शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
2
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
3
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
4
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
5
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
6
स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजना सुरक्षा मिळणार! 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील; नवीन नियम जारी
7
राहुल नार्वेकरांचा Video व्हायरल, "माझ्याशी पंगा घेताय.."; हरिभाऊ राठोड यांनीही केले गंभीर आरोप
8
ठाण्यात एकाच घरात दोन पक्ष! मुलगा शिंदेसेनेतून, आई राष्ट्रवादी (शरद पवार) कडून आमने-सामने
9
Shrejal Guleria : अभिमानास्पद! वडील सैन्यात सुभेदार, लेक बनली फ्लाइंग ऑफिसर; तिसरी पिढी देशसेवेसाठी सज्ज
10
Video: आरारारा... खतरनाक! जेसन होल्डरने टाकला अजब-गजब चेंडू, क्रिकेटविश्वात रंगलीये चर्चा
11
सूडाची भावना! खांबाला बांधलं, केसाला धरुन फरफटत नेलं; लव्हमॅरेज केल्यावर जावयाला मारहाण
12
पनवेलमध्ये 'मविआ'ला उमेदवारांनीच दिला झटका! ७ जणांची माघार, भाजपाचे किती उमेदवार बिनविरोध विजयी?
13
राष्ट्रवादीचा 'मास्टरस्ट्रोक'! डॉक्टर, इंजिनिअर्ससह उत्तर भारतीयांना संधी, मलिक म्हणाले...
14
महापौरांसह सर्व समित्यांचे अध्यक्ष मराठीच हवेत! 'महानगरपालिकेसाठी मराठीनामा' कुणी केला जारी?
15
कधी काळी सचिन तेंडुलकरची झोप उडवणारा गोलंदाज; आज क्रूझ शिपवर गाणी गाऊन उदरनिर्वाह
16
कल्याण-डोंबिवलीत महायुतीने मतदानाआधीच अर्धी लढाई जिंकली, तब्बल १९ उमेदवार बिनविरोध
17
Jalgaon Municipal Election 2026: भाजपा-शिंदेसेनेचा विजयाचा 'षटकार'! युतीचे १२ उमेदवार बिनविरोध, वाचा संपूर्ण यादी
18
'हिंसक निदर्शनांमध्ये अमेरिका इराणमध्ये घुसण्यास तयार'; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा
19
Viral Video: "बिहारमध्ये २०-२५ हजारांत मुली मिळतात", कॅबिनेट मंत्र्यांच्या पतीचं वादग्रस्त वक्तव्य
20
Uma Bharti : "लाजिरवाणं, अत्यंत कलंकित; आयुष्याची किंमत २ लाख..."; उमा भारतींचा भाजपाला घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

वर्ल्ड रेकॉर्ड व्हाया डहाणू, पावबाके परिवाराची गिनीज ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 06:08 IST

रेकॉर्ड ब्रेक फॅमिली असा पावबाके कुटुंबियांचा उल्लेख केल्यास अतिशयोक्ती होणार नाही. कारण विजय पावबाके फास्टेस्ट टू अरेंज अल्फाबेट्स या प्रकारात त्यांची नोंद नुकतीच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली आहे. त

बोर्डी  - रेकॉर्ड ब्रेक फॅमिली असा पावबाके कुटुंबियांचा उल्लेख केल्यास अतिशयोक्ती होणार नाही. कारण विजय पावबाके फास्टेस्ट टू अरेंज अल्फाबेट्स या प्रकारात त्यांची नोंद नुकतीच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली आहे. तर गतवर्षी त्यांची कन्या आरोही हिने इंडियाज़ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये विविध चार विक्र म नोंदवले आहेत.डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बावबाके यांना गिनीजकडून रेकॉर्डला गवसणी घातल्याचा मेल प्राप्त झाला, यामुळे त्यांना आकाश ठेंगणे झाले. सदर रेकॉर्ड आपण (२८.४५) सेकंदात पूर्ण केल्याचे विजय पावबाके यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.एवढेच नव्हे तर चार महिन्या पूर्वीच पावबाके यांचा विद्यार्थी करणने चिल्ड्रेन्स रेकॉर्डवर नाव कोरले, या सर्व घडामोडीत पावबाके यांचे मोठे योगदान आहे. विजय पावबाके हे डहाणू तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या गोवणे शाळेत शिक्षक आहेत. त्यांची तीन वर्षीय कन्या आणि चौदा वर्षीय विद्यार्थी यांनी रेकॉर्ड ब्रेक कामिगरी नोंदविल्यानंतर आपल्याही नावे एखादा विक्र म असावा या विचाराने भारावलेल्या विजय पावबाके यांना प्रेरणा मिळाली. याकरिता त्यांनी गिनीज बुकात रेकॉर्ड करण्याचा निश्चय केला. त्यानंतर गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या वेबसाइटवर रजिस्टेशन केले. ब्रेक द रेकॉर्ड या टॅबवर क्लिक केल्यानंतर त्यांच्या पुढ्यात हजारो रेकॉर्ड्सची यादी आली. त्यामध्ये अनेक रेकॉर्ड असे होते की, ते मोडणे अशक्य होते. त्यामुळे आपल्या आवाक्यत असणारे रेकॉर्डचा शोधत त्यांनी घेतला. त्यापैकी फास्टेस्ट टू अरेंज अल्फाबेट्स हा विक्र म मोडायचा अशी खूणगाठ पावबाके यांनी बांधली. सदर रेकॉर्ड युनायटेड किंगडमच्या हॅरी स्ट्रेचर या व्यक्तिने सप्टेम्बर २०११ मध्ये ३०.५० सेकंदात नोंदवला होता. शिवाय मागील ६ वर्षात तो अबाधितही होता.हा विक्र म मोडण्यासाठी पावबाके यांनी अर्ज केल्यावर गिनीजच्या टीम कडून रेकॉर्डसाठी आवश्यक असलेली सर्व नियमावली पाठवण्यात आली. त्यानुसार दोन साक्षीदार, दोन टाइमकीपर, दोन वीडियो शूटर, प्लास्टिक अल्फाबेट्स व स्टेनिसलिड बोर्डची गरज होती. वरील सर्व आवश्यक साहित्य जमवून त्यांनी सराव सुरु केला.मात्र पहिल्या प्रयत्नात त्यांना अल्फाबेट्स अरेंज करायला २.५ मिनिट एवढा वेळ लागला. कठोर परिश्रम केल्या शिवाय गत्यंतर नसल्याची जाणीव त्यांना झाली. या करीता सलग तीन ते चार महीने अविरत सराव सुरु केल्यानंतर ‘प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट’ या म्हणीचा प्रत्यय त्यांना आला.कुटुंबीयांनीच बजावली भूमिकादिवाळीच्या सट्टीत रेकॉर्डसाठी व्हिडिओ पाठविण्याचे त्यांनी ठरवले. यासाठी त्यांचे भाऊ अक्षय व शुभम यांनी वीडियो शूटिंग केले. तर वहिनी लता व अर्चना पावबाके यांनी टाइमकीपरची जबाबदारी पार पाडली. त्यांच्या पत्नी सरला व आई या साक्षीदार अर्थातच पंचाच्या भूमिकेत होत्या. टहा जागतिक विक्र म माझ्या नावावर नोंदवला गेला. याचा खुप आनंद झाला. परंतु सर्वात महत्वाची बाब म्हणजे युनायटेड किंगडम ऐवजी आपल्या देशाला गौरव प्राप्त झाला असून हे जास्त अभिमानास्पद आहे.-विजय पावबाकेगिनीज वर्ल्ड रेकॉर्डर