शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
3
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
4
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
5
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
6
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
7
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
8
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
10
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
11
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
12
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
13
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
14
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
15
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
16
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
17
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
18
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
19
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
20
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका

आदिवासींना घरगुती गॅसचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 04:38 IST

गावातील शंभर आदिवासी लाभार्थ्यांना शेगडीसह एलपीजी गॅस वाटप करण्यात आले.

बोर्डी : संयुक्त वन व्यवस्थापन समिती जळवाई आणि प्रधानमंत्री उज्वला प्लस योजनेअंतर्गत घरगुती गॅसचा सुरक्षित वापरा बाबत जनजागृती कार्यक्रम २० एप्रिल रोजी अस्वाली ग्रामपंचायत सभागृहात पार पडला. यावेळी गावातील शंभर आदिवासी लाभार्थ्यांना शेगडीसह एलपीजी गॅस वाटप करण्यात आले.भारत गॅस एजन्सीच्या बोर्डी सहकारी ग्राहक भांडाराकडून श्राव्य माध्यम आणि प्रात्यक्षिकेद्वारे रेग्युलेटर, शेगडी, लायटरचा वापर आदी. सुरक्षात्मक हाताळणी बाबत माहिती देण्यात आली. या कार्यक्र माचे अध्यक्ष पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय खरपडे म्हणाले की, जंगलानजीकच्या वस्तीने गॅस वापरने ही काळाची गरज आहे. त्यामुळे उपजीविकेचे साधन ठरणाऱ्या वनऔषधी आणि रानभाज्यांसह जंगल वाचवण्यास मदत होईल. जिल्हा परिषदेच्या योजनेतून गॅसचा लाभ देण्याकरीता प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेचे यशापयश नागरिकांच्या संवेदनशील वर्तनावर अवलंबून असून वंशपरंपरागत लाभलेले जंगल वाचवण्याचे आवाहन डहाणू उपवन संरक्षक एन. लडकत यांनी भाषणातून केले. या पश्चिम घाटातील जंगल कटाईवर मात करण्यासह आणि वन्यजीव वाचिवण्यात ही योजना प्रभावी ठरेल असे वाईल्डलाईफ कझरवेशन अँड एॅनिमल वेल्फेअर असोसियशनचे उपाध्यक्ष सूर्यहास चौधरी यांनी याबाबत विश्वास व्यक्त केला. आदिवासी महिलांकरिता हा मोठा हातभार असल्याचे अस्वाली सरपंच सुनीता वरठा म्हणाल्या. या वेळी बोर्डीचे सरपंच प्रेरणा राठोड, जांबूगावचे सरपंच गोकुळ धोडी, सहायक वन संरक्षक डी. जे. पवार, झाई ग्रा. सदस्य विनीत राऊत, ग्राहक भांडाराचे दिनकर चुरी, भालचंद्र चुरी, जगदीश राऊत, अस्वाली ग्रामसेवक अशोक तेलोरे उपस्थित होते.शंभर गॅस पैकी ६० आमदार निधीतून तर, ४० वन विभागाकडून देण्यात आले असून त्या मध्ये शेगडी, सुरक्षा नळी, लायटर आणि रेग्युलेटरचा समावेश आहे. येत्या दहा दिवसात अन्य १०० जोडण्या याच योजनेतून देणार आहेत.’- व्रजेश शहा (चेअरमन,बोर्डी सहकारी ग्राहक भांडार)