शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
2
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
3
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
4
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
5
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
6
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
7
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
8
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
9
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
10
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
11
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
12
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
13
इंडिगोला आणखी एक धक्का; रांचीत लँडिंग दरम्यान 'टेल स्ट्राइक'; थोडक्यात वाचले ७० प्रवासी
14
Lionel Messi: सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
15
WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग
16
"आम्ही थांबणार नाही..", दुसऱ्या बाळाच्या जन्माआधीच भारती सिंग करतेय तिसऱ्या बाळाचं प्लानिंग? पती हर्ष म्हणाला...
17
Stock Market Holidays: पुढच्या वर्षी १५ दिवस बंद राहणार शेअर बाजार, पाहा NSE मध्ये सुट्ट्या कधी, पाहा लिस्ट
18
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी उपस्थित केलं भाजपाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह, म्हणाले, येथे सर्व निर्णय... 
19
जिथं वक्फचा वाद उफाळला, तिथे भाजपाला मिळाला 'ऐतिहासिक' विजय; केरळमध्ये हैराण करणारा निकाल
20
Gold-Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; १८ कॅरेट सोनंही १ लाखांच्या पार, मुंबई ते दिल्ली नवे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

पालघर जिल्ह्यात पावसाचे तांडव सुरूच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 01:23 IST

मंगळवारी मुसळधार पावसाने दिवसभर झड लावल्याने संपूर्ण पालघर जिल्ह्यात जणू जलप्रयलच झाला होता. त्यामुळे पश्चिम रेल्वे, अक्षरश: कूर्मगतीने धावत होती.

पालघर : मंगळवारी मुसळधार पावसाने दिवसभर झड लावल्याने संपूर्ण पालघर जिल्ह्यात जणू जलप्रयलच झाला होता. त्यामुळे पश्चिम रेल्वे, अक्षरश: कूर्मगतीने धावत होती. तर एसटी, शहर बस वाहतूक, अन्य खाजगी वाहने ठप्प झाली होती रस्ते, गल्ल्या, मैदाने सोसायट्यांचा परिसर पाण्याखाली गेले होते. या २४ तासात एकाचा शॉक लागून तर एक वाहून गेल्याने मृत्युमुखी पडला होता. लांब पल्ल्याच्या व अन्य रेल्वे ज्या स्थानकांवर रखडल्या होत्या त्यातील प्रवाशांना सेवाभावी संस्थांनी चहा, नाश्ता, भोजन पुरविल्याने त्यांना थोडा दिलासा मिळाला.जागोजागी भराव आणि उधाणाचा बसला फटकापालघर : समुद्राला पहाटे आलेली भरती आणि त्याच दरम्यान मुसळधार पाऊस पडल्याने हे पाणी नेहमी प्रमाणे समुद्रात जाऊ शकले नाही. त्यातच जिल्ह्यात विविध ठिकाणी मोठमोठी रहिवासी संकुले उभी राहत असल्याने त्यांनी टाकलेल्या भरावाचा फटका बसून शहरी भागात प्रचंड पाणी साठले. अनेक घरामध्ये पाणी शिरले. वसई तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने अंबाडी नाका, माणिकपूर, मिठागर, हॉटेल ग्रीन आदी भागात पूरस्थिती निर्माण झाली होती.एनडीआरएफ ची ४२ लोकांची टीम ६ बोटीसह सज्ज होती.वसई च्या हॉटेल ग्रीन जवळ अडकलेल्या एका गरोदर महिलेला ह्या टीम ने सुरक्षितरित्या रुग्णालयात पोहचविले.तर माणिकपूरच्या गास रोड वर पुरात अडकलेल्या १० लोकांची सुटका अग्निशमन, व पोलिसदलाने केली. पालघर तालुक्यातील पालघर बोईसर रस्त्यावरील कोळगाव, सरावली तर केळवे ते केळवे रोड, दसरमाला ते धावांगे पाडा, माहीम, दातीवरे, आदी अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचून ते घरात पाणी शिरले. केळवे रेल्वे पुलाला पुराच्या पाण्याचा स्पर्श झाल्याचे कधी ऐकले नव्हते. मात्र आज सकाळी ह्या पुला पर्यंत पाणी पोचल्याने रेल्वे प्रशासनाने ह्या पुलाच्या सुरक्षिततेची तपासणी करावी अशी मागणी प्रवाशांनी केलीे.१५० वर्षाचे वडाचे झाड पडले.सातपाटी गाव हे चलेजाव आंदोलनातील मोठे सक्रीय गाव म्हणून सर्वत्र परिचित असून साने गुरु जी, संत गाडगे बाबा यांच्यासह अनेक स्वातंत्र्य सेनानींनी ज्या वडाच्या झाडाखाली आश्रय घेतला होता. ते कोसळून पडले.जिल्ह्यातील पालघर, वसई, तलासरी, वाडा आदी तालुक्यातील शाळांना उशिराने सुट्टी जाहीर करण्यात आल्याने अनेक विद्यार्थी, शिक्षक शाळेत पोचले. मात्र पावसाचा जोर वाढल्याने सर्वांनी घराचा रस्ता धरला. मंगळवारी समुद्राच्या भरतीची सकाळची वेळ ९.४८ वाजताची असल्याने (उंची १३.२२ फुट) पाण्याचा योग्य निचरा झाला नाही. रात्रीची भरतीची वेळ ९.२० ची असल्याने (उंची १२.२४ फुट) रात्री पाऊस पडल्यास पुन्हा मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात.गावातील सासुरवाशिणी, माहेरवाशिणी आदी महिलांसाठी वडाची पूजा करण्याकरीता हे एकमेव झाड होते. ते आज पहाटे वादळी वाऱ्याच्या तडाख्याने कोसळले. हे पाहून अनेकांना अश्रू आवरणे कठीण झाले. ग्रामस्थांनी जड अंतकरणाने ह्या झाडाच्या फांद्या तोडून ते बाजूला सारले. रोज सकाळी वृत्तपत्र विक्रेता ह्याच झाडाखाली बसत असल्याने मोठी गर्दी असते, तसेच विद्यार्थी, चाकरमानी ह्या झाडाखाली आश्रय घेतात.तुफानी पावसाने पालघर तालुक्यात सर्वत्र पूरबोईसर : पालघर जिल्ह्यात दोन दिवसा पासून सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (अतिवृष्टीने) ठीक ठिकाणच्या रस्त्यावरुन पुराचे पाणी प्रचंड वेगाने वाहून जिल्ह्यातील मुख्य व अंतर्गत तसेच गाव - पाड्याच्या रस्त्यावरील वाहतूक थंडावली तर अनेक भागातील वाहतूक पहाटे पासूनच ठप्प झाल्याने काही काळ संपर्क तुटला होता. बोईसर ते मुंबई अहमदाबाद महामार्गावरील खैराफाटक पोलीस चौकी व बेटेगाव हद्दीतील टाटा हाऊसिंग कॉलनी समोरील रस्त्यावरु न तसेच बोईसर-पालघर दरम्यानच्या सरावलीगाव व कोळगाव येथील रस्त्यावर मोठया प्रमाणात पाणी आल्याने दोन्ही रस्ते बंद झाले होते त्या मुळे पालघर तालुका व जिल्ह्याचा संपर्क तुटला होता तर मुंबई-अहमदाबाद हायवे वर वाहतूक अत्यंत धीम्या गतीने चालू होती. तर काही वेळेपुरती बंदही होती त्याच प्रमाणे बोईसर पूर्वेकडील लोखंडी पुला वरून धोकादायकपणे पाणी वाहत होते, आलेवाडी येथे रस्त्यावरून पाणी वाहत होते त्या मुळे नांदगाव -मुरबा रस्ता बंद होता. उनभाट येथील घरात पाणी शिरले होते एकंदरीतच किनारपट्टी व शहरी भागातील जनजीवन सलग आज दुसºया दिवशी विस्कळीत झाले होते. त्यामुळे नागरिकांनी वाहन घेऊन बाहेर पडू नये, वाहनाचा वापर टाळावा, आवश्यक असेल तरच घरातून बाहेर पडावे असे अवाहान प्रशासनाने केले होते.पूल ही पाण्याखाली, आणीबाणीची स्थितीपारोळ : तीन दिवसापासून कोसळणार्या धोधो पावसामुळे वसई तालुका जलमय झाला असून जलप्रलया ची स्थिति निर्माण झाली आहे. रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली असून वसई तील पंधरतारा, मेढे, शिरवली हे पूल तीन दिवसापासून पाण्यात असल्याने १२ गावांचा संपर्क तूटलेला असून वसई विरार भागाला वीजपुरवठा करणाºया महापारेषण वसई अति उच्च दाब केंद्रा मध्ये पुराचे पाणी गेल्याने खबरदारी ची उपाय योजना म्हणून या केंद्रातील वीज पुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. यामुळे वसई गाव,नालासोपारा, आचोले, वालीव, विरार, आगाशी, मनवेल पाडा, अर्नाळा, या भागातील वीज पुरवठा खंडित केला असून यामुळे महावितरणाचे तीन लाख ग्राहकांना विजेविना रहावे लागले आहे.वसई पश्चिम भागात नाळा, बोंडण नाका, पसायदान सेंटर व नानभाट परिसरात कमरेपर्यत पाणी साचलेले आहे. यामुळे येथील शाळा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. इतकेच नव्हेतर येथील स्थानिकांच्या घरात पाणी शिरून मोठे नुकसान झालेलं आहे. फोडणी नाका येथील स्थानिक पिटर लोपीस यांच्या घरात गुडघाभर पाणी असून नुकसान झालेलं आहे. या बाबतीत अर्नाळा -वसई रस्त्यावरील राणेभाट व वर्तक शाळा ते सत्पाला तलावयेथील गटारातील गाळ व्यवस्थित काढण्यात आला नसल्याने हा भाग पाण्याखाली गेला असल्याचे चार्ली रोझेरीया यांनी लोकमतला सांगीतले. जुलैच्या पावसात ही हालत तर आॅगस्टच्या पावसात काय होईल.विरार डोंगर पाडा तलावात बुडून एकाचा मृत्यूवसई : येथील विरारच्या डोंगरपाडा तलावात मुसळधार पावसात ही पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या दोघा मित्रांपैकी एकाचा मंगळवारी दुपारी मृत्यू झाला. राकेश खोत असे मृताचे नाव आहे. दरम्यान मागील तीन दिवसांपासून वसई विरार मध्ये पावसाने थैमान घातले आहे, अशातच तालुक्यातील सर्व तलाव, नदी - नाले, धरणे ओसंडून वाहत असल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापनानेसावधानतेचा इशारा देण्यात येऊन देखील हे दोघे पोहायला गेले होते.तिथे पाण्याचा अंदाज न आल्याने दोहों पैकी एकजण तलावात बुडाला, त्यानंतर भयभीत झालेल्या मित्राने झाल्या घटनेची माहिती संबधितांना दिल्यावर घटनास्थळी विरार पोलीस व पालिका अग्निशमन दल दाखल झाले. या टीमनं शर्थीचे प्रयत्न करून शेवटी राकेश चा मृतदेह तलावातून बाहेर काढला. या प्रकरणी विरार पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास जारी आहे.

 

 वसईतील सब-वे मध्ये झाले पाणीच पाणीवसई - वसई, विरार नालासोपाऱ्यातील सब-वे मध्ये पाणीच पाणी झाले होते. वसईतील भुईगाव, नाळे, पापडी, सगरशेत, वालीव, वाळुंजे पासुन नानभाट चर्च, वाळूनजा ते शिडी गावा पर्यंत तसेच बोळींज चर्च , खारोडी , तोरभाट ते खिवणी, रु माव आळी ते बावखाल, दोनतलाव मुख्य रास्ता , कोफराड, जे पी नगर , भंडारी क्र ीडा संकुल, गोकुळ टाऊनशीप ते जकात नाका, विरार स्टेशन परिसरात, वसई सागर शेत, रमेदी, मुळगाव, पापडी, वसई रोड, नालासोपारा, तुळींज, बिलाल पाडा, गावराई पाडा, देवतलाव, एव्हरशाईन, वसंत नगरी, विरार विवा कॉलेज रास्ता या सर्वच भागात गुुडघाभार पाणी साचल्याने येथील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे नागरिक पायी चालत येथील प्रवास करताना दिसत आहेत. यंदाही वसई पश्चिमेच्या नवघर बस स्थानकात पाणी साचले असून या परिसराला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते.मॅनहोल करून ठेवली उघडीविरार- गेल्या पावसाळ्यात उघड्या मॅनहोलमध्ये बुडून एका डॉक्टरांचा झालेला मृत्यू सगळ्यांच्या स्मरणात असतांना मंगळवारी रस्त्यावर साचलेले पाणी ओसरावे म्हणून वसई विरार महापालिकेने रस्त्याची मॅनहोल उघडी करून ठेवण्याचा अजब उपाय केला. सततच्या मुसळधार पावसाने वसई विरार परिसरात नद्यांचे स्वरूप आले आहे. नालासोपारा परिसर पूर्णत: पाण्याखाली गेला तर विरार च्या रसत्यावर नदीपात्र निर्माण झाले आहे. अशीच काहीशी परिस्थिती ही वसई येथे ही होती पालघर पोलिस आणि पालिकेचे कर्मचारी दोन रात्र भर लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचा प्रयत्न सतत करीत होते. सोमवार चीं परिस्थिती पहाता मंगळवारी नागरिकानी कामावर जाण्याचे टाळले सकÞाळपासून नागरिक रस्त्यावर सह परिवार उतरले पाण्यत मज्जा करायची संधी त्यानी साधली. लहान मुले व महिला सर्व पाण्यत खेळतांना दिसत होते.खबरदारी म्हणून वसई- विरारची वीज खंडीतवसई : सोमवार पासुन मुंबई व उपनगरीय परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे, वसई-विरार भागाला वीजपुरवठा करणाº्या महापारेषणच्या वसई , अति उच्च दाब केंद्रा च्या नियंत्रण कक्षामध्ये पावसाचे पाणी मोठया प्रमाणात शिरल्याने खबरदारी म्हणून महावितरण मंगळवारी सकाळपासून खबरदारी म्हणून वीजपुरवठा खंडित केला. या मुळे वसई गाव, वसई प., नालासोपारा पूर्व-पश्चिम, आचोळे, विरार पश्चिम, जुचंद्र, नवघर पूर्व, वालिव, अंगाशी, मनवेलपाडा, अर्नाळा या भागाला वीजेविना रहावे लागले.

टॅग्स :Rainपाऊसpalgharपालघर