शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

पर्ससीनधारक ट्रॉलर्सविरोधात संघर्षाचा पवित्रा

By admin | Updated: November 21, 2015 00:31 IST

पर्ससीनधारक ट्रॉलर्सनी समुद्रामधील मत्स्यसंपदा खरडवून काढल्यानंतर उदरनिर्वाहापुरतेही मासे पारंपरिक मच्छीमारांच्या जाळ्यात सापडेनासे झाल्याने उपजीविकेचा मूलभूत

- हितेन नाईक,  पालघरपर्ससीनधारक ट्रॉलर्सनी समुद्रामधील मत्स्यसंपदा खरडवून काढल्यानंतर उदरनिर्वाहापुरतेही मासे पारंपरिक मच्छीमारांच्या जाळ्यात सापडेनासे झाल्याने उपजीविकेचा मूलभूत अधिकार मिळविण्यासाठी पर्ससीनधारकाविरोधातील संताप आता संघर्षात परिवर्तीत होऊ लागला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्ससीन ट्रॉलर्स जाळल्यानंतर सोमवारी (१६ नोव्हेंबर) मुंबईच्या ससून डॉक बंदरात १० ते १५ टन घोळ मासे पकडून ते विक्रीसाठी उतरविणाऱ्या करंजा येथील दोन ट्रॉलर्सला म.म.कृ. समिती व कफपरेड सहकारी संस्थेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी विरोध केला. या वेळी ट्रॉलर्सच्या व्हीआरसी नोंदीतही तफावत आढळल्याने परवाना अधिकाऱ्याने ट्रॉलर्समालकाला नोटीस बजावली आहे.सध्या पर्ससीन नेट ट्रॉलर्सला देण्यात येणारे परवाने बंद करण्यात आले असले तरी राज्यात ५३५ ट्रॉलर्स नोंदणीकृत आहेत. परंतु, दीड ते दोन हजार पर्ससीन नेट ट्रॉलर्स समुद्रात मासेमारी करीत असल्याचा आरोप मच्छीमार संघटनांकडून केला जात आहे. ट्रॉलर्सच्या व्हीआरसी कागदपत्रांमधील नोंदीमध्ये खाडाखोड, बदल करून बेकायदेशीररीत्या समुद्रात ट्रॉलर्स चालविले जात आहेत. यामध्ये मुंबई येथील मत्स्य व्यवसाय विभागाचे काही अधिकारी या ट्रॉलर्सधारकांना छुपा पाठिंबा देत असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. या व्यवहारात कोट्यवधी रु.चा आर्थिक व्यवहार केला जात असल्याने पर्ससीन ट्रॉलर्सवर कारवाई करण्यात हात आखडता घेतला जात आहे व महाराष्ट्र सागरी मासेमारी नियम अधिनियम १९८१ च्या कायद्यातील तरतुदीही पायदळी तुडविल्या जात असल्याचे महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे चिटणीस रामकृष्ण तांडेल यांनी सांगितले.पालघर जिल्ह्यातील सातपाटी, वसई, डहाणू तालुक्यांतील मासेमारी करणाऱ्या नौकांवरील कामगार दिवाळीनिमित्त सुटीवर गेल्याने मासेमारी बंद आहे. याचा फायदा घेत करंजा येथील मोठ्या प्रमाणातील पर्ससीन ट्रॉलर्सनी प्रथम केंद्रशासित प्रदेश दमणच्या समोरीत समुद्रात मासेमारीला सुरुवात केल्यानंतर दमणच्या मच्छीमारांनी एकजूट दाखवत सर्व ट्रॉलर्सना पिटाळून लावले. तेथून त्यांनी पालघर-डहाणूच्या १२ नॉटीकल अंतरावर मासेमारी करून दोन बोटींनी १० ते १५ टन (१५ हजार प्रति किलो २३०० रु. किलो दराने विक्री) घोळ मासे पकडून नेल्याचे कृती समितीचे सरचिटणीस नरेंद्र पाटील यांनी सांगितले. हे घोळ मासे १६ नोव्हेंबर रोजी मुंबईच्या ससून डॉक बंदरात विक्रीसाठी आणल्यानंतर म.म.कृ. समितीचे चिटणीस रामकृष्ण तांडेल, मुंबई अध्यक्ष किरण कोळी, मोरेश्वर पाटील, कफपरेड मच्छीमार संस्थेचे चेअरमन रमेश मेहेर, भुवनेश्वर धस इ.सह शेकडो कार्यकर्त्यांनी मासे उतरविण्यास हरकत घेतली.परवाने आणि व्हीआरसीची कागदपत्रे तपासली, अनेक ठिकाणी फेरफार व खोट्या नोंदीजोपर्यंत यांचे परवाने व व्हीआरसीची कागदपत्रे तपासली जात नाहीत, तोपर्यंत मासे उतरविण्यास हरकत घेतली. या वेळी उपस्थित परवाना अधिकारी गायकवाड यांनी कागदपत्रांची तपासणी केली असता शकुंतला नाखवा, रा. करंजा, ता. उरण, जि. रायगड यांच्या पार्वती व एकवीरा माऊली या ट्रॉलर्सच्या मोजमात व इंजिनांमध्ये तफावत आढळल्याने त्यांनी परवाना अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय बदल केल्याने महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियम १९८१ च्या कलम ८ (१) (ब) प्रमाणे नोटीस बजावली आहे. त्यामुळे कागदपत्रांमध्ये फेरफार व खोट्या नोंदी करून अनेक पर्ससीन ट्रॉलर्स समुद्रातील मत्स्यसंपदा दिवसाढवळ्या लुटत असून परंपरागत मच्छीमार देशोधडीला लागले आहेत. अशा वेळी म.म.कृ. समितीने कुलाबा पो.स्टे.च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना लेखी तक्रार करून सागरी मासेमारी अधिनियम १९८१ अन्वये पार्वती व एकवीरा माऊली या ट्रॉलर्सच्या मालकांवर कायदेशीर कारवाईची मागणी केल्याचे रामकृष्ण तांडेल यांनी सांगितले.