शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

दिवसाढवळ्या ज्वेलर्स मालकावर जीवघेणा हल्याने वसईत खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 18:07 IST

पोटावर चाकूने केला वार, वालीव पोलिसांत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) :- वसईत दिवसाढवळ्या ज्वेलर्स मालकांवर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याने खळबळ माजली आहे. या घटनेनंतर परिसरात घबराट पसरलेली आहे. आरोपीने पोटावर चाकूने वार केल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास घडली आहे. घटनेची माहिती मिळताच वालीव पोलीस घटनास्थळी भेट दिली आहे. नेमका हा हल्ला चोरीच्या इराद्याने झाला की कोणत्या कारणामुळे याचा पोलिस तपास करत आहे. फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहे. जखमी मालकाला जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.

अधिक माहितीनुसार, वसई पूर्वेस वालीव येथे काळु सिंग यांच्या मालकीचे अंबिका ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. भर दुपारी गर्दीच्या ठिकाणी हल्लेखोराने दुकान मालकावर चाकूने हल्ला करून त्यास गंभीर जखमी केले आहे. घटनेनंतर हल्लेखोर फरार झाला आहे. यावेळी उपस्थित नागरिकांनी जखमी मालकास रिक्षा मधून इस्पितळात उपचारार्थ दाखल केले. 

पोलिसांनी या परिसरामधली नाकाबंदी केलेली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपीला अटक करण्यात येईल. तसेच आरोपीला पकडण्यासाठी वेगवेगळे पोलिस पथके तयार करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले श्रींगी यांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Daylight Attack on Jeweler in Vasai Causes Stir; Investigation On

Web Summary : A jeweler in Vasai was critically injured in a daylight knife attack. The assailant fled, prompting a police investigation and search. The victim is hospitalized, and police are reviewing CCTV footage. Multiple teams are working to apprehend the attacker.
टॅग्स :Vasai Virarवसई विरारCrime Newsगुन्हेगारी