शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

पाणथळ जागांवरील अतिक्रमणावर कारवाई न झाल्यास उपोषण करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 10:45 PM

पर्यावरण संवर्धन समितीचा इशारा; वसईच्या पश्चिम पट्ट्यात अतिक्रमण

वसई : वसईतील पश्चिम पट्ट्यातील भुईगाव येथील पाणथळ जागेवरील त्या बेकायदा अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश असतानाही ही कारवाई वेळीच न झाल्याने आता पुन्हा नव्याने पर्यावरण संवर्धन समिती आक्र मक झाली आहे. याबाबत महसूल व पालिका प्रशासनाकडून कारवाई न झाल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा पर्यावरण संवर्धन समितीतर्फे देण्यात आल्याची माहिती समितीचे समन्वयक समीर वर्तक यांनी ‘लोकमत’ला दिली.वसई पश्चिमेकडील भुईगाव या समुद्रकिनारपट्टी भागातील सरकारच्या मालकीच्या पाणथळ जमिनीवरील कांदळवनांची बेसुमार कत्तल करून तेथे बेकायदा भराव करण्यात आलेले आहेत. याव्यतिरिक्त येथे अनेक ठिकाणी अनधिकृत कोळंबी प्रकल्प आणि घरे देखील बांधण्यात आली आहेत. पाणथळीच्या भागात काहींनी पाचशे फूट रूंद आणि तीनशे फूट लांबीच्या तसेच आठ फूट उंचीच्या दोन दगडी भिंतीही बांधल्या आहेत. येथील पाणथळीवरील हजारो तिवरांची बहुमोल वनसंपदा नष्ट करून मोडके-तोडके अवशेष आता याठिकाणी पाहावयास मिळत आहेत.याविरोधात ‘हरित नैसर्गिक वैभव बचाव अभियान’ तथा ‘पर्यावरण संवर्धन समिती’ या दोन संघटना आजमितीला लढा देत आहेत. मात्र, वसईची महसूल, महापालिका आणि पोलीस यंत्रणा हे काम तातडीने करत नसल्याचा गंभीर आरोप पर्यावरण संवर्धन समितीने केला आहे.पाणथळ जागेवरील अतिक्र मणांबाबत हरित नैसर्गिक वैभव बचाव अभियान आणि मुंबईतील वनशक्ती या संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. यावर मुंबई उच्च न्यायालयात जुलै २०१६ मध्ये झालेल्या सुनावणीत न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला जाब विचारला असता महाराष्ट्र सरकारचे वकील अ‍ॅड. मातोस आाि वसईचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी दादाराव दातकर यांनी भुईगाव येथे कांदळवनांची कत्तल करून या जमिनीवर अतिक्र मणे झाल्याचे मान्य केले होते. त्यानुसार ही अतिक्रमणे पाडून टाकण्यासाठी एका आठवड्याचा अवधीही मागितला होता. त्यावर २५ जुलै २०१६ रोजी ही अतिक्र मणे काढण्याची धडक मोहीम सुरू केली जाईल, असे हमीपत्रही मुंबई उच्च न्यायालयास दिले होते. मात्र, आजपर्यंत एकाही अतिक्रमणावर कारवाईच झाली नसल्याचे पर्यावरण संवर्धन समितीच्या समीर वर्तक यांनी स्पष्ट केले.२ डिसेंबरपासून बेमुदत उपोषण !भुईगाव येथील सरकारी पाणथळ जागेवरील अनधिकृत अतिक्रमणे आणि कोळंबी प्रकल्प निष्कासित करावी या मागणीसाठी २ डिसेंबरपासून आमरण उपोषणाचा इशारा पर्यावरण संवर्धन समितीने दिला आहे. याबाबतचे निवेदन वसई-विरार शहर महानगरपालिका आयुक्त आणि प्रांत अधिकारी तसेच तहसीलदार यांना देण्यात आले आहे.