शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

विद्यार्थ्यांनी बनवली हायब्रीड बाइक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 00:41 IST

रुस्तमजी अकाडमी फॉर ग्लोबल करियर या शैक्षणिक संस्थेतील आॅटोमोबाइल डिप्लोमा शाखेच्या विद्यार्थ्यांनी हायब्रीड बाईक बनवली

डहाणू/बोर्डी : रुस्तमजी अकाडमी फॉर ग्लोबल करियर या शैक्षणिक संस्थेतील आॅटोमोबाइल डिप्लोमा शाखेच्या विद्यार्थ्यांनी हायब्रीड बाईक बनवली असून ती पेट्रोल आणि इलेक्ट्रॉनिक या दोन्ही पद्धतीने चालते. त्यामुळे ती विशेष असल्याचे मत तिची निर्मिती करणाऱ्या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, इंधन दरवाढ आणि पर्यावरण संवर्धनात तिचे महत्व अधोरेखित होत असल्याने बाजारात तिचे स्वागत होईल.आजची तरु णपिढी ही पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील आहे. त्यामुळे त्यांच्याकरिता काही वेगळे देण्याच्या प्रयोजनातून ही बाईक आकाराला आल्याचे भाग्येश अनिल पाटील, प्रणीत शिरीष आंब्रे, हर्ष परेशकुमार प्रजापती आणि प्रणव आशिष कंसारा या विद्यार्थ्यांनी सांगितले. यापूर्वीही बाजारात हायब्रीड बाईक आहेत, मात्र त्यापेक्षा यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. त्यामुळे पेट्रोलवरील खर्च तर वाचेलच शिवाय ती विजेवर धावत असल्याने वायू व ध्वनी प्रदूषण मुक्तीचा हेतू साध्य होईल असे या प्रकल्पाचे मार्गदर्शक प्रा. रामकृष्ण बंडीकोला, प्रा. चिराग महाले यांचे म्हणणे आहे.१५० सीसी बाईकच्या वापरतून ही डबल पद्धत कार्यान्वित करण्यात आली आहे. डीसी इलेक्ट्रीक हब मोटार रियर व्हील मध्ये वापरली असून चाकाच्या मध्यभागी बसवल्याने नॉर्मल व्हील सारखी दिसतेच. शिवाय कमी जागा व्यापते. यामध्ये बरेच फिचर वापरल्याने आवश्यकतेनुसार सॉफ्टवेअरच्या वापरातून प्रोग्रामिंग शक्य आहे. तर मुख्य वैशिष्ट्य म्हणजे रिजवरेटीव्ह पॉवरने लिथियम आयर्न बॅटरीला चार्ज करते.ही बाईक इंजिनवर चालताना मोटरमधील रिजनरेट पॉवर, रिजनरेटीव्ह कंट्रोलद्वारे घेऊन लिथियम आयर्न बॅटरीला चार्ज करण्यास पाठवते. ती ३० किमी अंतर कापण्याकरिता ४० किमी तासाच्या वेगाने चालताना लिथियम आयर्न बॅटरी पूर्ण चार्ज करते. तिचा बॅकअप चांगला असल्याचा दावा त्यांनी केला असून ४० ते ४५ किमी अंतर कापताना तासाला ७० किमीचा वेग देते. हे करताना रस्त्याची स्थिती विचारात घेणे आवश्यक आहे. प्लग इन हा दुसरा पर्यायही येथे दिला आहे. बॅटरीचा आकार पहिल्यांदाच व्ही या इंग्रजी अक्षरासारखा केला आहे. तर बॅटरीचा वेग नियंत्रणात आणण्याकरिता इलेक्ट्रिÑक थंब थ्रोटल हा हँडच्या आधी बसवला आहे. दोन्हीपैकी एक पद्धत वापरताना वेग कमी करणे गरजेचे आहे. शिवाय भविष्यात नवीन तंत्रज्ञानही वापरता येऊ शकेल.