शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

सुटीचा रविवार गेला पाण्यात वाहून

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 23:54 IST

रविवारी पहाटे ४ वाजल्यापासून विजेचा कडकडाट, ढगांचा गडगडाट यांसह जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळला.

पालघर : रविवारी पहाटे ४ वाजल्यापासून विजेचा कडकडाट, ढगांचा गडगडाट यांसह जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळला. यामुळे रस्त्यांमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचून वाहतूक बंद पडली. पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या. जिल्ह्यात आतापर्यंत ३३०० मिमी. पाऊस झाला असून एका नव्या विक्र माच्या दिशेने पावसाची दमदार वाटचाल सुरू आहे.सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने पुन्हा एकदा जोर धरला असून गणेशोत्सवाचे दहाही दिवस पावसातच गेले. मध्येच थोडी विश्रांती घेतली तरी पाऊस काही थांबत नाही. रविवारी पहाटेपासून कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून मुख्य रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तर काही भागात विद्युत पुरवठा खंडित झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पश्चिम रेल्वेच्या काही गाड्या थोड्या उशीराने धावत होत्या. तर मुंबईच्या दिशेने जाणाºया उदयपूर - बांद्रा एक्स्प्रेस या गाडीला वलसाड स्थानकात थांबवून परत माघारी पाठवण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.जिल्ह्यातील जवळपास २ ते ३ हजार बोटी समुद्रातगणेशोत्सवानिमित्त घेतलेल्या विश्रांतीनंतर वसई, नायगाव, अर्नाळा, सातपाटी, एडवन, मुरबे, डहाणू आदी भागातील २ ते ३ हजार बोटी समुद्रात रवाना झाल्या आहेत. रविवार सकाळपासून वायरलेस सेटवरून या बोटींचा संपर्क होऊ शकत नसल्याचे कव-दालदा संघर्ष समितीचे अध्यक्ष जयप्रकाश मेहेर यांनी सांगितले. समुद्रात गेलेल्या बोटींमधील आपल्या नातेवाईकांशी संपर्क तुटल्याने त्यांच्या घरच्यांची काळजी वाढली आहे. घरातील वायरलेस सेटवरून त्यांच्याशी संपर्क साधून सर्व सुखरूप असल्याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न सतत सुरू आहे.जिल्ह्यातील पावसाचा ३००० मिमी.चा टप्पा पारपालघर जिल्ह्यात १४ सप्टेंबरपर्यंत ३३००.३८ मिमी. पावसाची नोंद झाली असून वसई ३१९४.१६ (१७८.९६ टक्के), वाडा ३७८३.४५ (१४७.८६), डहाणू २९७२.८५(१६३.२८), पालघर ३४१७.५८ (१९७.३८), जव्हार ३५५०.६१ (१०८.४१), मोखाडा ३३१९.६० (१५३.८८), तलासरी २७८३.५९ (१६३.३१), विक्रमगड ३३५८.७६ (१०४.७९) एकूण जिल्ह्यात १४४.७७ टक्के पावसाची नोंद.>वसई-विरार पुन्हा जलमयविरार : शनिवारी रात्री सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरून नागरिकांचे पुन्हा नुकसान झाले. वसई - विरार येथे यंदा सलग सहाव्यांदा पाणी भरल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. सतत उद्भवणाºया पूरिस्थतीमुळे नागरिकांचे हाल होत आहेत.बोळिंज, विराट नगर, विवा कॉलेज रोड, अचोले, नालासोपारा पश्चिम, एव्हरशाईन रोड, इत्यादी ठिकाणी पाणी साचले होते. रविवारी पहाटे नागरिकांच्या घरात पाणी शिरू लागल्याने लोकांची धावपळ सुरु झाली.पहाटे अचानक पाणी शिरल्याने नागरिकांची चांगलीच धावपळ झाली. गेल्या आठवड्यातच येथे पूरिस्थती निर्माण झाली होती. एकाच आठवड्यात पुन्हा अशी परिस्थिती आल्याने नागरिकांमध्ये संताप आहे.पाणी शिरल्याने घरातील सामानाचेच नाही तर नागरिकांच्या गाड्यांचेही भरपूर प्रमाणात नुकसान झाले आहे. पालिका प्रशासन यावर कसलीच ठोस उपाय योजना करत नसल्याने नागरिकांना सतत पुरिस्थतीचा सामना करावा लागत आहे.