शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

बोईसरच्या मुख्य रस्त्यावरील फेरीवाल्यांना हटविले , मनसेच्या मागणीनंतर झाला निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 05:39 IST

बोईसर येथील मुख्य रस्त्यावरील फेरीवाल्यांना सार्वजनिक बांधकाम खाते आणि बोईसर ग्रामपंचायतीने संयुक्त कारवाई करून शनिवारी हटविले.

पंकज राऊत / लोकमत न्यूज नेटवर्कबोईसर : येथील मुख्य रस्त्यावरील फेरीवाल्यांना सार्वजनिक बांधकाम खाते आणि बोईसर ग्रामपंचायतीने संयुक्त कारवाई करून शनिवारी हटविले.कारवाईला काही फेरीवाल्यांनी विरोध केला मात्र या मोहिमेचे नागरिकांनी स्वागत केले आहे. तर फेरीवाल्यांना हटविण्याची मागणी मनसे आणि सिटीझन फोरम आॅफ बोईसर तर्फे तहसीलदाराकडे केली गेली होती. बोईसर येथील नवापूर नाका ते स्टेशन पासून चित्रालय पर्यंत चा मुख्य व प्रचंड रहदारी आणि वाहतूकीचा रस्ता फेरीवाल्यांनी व्यापल्याने सतत होणाºया वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता त्या पासून सुटका मिळावी म्हणून मागील महिन्यांत त्यांना हटविण्यां संदर्भात मनसे चे माजी जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांच्या नेतृत्वाखाली पालघर च्या तहसीलदारांच्या दालनात बैठकीचे आयोजन केले होते.त्या बैठकीत तहसीलदार महेश सागर यांनी ग्रामपंचायतीच्या अधिनियमाचा कठोरपणे वापर करून अनिधकृतपणे बसणाºया फेरीवाल्यांना हटवून रस्ते मोकळे करण्याचे आदेश पी .डब्ल्यू. डी. व बोईसर आणि सालवड ग्रामपंचायतीच्या सरपंचांना दिले होते.त्या अनुषंगाने फेरीवाला हटाव मोहीम हाती घेतली त्यामध्ये पी. डब्ल्यू. डी चे सहाय्यक अभियंता पालवे यांचे सह पी.डब्ल्यू. डी. चे अधिकारी आणि कर्मचारी तर बोईसर ग्रामपंचायतीच्या सरपंच वैशाली बाबर, ग्रामविकास अधिकारी कमलेश संखे यांच्यासह ग्रामपंचायतीचे सफाई कर्मचारी सहभागी झाले होते. तर मोहिमेकरीता बोईसर पोलिसांची मदत घेण्यात आली होती.या मोहिमे दरम्यान मनसेचे माजी जिल्हा प्रमुख कुंदन संखे, उपजिल्हा प्रमुख अनंत दळवी, तालुका प्रमुख समीर मोरे, मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख भावेश चुरी, पदाधिकारी शिवाजी रेंबाळकर, चेतन संखे, आदी उपस्थित होते, तर भाजपाचे आशिष संखे यांनी अनेक वर्षा पासून सुरू केलेला आठवडा बाजार हटवू नये अशी मागणी उपस्थित अधिकाºयांकडे केली तर महिला भाजी विक्रेत्यांनी आमचा संसार याच व्यवसायावरती चालतो आम्हाला हटविले तर आमची उपासमार होईल असे संतप्तपणे सांगितले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारMNSमनसे