पालघरसह वसई-विरारमध्ये मुसळधार पावसाचे थैमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 12:21 AM2020-06-05T00:21:06+5:302020-06-05T00:21:11+5:30

विजेचा लपंडाव : वसईत ४० झाडे कोसळल्याच्या घटना

Heavy rains in Vasai-Virar along with Palghar | पालघरसह वसई-विरारमध्ये मुसळधार पावसाचे थैमान

पालघरसह वसई-विरारमध्ये मुसळधार पावसाचे थैमान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर/पारोळ : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा पालघर जिल्ह्याला सर्वात मोठा धोका होता. मात्र हे वादळ पालघरच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकलेच नसल्याने येथील नागरिकांचे होऊ पाहणारे संभाव्य नुकसान टळले. या वादळाशी दोन हात करण्यासाठी पालघर जिल्हा प्रशासनाने वेळीच खबरदारी घेतली होती. दरम्यान, वादळ शमले असले तरी गुरुवारी सकाळपासूनच वसईत मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. अनेक सखल परिसरात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. तर खबरदारी म्हणून वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.
बुधवारपासूनच ग्रामीण व शहरी भागात चक्रीवादळाच्या भीतीने विद्युतपुरवठा खंडित करण्यात आला होता, तर ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरू होता. वादळामुळे वसई तालुक्यात फारसे नुकसान झाले नसले तरी काही भागात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बुधवारी दुपारपासून ते गुरुवारी संध्याकाळपर्यंत ४० ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. गुरुवारी दुपारनंतर पावसाची रिपरिप सुरू होती. दरम्यान, राज्यात अद्याप मान्सूनचे आगमन होणे बाकी आहे. त्यामुळे आत्ताचा पाऊस हा चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पडल्याची जाणीव शेतकऱ्यांना आहे. साहजिकच जोवर मृगाचा पाऊस कोसळत नाही तोवर शेतकरी नांगर धरणार नाहीत.

यंदा कोरोनाच्या आपत्तीबरोबरच नैसर्गिक आपत्तीलाही शेतकºयांना तोंड द्यावे लागणार आहे. सोशल डिस्टन्सिंग, संचारबंदी असल्याने बºयाचशा शेतकºयांना यंदा शेतीकामासाठी मजूर मिळण्याची शक्यता कमी आहे. साहजिकच, कोरोनाचा यंदा शेती उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.

Web Title: Heavy rains in Vasai-Virar along with Palghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.