शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाकाळात युनिटी फाऊंडेशनचा मदतीचा हात; तीन वर्षे रात्रंदिवस रुग्णवाहिका सेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2021 23:34 IST

तीन वर्षे रात्रंदिवस रुग्णवाहिका सेवा

दिघी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रशासनापुढे आरोग्य सुविधा पुरविण्यास अनेक समस्या येत आहेत. त्यामध्ये ग्रामीण भागात अगोदरच आरोग्य सेवांची वानवा असताना, ऑक्सिजन तुटवड्याचा गंभीर  परिणाम सगळे जण अनुभवत आहेत. अशावेळी अनेक गरजूंना ऑक्सिजनची मदत करण्यास श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील युनिटी फैथ फाउंडेशन पुढे  आली आहे.

युनिटी फैथ फाउंडेशनतर्फे गेली तीन वर्षे गरजूंना रात्रंदिवस रुग्णवाहिकेची सेवा मिळत आहे. या रुग्णवाहिकेमध्ये ऑक्सिजन दोन सिलिंडरची सुविधा असून, संस्थेने सध्याच्या परिस्थितीत कोरोना व इतर रुग्णांसाठी aऑक्सिजनचा साठा वाढवला आहे. तीन वर्षांमध्ये या रुग्णवाहिकांमधून जवळपास सहाशे रुग्णांना सेवा दिली आहे.

यामध्ये वेळोवेळी संस्थेला भाडे स्वरूपात मिळालेल्या मदतीने सत्तरहून अधिक गरजूंना मोफत रुग्णवाहिकेची सुविधा मिळाल्याने तालुक्यासाठी युनिटी फैथ फाउंडेशनची रुग्णवाहिका जीवनवाहिनी ठरली आहे.कोरोनाच्या सध्याच्या गंभीर परिस्थितीत प्रत्येक जण आपल्या पातळीवर समाजाला मदत करण्यासाठी पुढे येत आहे. याच उद्देशाने युनिटी फैथ फाउंडेशन संस्थेचे शब्बीर खाणे, अन्सार चोगले, अथर पांगारकर व इतर सदस्य सर्व घटकांसाठी मदतीला पुढे आले आहेत. 

सध्या कोरोना रुग्णांमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत जाते आणि ते रुग्णांसाठी जीवघेणे ठरू शकते. त्यामुळे अशा लोकांना तत्काळ ऑक्सिजन पुरवठा करून शहरातील रुग्णालयात पोहोचण्यासाठी युनिटी फैथ फाउंडेशनने आपल्या सेवेत ऑक्सिजनचे चार सिलिंडर वाढवून मदत करण्यासाठी एक नवीन पुढाकार घेतला आहे. कोरोनाच्या संकटकाळात संस्थेने दिलेला मदतीचा हात दिलासादायक असल्याचे बोर्लीकर सांगतात. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारOxygen Cylinderऑक्सिजन