्रमाणात ते तोकडे पडत आहे. त्यामुळे प्रशासनाने त्वरित येथील केंद्रात पुरेशा मनुष्यबळासह वाहने उपलब्ध करुन द्यावीत, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका शर्मिला बगाजी यांनी पालिकेकडे केली आहे.पालिकेची भार्इंदर पश्चिमेकडील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग व सिल्वर पार्क येथे प्रमुख अग्निशमन केंद्रे आहेत. याखेरीज उत्तन येथील पाण्याच्या टाकीजवळील एका खोलीत तसेच नवघर येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये पर्यायी अग्निशमन केंद्र सुरू करण्यात आली आहेत. अग्निशमन दलात एकूण ९ मोठे व २ मिनी फायर व वॉटर टेंडर अशा एकूण ११ बंबगाड्या, १ रेस्क्यु व्हॅन, २ वॉटर टँकर, १ टिटीएल (टेबल टर्न लॅडर), १ रूग्णवाहिका तैनात ठेवल्या आहेत. ते हाताळण्यासाठी एकूण ८२ अधिकारी व कर्मचारी तीन पाळ्यांत काम करतात.उत्तनच्या अग्निशमन केंद्रात प्रत्येक पाळीत १ लिडींग फायरमन, २ फायरमन, १ फायरमन कम ड्रायव्हर, १ कंत्राटी ड्रायव्हर असे एकूण ६ अधिकारी व कर्मचारी असतात. या केंद्रासाठी पूर्वी एक मिनी फायर व वॉटर टेंडर वाहन दिमतीला दिले जात होते. सध्या १ मोठे वाहन दिले आहे. या केंद्राजवळच घनकचरा प्रकल्प असून अनेकदा आगीच्या घटना घडतात.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक