शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
5
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
6
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
7
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
8
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
9
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
10
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
11
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
12
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
13
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
14
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
15
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
16
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
17
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
18
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
19
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज वसईत, श्रीमद भागवत कथा सत्संग महोत्सवात होणार सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 8:07 AM

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे आज (15 जानेवारी ) संध्याकाळी 5 वाजता वसईत येत असल्याची माहिती सत्संग महोत्सव समिती व माणिकपूर पोलिस निरीक्षक यांच्याकडून प्राप्त झाली आहे.

आशिष राणेवसई - उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे आज (15 जानेवारी ) संध्याकाळी 5 वाजता वसईत येत असल्याची माहिती सत्संग महोत्सव समिती व माणिकपूर पोलिस निरीक्षक यांच्याकडून प्राप्त झाली आहे. वसईच्या सनसिटी परिसरातील कार्यरत उत्तरांचल मित्र मंडळाने आयोजित केलेल्या श्रीमद् भागवत कथा सत्संग महोत्सवासाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आज वसईत येत आहेत.या मंडळाचा हा सत्संग महोत्सव श्री बद्रीनाथ मंदिर, सनसिटी येथे 12 ते 19 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. या ठिकाणी दररोज संध्याकाळी 4 वाजता श्रीमद् भागवत कथा आणि रात्री 8 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. इस्कॉनचे रघुवीर दास प्रभू हे या सत्संग महोत्सवाचे व्यासपीठासीन आहेत. अर्थातच उत्तराखंडचे निवासी व माजी मुख्यमंत्री राहिलेले राज्यपाल कोश्यारी हे खास आकर्षण असणार आहे आणि या महोत्सवातील भागवत कथेसाठी ते आज बुधवारी सायं. 5 वाजता स्वतः राज्यपाल कोश्यारी मुंबई ते वसई असा महामार्गावरून प्रवास करीत येणार असल्याने दक्षता म्हणून पोलिस, जिल्हा पप्रशासन सज्ज झाले आहे.विशेष म्हणजे या कथा महोत्सवास उपस्थित राहणाऱ्या भाविक खास करून उत्तराखंड संदर्भात नाळ जोडलेले भाविक या महोत्सवात मोठया संख्येने सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने सुरक्षेसाठी  सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती  माणिकपूर पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी लोकमतला दिली.

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी