शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

हुंड्यासाठी आईसह पोटातील बाळाला औषध देवून ठार मारणाऱ्या नवरा व सावत्र मुलाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 19:02 IST

Nalasopara Crime News: हुंड्यासाठी आईसह पोटातील बाळाला औषध देऊन ठार मारणाऱ्या नवरा व सावत्र मुलाला अटक करण्यात मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी अटक केले आहे.

- मंगेश कराळे नालासोपारा - हुंड्यासाठी आईसह पोटातील बाळाला औषध देऊन ठार मारणाऱ्या नवरा व सावत्र मुलाला अटक करण्यात मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी अटक केले आहे.

आचोळे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महिलेला आरोपी पती जयप्रकाश दुबे व सावत्र मुलगा सचिन दुबे या दोघांनी लग्न झाल्यानंतर तिच्या घरच्यांनी लग्नामध्ये काही दिले नाही या कारणावरून दारू पिऊन मारहाण करत होता. ५ मे रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास आरोपी जयप्रकाशने दारू पिऊन आठ महिन्याची गरोदर असतानाही पीडित महिलेला मारहाण केली. त्यानंतर आरोपी सचिनने तिला पकडून ठेवल्यावर जयप्रकाशने कोणते तरी औषध पिण्यासाठी दिले. तिच्या पोटातील बाळ मयत झाल्याने २० एप्रिलला आचोळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. आरोपी पती जयप्रकाशला आचोळे पोलीसांनी अटक करून वसई न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्याला जामीनावर मुक्त केले. परंतु आरोपी सचिन दुबे हा आचोळे पोलीसांना मिळून येत नव्हता. 

पीडित महिला ही नालासोपाऱ्याच्या स्टार हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना २ जुलैला मृत्यू झाला आहे. याप्रकरणी आचोळे पोलिसांनी त्या गुन्ह्यात हत्येचे कलम वाढविण्यात आले आहे. आरोपी जयप्रकाशचा जामीन रद्द  करण्यासाठी वसई न्यायालयात अहवाल सादर केला होता. न्यायालयाने ११ जुलैला आरोपीचा जामीन रद्द करण्यात आला. तेव्हापासून दोन्ही आरोपी मिळून येत नव्हते.

हुंड्यासाठी पत्नी व तिच्या पोटातील बाळाची हत्या या गंभीर व संवेदनशील गुन्ह्यातील आरोपी मिळून येत नसल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ आरोपीचा शोध घेऊन अटक करण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल राख यांनी पोउपनिरी हितेंद्र विचारे, पोहवा राजाराम काळे, शिवाजी पाटील, गोविंद केंद्रे, हनुमंत सूर्यवंशी, संग्राम गायकवाड, संतोष मदने, अकिल सुतार, साकेत माघाडे, नितीन राठोड असे तपास पथक तयार करून त्यांना तात्काळ आरोपीच्या शोधार्थ रवाना केले. नमूद पथकाने सलग ४ दिवस अहोरात्र मेहनत घेऊन तपासात सातत्य ठेवून तांत्रिक तपास व गोपनीय माहितीचे आधारे सापळा लावून पाहीजे आरोपी जयप्रकाश दुबे (५०) आणि सचिन दुबे (२०) यांना नालासोपारा येथून १६ जुलैला शिताफिने ताब्यात घेतले. नमुद गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना पुढील कारवाईसाठी आचोळे पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीVasai Virarवसई विरार