शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

पालघर जिल्ह्यात अपुरा धान्यपुरवठा

By admin | Updated: September 26, 2015 00:40 IST

पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यातील गरीब व अत्यल्प उत्पन्न असलेल्या लाभार्थी कुटुंबांना सप्टेंबर महिन्यातील सणासाठी ४ हजार ८७५ क्विंटल साखर, ४२ हजार ७१०

पालघर : पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यातील गरीब व अत्यल्प उत्पन्न असलेल्या लाभार्थी कुटुंबांना सप्टेंबर महिन्यातील सणासाठी ४ हजार ८७५ क्विंटल साखर, ४२ हजार ७१० क्विंटल तांदुळ तर २८ हजार ४७० क्विंटल गव्हाचे नियतन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी दिले होते. परंतु सप्टेंबर महिना संपत आला तरी अनेक तालुक्यातील ग्रामीण भागात साखरेचे वाटप लाभार्थ्यांना झाले असून अनेक भागात अपुरा पुरवठा करण्यात आला आहे.जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा हे सहा तालुके आदिवासी बहुल तालुके म्हणून ओळखले जात असून पालघर व वसई हे तालुके अंशत: आदिवासी तालुके म्हणून ओळखले जातात. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत असलेल्या प्राधान्य कुटूंबा (पिवळे रेशनकार्डधारक कुटूंब व अंत्योदय कार्डधारक) च्या १४ लाख २३ हजार ५९५ लाभार्थ्यांना हे धान्य वितरीत करण्यात येणार होते. त्यासाठी प्राधान्य कुटुंबातील प्रतिकार्डधारकाला २५ किलो तांदुळ याप्रमाणे ४२ हजार ४५० क्विंटल तांदुळ तर १० किलो गहु या प्रमाणे ९८७० क्विंटल गहु व ०.६६० ग्रॅम साखर प्रती माणशी वाटप करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते.जिल्ह्यातील प्राधान्य कुटुंबातील प्रती माणशी ५०० ग्रॅम साखर वाटप करण्यात येत असले तरी सप्टेंबर महिन्यात आलेल्या सणासाठी प्रती मानशी ६६० ग्रॅम साखरेचे वाटप करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी देऊन त्यासाठी ४ हजार ८७५ क्विंटल साखर आठ तालुक्यातील वाटपासाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. जव्हार तालुक्यातील १ लाख १६ हजार ८० लाभार्थ्यांसाठी ५१७ क्विंटल साखर, विक्रमगड तालुक्यात १ लाख २६ हजार ६६९ लाभार्थ्यांसाठी ५६४ क्विंटल, मोखाडा तालुक्यातील ८२ हजार २५३ लाभार्थ्यांसाठी ३६६ क्विंटल, पालघर तालुक्यातील १ लाख ९७ हजार ७६१ लाभार्थ्यांसाठी ८८० क्विंटल साखर, डहाणू तालुक्यातील २ लाख ४२ हजार ६६६ लाभार्थ्यांसाठी १०८१ क्विंटल, तलासरी तालुक्यातील १ लाख २० हजार ४०८ लाभार्थ्यांसाठी ५३६ क्विंटल साखर, वाडा तालुक्यातील १ लाख २१ हजार ९६९ लाभार्थ्यांसाठी ५४३ क्विंटल तर वसई तालुक्यातील ८७ हजार १६४ लाभार्थ्यांसाठी ३८८ क्विंटल साखरेचे वाटप करण्याची मंजुरी देण्यात आलेली होती. आॅगस्ट २०१५ मध्ये तालुक्यातील गोदामामध्ये शिल्लक असलेली ३३९०.३६ क्विंटल साखरही सप्टेंबर महिन्यात वाटप करण्याचे आदेश जिल्हाधिकारी बांगर यांनी दिले होते.परंतु आजही अनेक तालुक्यात साखरेचे वाटप करण्यात आले नसून अनेक भागात अपुरे वाटप झाले आहे. (वार्ताहर)