शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

गुंजाळकरचा ताबा वालिव पोलिसांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 00:06 IST

चौकशी करणार : आज न्यायालयापुढे हजर करणार

वसई : माहितीच्या अधिकाराचा दुरु पयोग करीत वसईतील विविध बांधकामांची माहिती घेऊन त्याद्वारे बांधकाम व्यावसायिकांकडे कथितपणे खंडणी मागितल्या प्रकरणी राष्ट्रवादीचे वसई- विरार जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष गोविंदा गुंजाळकर यांना वसई पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका खंडणीच्या गुन्हयात तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती मात्र, सोमवारी झालेल्या न्यायालयाच्या सुनावणीत न्यायालयाने गुंजाळकर यांचा ताबा वालिव पोलसांकडे दिला आहे.

सोमवार दि.१५ आॅक्टोबर रोजी गुंजाळकर यांची तीन दिवसांची पोलीस कोठडी संपली होती. त्यावेळी त्यांना न्यायालयात हजर केले असता, वसई न्यायालयात आधीच वालिव पोलिसांनी मागणी करताच न्यायालयाने गुंजाळकर यांचा ताबा वालिव पोलसांना दिला असल्याची माहिती वालिव पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार यांनी लोकमतला दिली.

दरम्यान, गुरु वारी गुंजाळकर यांनी वसई कोर्टात शरणागती पत्करल्यावर कोर्टाने प्रथम त्यांचा ताबा वसई पोलिसांना दिला. त्यावेळी ताबा मिळताच वसई पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केल्यावर शुक्र वारी न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्याची मुदत सोमवारी संपली होती.

परिणामी एका गुन्ह्यातील कोठडी संपल्यामुळे न्यायालयीन कोठडीत पाठविण्याचे निर्देश देण्यात आले, मात्र त्याचवेळी उपस्थित वालिव पोलसांनी न्यायालयापुढे वालिव पोलिसांत दाखल असलेल्या एका खंडणीच्या गुन्ह्याच्या तपासाकरता आम्हाला आरोपीचा ताबा मिळण्याची मागणी केली असता न्यायालयाने गुंजाळकर यांचा ताबा वालिव पोलिसांकडे सुपूर्द केला.

वालिव पोलीस आता मंगळवारी गुंजाळकर यांना रीतसर वसई न्यायालयात हजर करतील. त्यावेळी प्रत्यक्ष न्यायालय गुंजाळकर यांच्या प्रकरणात काय आदेश देत यावरुन त्यांची पुढील वाटचाल ठरणार आहे. मागील महिन्यात दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयाने गुंजाळकर यांना चार आठवड्यात पोलिसांपुढे हजर होण्याचे निर्देश दिले होते. त्यांच्या चौकशीतुन अनेक प्रकरणे उघड होण्याची शक्यता आहे.लागोपाठ घडामोडींमुळे वसईतील राजकारण तापलेमागील महिन्यात दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयाने गुंजाळकर यांना चार आठवड्यात पोलिसांपुढे हजर होण्याचे निर्देश दिले होते. एकूणच या सर्व लागोपाठ घडामोडीमुळे वसईत सद्या तरी राजकारण चांगलेच तापले असून गुंजाळकर यांच्या अटकसत्र व तीन दिवसीय पोलीस कोठडी व आता वालिव पोलिसांकडे ताबा आणि त्यांनतर पुन्हा पोलीस कोठडी या मुळे त्यांच्या अडचणीत कमालीची वाढ झाली असून पुढील कायद्याची क्लिष्ट प्रक्रि या व गुन्हा व त्याच्या शिक्षेची तीव्रता पाहता त्यांचा यापुढे जामीन होणे कठीण असल्याची वंदिता असून आता वसईतील राजकारण नेमके कुठल्या दिशेने जाईल हे बघणे मात्र रंजक ठरणार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी