शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

एल्ब्रुझ शिखरावर हर्षालीने फडकवला तिरंगा; जगातील सात शिखरांपैकी दोन केली पादाक्रांत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2019 00:34 IST

युरोप खंडातील सर्वोच्च शिखर असलेल्या एल्ब्रुझ शिखरावर वसईतील हर्षाली वर्तक हिने तिरंगा फडकावत देशाची मान उंचावली आहे. जगातील सात उंच शिखरांपैकी दोन शिखरे तिने आठ महिन्यात पादाक्रांत केली आहेत.

पालघर-वसई : युरोप खंडातील सर्वोच्च शिखर असलेल्या एल्ब्रुझ शिखरावर वसईतील हर्षाली वर्तक हिने तिरंगा फडकावत देशाची मान उंचावली आहे. जगातील सात उंच शिखरांपैकी दोन शिखरे तिने आठ महिन्यात पादाक्रांत केली आहेत. वसईतील मांडलई येथील हर्षाली अशोक वर्तक हिने शुक्रवारी रशियातील वेळेनुसार ७ वाजून ४० मिनिटांनी माऊंट एल्ब्रूस शिखर सर केले.माऊंट एल्ब्रुस हे युरोप खंडामधील सर्वोच्च शिखर असून त्याची उंची १८ हजार ५१० फूट म्हणजेच समुद्रसपाटीपासून ५ हजार ६४२ मीटर उंचावर आहे. हे शिखरकायम बर्फाच्छादित असून तेथील तापमान उणे २५ अंश व शिखरावर प्रतितास ३५ मैल इतका सोसायट्याचा वाऱ्याचा वेग असतो.क्षणाक्षणाला बदलणाºया हवामानाला तोंड देत हर्षाली बेस कॅम्पवरून एल्ब्रूस समीटला (शिखराच्या टोकावर) पोहचायला ९ तास वेळ लागल्याचे तिने सांगितले. तिने अनेक अडचणींवर मात करत आपले ध्येय गाठताना शिखरावर पोहचताच तिरंगा फडकवला. ही कामगिरी यशस्वीपणे पार पडल्यानंतर काहीवेळ विश्रांती घेत तिने परतीच्या प्रवासाला सुरू केली. तीला परत आपल्या कॅम्पवर यायला केवळ ५ तास लागले.माऊंट एल्ब्रूस हे जगातील ७ खंडांमधील रशियातील सर्वात उंच शिखरांपैकी एक आहे. हर्षालीच्या या मोहिमेत इतर देशातील अन्य अकरा गिर्यारोहकांचा समावेश होता.मात्र त्यापैकी हर्षालीसह फक्त ७ गिर्यारोहकांनीच शिखरावर पोहचण्यात यश मिळवले. २२ आॅगस्टला भारतात परतणार असल्याची माहिती हर्षालीने दिली. गेल्यावर्षी हर्षालीने अफ्रिकेतील १९ हजार ३४० फूट उंच (५ हजार ८९६ मीटर) किलोमांजरो शिखर सर केले होते. तिने सह्याद्री पर्वत रांगेतील गडांमध्ये कळसुबाई, नाणेघाट, लोहगड, हरिश्चंद्रगड, राजगड, तोरणा, कलावंतीण असे अनेक ट्रॅक तिने पूर्ण केले आहेत.ही शिखरे केली सरहर्षालीने हिमालयातील अनेक शिखरे पादाक्रांत केली असून यामध्ये प्रामुख्याने माऊंट फ्रेंडशिप पीक ( ५ हजार २८९ मीटर ), माऊंट हनुमान तीब्बा ( ५ हजार ९९० मीटर ), माऊंट युनाम (६ हजार ११८ मीटर ), माउंट मेन्थोसा ( ६ हजार ४४३ मीटर), माऊंट फुजी (३ हजार ३७६ मीटर ) यांचा समावेश आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार